नांदेड। मागील वर्षाचे पूरग्रस्तांना मंजूर अनुदान मिळाले नाही ही बाब खुप गंभीर आहे परंतु महापालिका आणि तहसील प्रशासनास शुल्लक वाटते.
ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत त्यांना मनपा उपायुक्त म्हणून पदोन्नती देण्यात येते हे मनपाचे उदारमतवादी धोरण असून बेजबाबदाऱपने किंवा वशिलेबाजीने घेतल्याचा आरोप सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करावी या आणि इतर मागण्यासाठी दि.२ डिसेंबर रोजी तहसीलदार यांना घेराव घेराव घालून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
क्षेत्रीय कार्यालय चार चे अधिकारी श्री संजय जाधव यांना वशिलेबाजीने उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली असून ती तात्काळ रद्द करावी ही मागणी घेऊन मनपा समोर दि.२७ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले असून दखल घेण्यात येत नसल्याने घेराव आंदोलन करण्यात आले आहे. तातडीने योग्य आणि कठोर कारवाई आयुक्त यांनी केली आहे नाहीतर ९ डिसेंबर रोजी मनपा आयुक्त यांना घेराव घालण्यात येणार आहे.
घेराव आंदोलनात मोठ्या संख्येने महिला पुरुष सामील झाले होते. पुढील आंदोलन आक्रमक होणार होणार असल्याचा इशारा सीटूच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. नवनाथ सावंत,कॉ.संभाजी सावते आदींनी केले आहे.