Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

बी-बियाणे, खते चढ्या भावाने विक्री करत असतील तर या व्हॉट्सअप हेल्पलाईन वर करा तक्रार -NNL

बी-बियाणे, खते चढ्या भावाने विक्री करत असतील तर या व्हॉट्सअप हेल्पलाईन वर करा तक्रार -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबी होत असतील तर थेट तक्रार करा, असे कृषिमंत्र्यांनी निर्देश दिलेत आहेत. यानुसार माहूर तालुक्यातील कृषी संचलकाकडून कुठे प्रकार होत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी आणि न्याय मागवा असे आवाहन केले जाते आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दिवस आधी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. राज्यात कुठेही कृषीनिविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील. अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक...
पंकजा मुंडे यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे किनवट भाजपाची मागणी -NNL

पंकजा मुंडे यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे किनवट भाजपाची मागणी -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळवता आल्या नसल्याची जबाबदारी स्विकारुन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वयंस्फूर्त कार्यमुक्त होऊन राज्यात विस्कटलेली घडी सावरण्यासाठी पंकजाताई मुंडेकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याच्या मागणीने किनवटपासून सुरुवात केली आहे. परवाच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारा मिळालेली मते आणि किनवट विधानसभा मतदारसंघात आमदारांना मिळालेल्या मतांची समिक्षा व्हायला पाहिजे. झालेल्या नुकसानीला भाजपाने गांभीर्याने घेतले नसल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावणार हे अटळ आहे. पक्षांतर्गत गटातटात विखुरलेल्या भाजपाला बहूजन नेत्या पंकजाताईच तारु शकतात अशा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित होतांना दिसतात. भाजपातील निष्ठावंतांची अग्नीपरिक्षा कधी स...
श्री गुरु अर्जनदेव जी महाराज यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने साजरा -NNL

श्री गुरु अर्जनदेव जी महाराज यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने साजरा -NNL

नांदेड
नांदेड। शीख धर्माचे पाचवे गुरु, महान शहीद श्री गुरु अर्जुन देवजी यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने सोमवार दि. 10 जून रोजी गुरुद्वारा तखत सचखंड येथे साजरा करण्यात आला. गुरु अर्जुनदेवजी हे पवित्र पावन श्री गुरूग्रंथ साहबाचे निर्माते आहेत. श्री गुरु अर्जुन देवजी महाराज यांच्या शहीदी गुरुपूरब निमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शरबताचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुद्वारा तखत सचखंड येथे श्री सुखमनी साहिबचे पाठ व कथा करण्यात आली. वरील कार्यक्रमाचे आयोजन येथील "गुरु का खालसा संस्थेच्या वतीने तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या सहयोगाने करण्यात आले होते. गुरुद्वारा येथे शहीदी गुरुपूरबला समर्पित दि. 6 जुन ते 10 जुन 2024 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 वेळेत सुखमनी साहेबचे पाठ व कीर्तन कार्यक्रम पार पडले. पठण व प्रार्थनेनंतर गुरूंचा लंगर वाटप करण्यात आला. या वेळी पंजप्यारे सिंघसाहब भाई गुरमीत सिंघ पुजारी जी, कथाकार...
एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी -NNL

एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरासह जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत पोलिसांनी एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एका आरोपीस अटक केली आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने केली असून, या कामगिरी बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे. नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते. दिनांक 10/06/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून कापुस संशोधन केंद्...
शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध दोन दिवसिय स्नेहसंमेलन उत्सहात -NNL

शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध दोन दिवसिय स्नेहसंमेलन उत्सहात -NNL

नांदेड
नांदेड| विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध हे दोन दिवसाचे स्नेहसंमेलन नांदेड येथे उत्साहात संपन्न झाले असून वीस ते सत्तर वर्षापर्यंतच्या २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये होत असलेल्या दैनंदिन कार्यक्रमाची पुन्हा एकदा उजळणी करून विविध खेळामध्ये सहभाग घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे स्नेहसंमेलन अतिशय संस्मरणीय झाले. चौथीच्या परीक्षेत मराठवाड्यात गुणवत्ता यादीत आलेल्या ग्रामीण भागातील पहिल्या तीस विद्यार्थ्यांना शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर या निवासी शाळेत प्रवेश दिला जातो. सहा वर्षात उत्तम संस्कारीत झालेल्यांमध्ये अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस आहेत. विद्यानिकेतनचे विद्यार्थी प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता, ...
अनुष्का सरपे हीच नीट परीक्षेत घवघवीत यश -NNL

