Homeनांदेडबी-बियाणे, खते चढ्या भावाने विक्री करत असतील तर या व्हॉट्सअप हेल्पलाईन वर...

बी-बियाणे, खते चढ्या भावाने विक्री करत असतील तर या व्हॉट्सअप हेल्पलाईन वर करा तक्रार -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबी होत असतील तर थेट तक्रार करा, असे कृषिमंत्र्यांनी निर्देश दिलेत आहेत. यानुसार माहूर तालुक्यातील कृषी संचलकाकडून कुठे प्रकार होत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी आणि न्याय मागवा असे आवाहन केले जाते आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दिवस आधी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. राज्यात कुठेही कृषीनिविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील.

अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील, किंवा अशा काही तक्रारी असतील, त्या तक्रारी शेतकऱ्यांनी दुकानाचे नाव, ठिकाण तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावेत, त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे कुषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments