हिंगोली। येथील शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे जसे देवदूत म्हणून हिंगोली जिल्ह्यात ओळखले जातात तसेच ते एक कट्टर हिंदुत्व जपणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील ओळखल्या जातात. त्याचंच ज्वलंत उदाहरण आज पाहावयास मिळत आहे. पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडी काही धर्मांध लोकांनी अडवली असल्याचे समजताच आ संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्याना पाठवून घडवलेली दिंडी पुढे मार्गस्थ करून सुखरूप मुक्कामी पोहोचवली आहे, त्यांच्या या कार्याची जोरदार चर्चा हिंगोली जिल्ह्यात व सोशल मीडियावर होते आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम वरून श्री संत लोटांगणे बाबा यांची पायी दिंडी ह.भ.प.मधुकर महाराज वानखेडे यांच्या नेतृत्वात पंढरपूरकडे जात असताना हिंगोलीतील मेराज उलूम चौक येथे संध्याकाळच्या मुक्कामाकडे मार्गक्रमण करीत होती. या रस्त्यावर अतिक्रमणात असलेल्या दुकानाच्या झापडीला चुकून दिंडीतील एका वाहनाचा धक्का लागल्याने…काही धर्मांधांनी पायी दिंडीतील ट्रॅक्टरची चावी काढून घेत दिंडी रोखली व “हमको नुकसान भरपाई दो नही तो हम आपकी दिंडी नही जाने देंगे” अशी धमकी उमेन चाऊस व त्याच्या सहकाऱ्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना दिली…


अचानक धर्मांधांनी पायी दिंडी रोकल्याने दिंडीतील महिला भक्त या भयभीत झाल्या… कुणीतरी लागलीच देवदूत व लोकांच्या अडचणीला धाऊन येणारे आमदार संतोष बांगर यांना कॉल केला… आणि घडलेल्या हकीकत सांगितली क्षणाचाही विलंब न लावता आमदार संतोष बांगर यांनी आपले बंधू बांधकाम सभापती तथा हिंदू धर्म रक्षक अशी ओळख असलेले श्रीराम बांगर यांना घटनास्थळी पाठवले. तेव्हा दिंडीतील सर्व वारकऱ्यांना धीर आला.. हिंदू धर्म रक्षक श्रीराम दादा बांगर यांनी दिंडी अडविणाऱ्या धर्मांध मुस्लिम टोळक्याला फैलावर घेताच त्यांनी” हम भी हमारे नये खासदार को फोन लगायेंगे” म्हणून धमकी दिली… नंतर आमदार बांगर यांनी चाऊस व त्याच्या साथीदारांना दिंडीला रोखल्यास गाठ माझ्याशी आहे. अशा कडक शब्दात समज दिल्यावर धर्मांधांची बोलती बंद झाली व त्यांनी घेतलेली चावी हिंदू धर्म रक्षक श्रीराम दादा बांगर यांच्याकडे परत दिल.


नंतर हिंदू धर्म रक्षक श्रीराम दादा बांगर यांच्या संरक्षणात वारकऱ्यांची पायी दिंडी दत्त मंदिर मुक्कामी रवाना झाली… छत्रपतींच्या काळात ज्या वेळेस मुघलांचे सैन्य दिंडीतील वारकऱ्यांवर अत्याचार करीत असत त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येत असत..आजही छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपणारे आमदार संतोष बांगर साहेब हे आम्हा वारकऱ्यांच्या मदतीला धावून आले…अश्या शब्दात दिंडीतील वारकऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या…!!! याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जिकडे तिकडे या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.



