“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या न्याय्य हककच्या मागण्यांसाठी दिनांक 24 जुलै 2025 गुरुवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान राज्यव्यापी " चक्काजाम " आंदोलन करण्यांत येणार आहे. यात तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवानी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख यांनी केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोनारी फाटा येथे शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यांत येणार आहे. आंदोलनाची सुरुवात सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गवर होणार असून, सकाळी 10 ते 12 हे दोन तास आंदोलन चालणार आहे. आंदोलन दरम्यान शेतकरी, दिव्यांग, शेजगजुर, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदिसह प्रमुख शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहिर करण्यात येऊन शेकऱ्यांचा सातबारा कोरा करण...
