लोहा। मतदार संघाला तालुक्याला नेता लागतो.खंबीर व सक्षम नेतृत्व असेल तर सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीचे निराकरण होते .गेल्या ३०-३५ वर्षा पासून जनसेवेसाठी आयुष्य झिजविणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आपणास पुन्हा एकदा आमदार करायचे आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे.
लोहा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपा, शिवसेना,आरपीआय मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार . प्रतापराव पाटील चिखलीकर प्रचारार्थ जंगमवाडी येथे प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी थेट संवाद साधला आपलं एक मत महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल आपलं एक मत लोहा कंधारच्या शाश्वत विकासासाठी असेल .आपल्या भागाने नेहमीच चिखलीकर कुटुंबियांना सहकार्य केले आहे.या भागाचा जनतेला प्रतापराव पाटील यांच्या विषयी आपला माणूस -हक्काचा माणूस म्हणून नेहमीच आस्था वाटत आली आहे.असं नेतृत्व आपणस लाभले आहे त्यांना आपण जपले पाहिजे निवडून दिले पाहिजे असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव राठोड,भाजपा तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव शोभाताई बगडे,प्रदीप मंगनाळे,सरपंच शिवनंदा शामराव वाडीकर, माजी सरपंच बापूराव पेदेवाड,मा.सरपंच काशीराम बोधगिरे, वैजनाथ परोडवाड,भावराव वाडीकर,प्रकाश डुबुकवाड, विरभद्र वाडीकर,देविदास बोधगिरे यांच्यासह मोठया संख्यने ग्रामस्थ उपस्थितहोते.,महायुतीचे आजी-माजी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.