आ. संतोष बांगर यांनी दणका देताच धर्मांधांनी अडवलेली पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडी सुखरूप पोहोचली मुक्कामी – NNL
हिंगोली। येथील शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर हे जसे देवदूत म्हणून हिंगोली जिल्ह्यात ओळखले जातात तसेच ते एक कट्टर हिंदुत्व जपणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील ओळखल्या जातात. त्याचंच ज्वलंत उदाहरण आज पाहावयास मिळत आहे. पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडी काही धर्मांध लोकांनी अडवली असल्याचे समजताच आ संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्याना पाठवून घडवलेली दिंडी पुढे मार्गस्थ करून सुखरूप मुक्कामी पोहोचवली आहे, त्यांच्या या कार्याची जोरदार चर्चा हिंगोली जिल्ह्यात व सोशल मीडियावर होते आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम वरून श्री संत लोटांगणे बाबा यांची पायी दिंडी ह.भ.प.मधुकर महाराज वानखेडे यांच्या नेतृत्वात पंढरपूरकडे जात असताना हिंगोलीतील मेराज उलूम चौक येथे संध्याकाळच्या मुक्कामाकडे मार्गक्रमण करीत होती. या रस्त्यावर अतिक्रमणात असलेल्या दुकानाच्या...
