“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन

हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य हककच्या मागण्यांसाठी दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान राज्यव्यापी ” चक्काजाम ” आंदोलन करण्यांत येणार आहे. यात तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवानी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख यांनी केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोनारी फाटा येथे शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यांत येणार आहे. आंदोलनाची सुरुवात सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गवर होणार असून, सकाळी 10 ते 12 हे दोन तास आंदोलन चालणार आहे. आंदोलन दरम्यान शेतकरी, दिव्यांग, शेजगजुर, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदिसह प्रमुख शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहिर करण्यात येऊन शेकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या आदेशाची अंमलबजावणी व्हावी व इतर प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अशी मागणी केली जाणार आहे.

आंदोलनादरम्यान सुरक्षेची काळजी म्हणून रुग्णवाहिका, अग्निशामक, आपत्कालीन वाहने यांना कोणताही अडथळा होणार नाही याची कड़क दक्षता घेतली जाणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून स्वयंसेवक तैनात करण्यात येणार असून, ध्वनी प्रदुषण व सार्वजनिक संपत्ती व दुकानाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे या आंदोलन दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून या शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनास बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

हे आंदोलन संस्थापक आ.बच्चू कडू अचलपुर अमरावती मतदार संघ, विठ्ठलराव कल्याणकर जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार असून, या संदर्भाने देण्यात आलेल्या निवेदनावर अनिल दिगंबर कदम, हदगांव-हिमायनगर विधानसभा अध्यक्ष, दत्ता पंडीतराव देशमुख, प्रहारचे तालुका प्रमुख हिमायतनगर, संतोष गंगाधर तोकलवाड उप तालुका प्रमुख, हिमायतनगर, भानुदास खेड शिंदे, वैभव अशोकराव लयांडे, गणेश रामराव जाधव, सादिक पिंजारी खडकीकर (दिव्यांग तालुका प्रमुख, हिमायतनगर, पांडुरंग हुंम्बे, डोल्हारी, माधव किशन शिंदे, स्वराज्य पक्ष, तालुका प्रमुख हिमायत्तनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button