Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस ; वीज कोसळून युवकाचा मृत्यू तर एक बैल व गाय दगावली -NNL

नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस ; वीज कोसळून युवकाचा मृत्यू तर एक बैल व गाय दगावली -NNL

नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान झाडाखाली थांबलेल्या ठिकाणी वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अन्य एका ठिकाणी वीज कोसळून बैल व गाय दगावली आहे. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर वीज पडून होणाऱ्या दुर्घटना पाहता नागरिक शेतकऱ्यांनी पाऊस पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यासह परिसरामध्ये दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरावरील टिनपत्रे उडून जाणे व महावितरण कंपनीच्या तारा तुटणे व वीज पोल वाकुन जाणे अश्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळली असून, कंधार तालुक्यातील येलूर येथील शंकर पंढरी धर्मेकर...
बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजात राऊत -NNL

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई होणार – जिल्हाधिकारी अभिजात राऊत -NNL

नांदेड
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खते, बियाणे, किटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने बाजारात जर बियाणे, खते व किटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास संबंधित कृषी व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती , रासायनिक खत पुरवठा कंपनी प्रतिनि...
वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी व बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा- या वाहन चालकावर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब व मा. अपर पोलीस श्री. अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी वेळोवळी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशित केले होते. मा. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या 13014 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचेकडून 1,39,82400/-रु (एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपय) दंड केला शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी लोकसभा निवडणुक- 2024 अनुषंगाने नांदेड शहरात VVIP प्रचार सभा बंदोबस्त, निवडणुक बंदोबस्त, तसेच रमजान ईद, श्री रामनवमी, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती महत्वाचे बंदोवस्त करीत असतांना दि. 12/03/2024 ते दि. 05/06/2024 या कालावधीत शहरात वाहतू...
नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी;; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी;; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यासाठी 6 ते 8 जूनपर्यंत या तीन दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या तीन दिवसांत विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 6 जून 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6 ते 8 जून 2024 या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तूरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या गोष्टी करा : १)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर...
अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह आढळला जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली घटनास्थळी भेट -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली आहे. माहूर पासुन ९ कि,मी, अंतरावर असलेल्या माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील मेन रोड वर असलेल्या आष्टा फाट्याजवळ तुळशीराम राठोड यांच्या शेतात रोड वरुन २०० मिटर अंतरावरा त्याच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प-याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच स्पिंकलरची पाईप व नोझल ठेवलेले होते व,तेथे रात्री ९ वा मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने शेत मालक शेतात आले , व आग विझवण्याचा प्रयत्न केला सर्व आग विझल्यावर अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत मुत्तदेह दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळावर माहूर पोलीस ठाण्याचे स...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 25 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील बिलोली येथिल मा. तदर्थ जिल्हा न्यायधीश-१ तथा अति. जिल्हा न्यायाधीश बिलोली श्री. व्ही. ब. बोहरा यानी आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड, वय: 50 वर्षे, रा. अजनी, ता. बिलोली, जी. नांदेड यास *कलम 376(2)(N), भा.द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 25,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम 506 भा.द. वि. अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 5,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित मुलगी ही आई लहनपणी वारली असल्याममुळे आणि वाडिलानी दुसरे लग्न केले असल्यामुळे मामाच्या गावी अजनी ता. बिलोली येथे अजी आजोबा आणि मामा सोबत राहत होती. माहे ऑक्टोबर 2020 मध्ये पीडितेची मावशी बाळंतपनासाठी माहेरी आजनी येथे आली व दिनांक 28/11/2020 रोजी पीडित मुलीची मावश...
वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; हिमायतनगर तालुक्यात वीज पडून म्हैस दगावली – NNL

नांदेड
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील कालपासून वातावरणात बदल झाला असून, काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, रब्बी हंगामातील उर्वरित पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात दुपारी ४४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अचानकपणे विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून नांदेड शहर व परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंत्तू शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळे उघडे पडले असून, जिकडे तिकडे तळे साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून मार्ग काढावा लागला असल्य...
शनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL

शनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL

नांदेड
नवीन नांदेड। श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड २१वा श्री शनि जन्मोत्सव ६ जुन २०२४ रोज गुरुवार सकाळी ६:३० वा ५१ किलो तेलाचा अभिषेक गुरु शशिकांत महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला, यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह अजिवन अन्नदाते व भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनि जयंती निमित्ताने शनि जन्मोत्सव ६ जून २०२४ गुरुवारी सकाळी ६ वाजता सामुदायीक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पुजेचे मानकरी श्री शनि जन्मोत्सवाचे अजीवन अन्नदाते हृदय रोग तज्ञ डॉ.कर्मवीर उनग्रतवार यांच्या व उपस्थित अभिषेकाचे यजमान यांच्या हस्ते ५१ किलो तेलाचा अभिषेक करण्यात आला. मुख्य पुजारी शशिकांत महाराज कुलकर्णी गुरू यांच्या हस्ते विधी...
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या व अन्याय करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार – सहाय्यक निबंधक सुनील गन्लेवार NNL

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या व अन्याय करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार – सहाय्यक निबंधक सुनील गन्लेवार NNL

नांदेड
बिलोली/नांदेड| महाराष्ट्रात अवैद्य सावकारीच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरांसह ग्रामीण परिक्षेत्रात बेकायदेशीर रित्या व्याजाने पैसे देणाऱ्यांवर तसेच सावकारी करणाऱ्या दलालांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्या कुणावरही अश्या प्रकारे अन्याय झाला असेल तर संबंधितांनी बिलोली येथील सहाय्यक निबंधक कार्यालयास सम्पर्क साधून तक्रार द्यावी असे आवाहन सहाय्यक निबंधक सुनील गन्लेवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्यातल्या बहुतांश शहरी व ग्रामीण परिक्षेत्रात बोकाळलेल्या बेकायदेशीर व्याजबटी - सावकारी करणाऱ्या दलालांचा समुळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असुन, या दलालांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ सुधारीत कायद्या अंतर्गत संपूर्ण राज्यभर लागू करण्यात...
“कौन बनेगा नांदेड का एमपी” या स्पर्धेत दहा जणांची निवड – धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर NNL

“कौन बनेगा नांदेड का एमपी” या स्पर्धेत दहा जणांची निवड – धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर NNL

नांदेड
नांदेड| अत्यंत चुरशीच्या लढतीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे ५९४४२ मतांनी विजयी झाल्यामुळे " कौन बनेगा नांदेड का एमपी " या स्पर्धेत त्यांच्या बाजूने ८९१ स्पर्धकांनी कोल दिला असला तरी नेमके मताधिक्याचा आकडा एकाही स्पर्धकाला अंदाज करता न आल्यामुळे ५९४४२ मतांच्या जवळपास असणाऱ्या दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यांना रविवार दि.९ जून रोजी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या स्पर्धेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. एसएमएस द्वारे २३२० तर पोस्टाद्वारे ०६ अशा एकूण २३२६ प्रवेशिका प्राप्त झालेल्या होत्या. त्यामध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होतील असा विश्वास १४३२ मतदारांनी व्यक्त केला होता. काँग...
error: Content is protected !!