अनुष्का सरपे हीच नीट परीक्षेत घवघवीत यश -NNL

नांदेड
नांदेड| येथील वैशाली नगरातील सरपे इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक सरपे यांची मुलगी अनुष्का दीपक सरपे हीने नीट परीक्षेत ( राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत ) 625 गुण संपादन करून अव्वल स्थान मिळविले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल डॉ. किशन गायकवाड, माधव कार्ले, मिलिंद व्यवहारे, सिद्धार्थ लोखंडे आदींनी अनुष्काचे अभिनंदन केले आहे....
माहूर तालुक्यात चढया दराने बियाणे विक्री, वाई बाजार येथे गोर सेनेचे रास्ता रोको आंदोलन -NNL

माहूर तालुक्यात चढया दराने बियाणे विक्री, वाई बाजार येथे गोर सेनेचे रास्ता रोको आंदोलन -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यात कपासी व इतर बियाणे खते कीटकनाशकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढया दराने विक्री करून शेतकऱ्यांची लुट बियाणे विक्रिते व कृषी केंद्रचालकांनी चालविल्याने अनियमितता करणाऱ्या कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोर सेने तर्फे दि. १० जून रोजी वाई बाजार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी गोर सेनेच्या कार्यकर्त्यासह अनेक शेतकरी सहभागी आले होते. तब्बल दोन तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्रीधर गडगीडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकाचे निवेदन घेऊन गोर सेना माजी तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांचेशी चर्चा केली. बियाणे, खते व कीटकनाशकाची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट करणाऱ्या कृषी दुकानदारांची चौकशी करून अनियमितता केल्या प्र...
किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील तल्हारी शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना बोगस पोटॅश या खताची विक्री होत असतांना पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकून चारचाकी वाहनासह ४१ बॅग खत असा एकूण ५ लाख ५६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करूं कारवाई करण्यात आली. गुणवत्ता व गुणनियंत्रण निरीक्षक तथा पं.स.चे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांना तालुक्यातील तल्हारी या गावच्या शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना पोटॅश या खताची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, इस्लापूरचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव, बोधडीचे कृ.प. बाळासाहेब ठेंगे, कृषी सहाय्यक गजानन गोरे, धर्मेश पोगुलवार, सुनीता चातरे व रेणुका बुलबुले यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एम.एच.१४ एच.यू. ८५६३ क्रमांकाच्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा मॅ...
नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, डॉ.विद्या झिणे मॅडम, डॉ. हनुमंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी दि.10/06/2024 रोजी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील बालकांची तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 105 बालकांची तपासणी करण्यात आली असून या पैकी 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्...
जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL

जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। गेल्या अनेक महिण्यापासूनची प्रतीक्षा संपणार असून, जून महिन्यात नागपूर, पुणे विमानसेवेला प्रारंभ होतो आहे. नांदेड शहर देशातील सात शहराच्या विमानसेवेशी जोडले गेल्यानंतर त्यात आणखी दोन शहरांची भर पडणार आहे. यात नागपूर, नांदेड, पुणे या शहरांचा समावेश असून, दिनांक २७ पासून सुरू होणार आहे. कमी वेळेत ही मोठी शहर गाठता येणार आहेत. नांदेड शहरातील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्त्वाच्या शहराला नादेड शहर हे विमानसेवेच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली बेंगलोर गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद अहमदाबाद अशी विमानसेवा सेवा सुरू आहे. एक जूनपासून नांदेड हैदराबाद- तिरुपती ही नवी सेवा सुरू झाली आहे. आता २७ जूनपासून नागपूर, नांदेड, पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. भविष्यात आणखीही काही शहरांसाठी नादेडहून विमानसेवेची सुरुवात होणार असल्या...
error: Content is protected !!