नांदेड| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ८ वे त्रेवार्षिक तालुका अधिवेशन गांधी नगर येथे दि.२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कामगार नेते व पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड या अधिवेशनात एकमताने करण्यात आली. पहिल्या सत्राच्या सुरवातीला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री दिवंगत कॉ. बुद्धदेव भट्टाचार्य, माकपचे राष्टीय महासचिव कॉ.सीताराम येचूरी तसेच किनवट माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे सह परभणी दंगलीतील शहीदाना व ज्ञात,अज्ञात चळवळीतील कालवश लोकांना शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
कॉ.विजय गाभने यांनी अधिवेशनास संबोधित केले तर पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वला पडलवार यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन कॉ.श्याम सरोदे यांनी केले . या अधिवेशनात तालुका कमिटी सदस्य म्हणून कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अरुण दगडू, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.मीना आरसे, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ.बंटी वाघमारे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.रमेश गायकवाड, कॉ.प्रफुल्ल कऊडकर आदींची निवड करण्यात आली.ही तालुका कमिटी पुढील तीन वर्षासाठी कामकाज पहाणार आहे.
सदरील अधिवेशनात नांदेड शहरासह वाघी, वानेगाव,बोरगाव,कोंढा, सोमेश्वर, वानेगाव येथील पक्ष सभासदांनी सहभागी झाले होते. अधिवेशनाचा समारोप कॉ.अरुण दगडू यांनी केला तर आभार कॉ. बंटी वाघमारे यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. संगीता गाभने, कॉ.प्रदीप महाजन,कॉ.पवन जगडमवार, कॉ. बालाजी पाटील भोसले, कॉ.नेहा कऊडकर, कॉ.मंगेश वाट्टेवाड,कॉ. पंढरी बरुडे आदींनी परिश्रम घेतले.