Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। येथील साहित्यिक कवी रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील "सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला. ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे मराठी साहित्य मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित २० व्या राज्यस्तरीय कविसंमेलनात त्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांचे हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष  तथा ज्येष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी (उस्मानाबाद) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे स्वागताध्यक्ष होते.नौपाडा विभागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई राजेश मढवी ह्या प्रमुख अतिथी म्हणून ...
माकपचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा काढून बेमुदत उपोषण NNL

माकपचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा काढून बेमुदत उपोषण NNL

नांदेड
नांदेड| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. सीटू आणि जमसंने वर्षभर लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देण्यास तयार नाहीत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून मागणी धारकांना प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपय...
आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

नांदेड, लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी अखेर पार पडला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोदी यांची इच्छा (काही जण याला अट्टाहासही म्हणतील) पूर्ण झाली. आता चर्चा सुरु झाली ती हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल काय़..? एकूण परिस्थितीचा विचार करता सध्या तरी या सरकारला कोणताही धोका दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या तीन निवडणुकात जे यश मिळाले ते त्यांच्याच बळावर मिळाले यात संशय नाही. आपल्या बळावर सरकार येऊ शकते हे कळाल्यानंतर त्यांना नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करण्याची इच्छा झाली तर त्ते स्वाभाविकही आहे. तसे ते तिस-यांदा पंतप्रधान झाले. परंतु ते होताना पूर्वी सारखे यश त्यांच्या पक्षाला मिळाले नाही हेही वास्तव आहे. यापूर्वी मोदी भाजपाला मिळालेल्या पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होते. यावेळी त्यांना इतर पक्षाचा आधार (कुबड्या) ...
श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअर के लिए हम वचनबद्ध है – डॉ. विजय सतबीरसिंघ -NNL

श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअर के लिए हम वचनबद्ध है – डॉ. विजय सतबीरसिंघ -NNL

नांदेड
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ के अंतर्गत चल रहे श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्र के स्टडी चेअर की इमारत की जाँच हेतु डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. तथा प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड ये खुद विद्यापीठ पहुंचे। विद्यापीठ में वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी और अन्य पदाधिकारियों के साथ एक विशेष बैठक की गयी. डॉ. विजय सतबीर सिंघ ने श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्र के स्टडी चेअर के काम पर खास ध्यान देकर प्रोत्साहन करने हेतु वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी का धन्यवाद किया और इस काम में किसीभी तरह की कोई भी मदत या जरुरत पड़ने पर गुरुद्वारा बोर्ड खुले दिल से तैयार है। माननीय व्ही. सी. डॉ. मनोहर चासकर जी इन्होने अपने कार्यालय में डॉ. विजय सतबीर सिंघ तथा स. जसवंत सिंघ बॉबी इनका स्वागत और सत्कार किया. व्ही. सी. साहेबने कहा जल्द से जल्द ये इमारत बन कर तैयार होगी और...
माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर होणारी लूटमार त्वरित थांबवा अशी मागणी माहूर तालुका समनक जनता पार्टी च्या वतीने माहूर तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. सध्या पेरणीचे दिवस चालू आहे. शेतकरी प्रमाणीत दर्जेदार बियाणे योग्य दरात मिळावे यासाठी कृषि सेवा केंद्रात बि-बियाणे व खतांची खरेदी करण्यासाठी जात आहेत परंतु शेतकऱ्याऱ्यांचा निरक्षरपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन सध्या पेरणीच्या मोसमात कृषी दुकानात गर्दी राहत असल्याने व्यापारी प्रमाणीत व दर्जेदार बियाणांची कृत्रिम रित्या तुटवडा दाखवून प्रत्येक बियाण्याच्या पिशवी मागे हजार रूपयांच्या (१०००/-रू.) वर दर लावून बियाणे कसे-बसे देवून शेतकरांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकयांना दर्जेदार, प्रमाणित व हवे ते बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतकरी बांधवाना प्रमाणित बियाण्यासोबत बोगस क...
माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL

माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ जयंती रविवार दिनाक ९ जून रोजी महाराणा प्रतापसिंह चौकात साजरी करण्यात आली. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.या वेळी शहरातून भव्य मिरवणुक (शोभायात्रा)काढण्यात आली . विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त भव्य मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही (तिथी नुसार) महाराणा प्रताप यांची ४८४ जयंती ९ जून रोजी साजरी करण्यात आली. विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ९ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता शहरातून ढोल ताशाच्या गजरात. फटाके आतिशबाजीत भव्य मिरवणुक मार्गान शोभायात्रा काढण्यात आली. नगरसेवक गोपु महामुने. सौ.सुरेखा...
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार…राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार -NNL

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार…राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही देश पातळीवर समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ फार कमी वेळात हवेच्या वेगाने संपूर्ण देशात पसरला गेला आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील व शहरातील निर्भीड पत्रकारांचा पाया उभा करणे हे एकच ध्येय मनात ठेवून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुठल्याही क्षेत्रातील त्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार,बातमीचे वृत संकलन करत असताना अनेक अडचणींना पत्रकाराना सामोरे जावे लागते. पत्रकारांच्या समस्या सोडविणे व वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे हीच जिद्द ठेवून या...
लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे याना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान NNL

लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे याना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान NNL

नांदेड
लोहा लोह्याचे भूमिपुत्र लातूर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेले गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे याना २०२२ मध्ये प्रजासताक दिनी पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथे बुधवारी (७जून) रोजी राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले लोह्याचे भूमिपुत्र गजानन भातलवंडे हे लातूर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत शालेय शिक्षण लोह्यात झाल्या नंतर परभणी येथील वनामकृवि येथून ते बीएस्सी अग्री झाले व स्पर्धा परीक्षा देऊन थेट१९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर भंडारा येथे रुजू झाले भंडारा, गोंदिया या नक्षलग्रस्त भागासोबतच नांदेड, बीड, परभणी, लातूर या जिल्ह्यातत्याची सेवा उत्कृष्ट ठरली.नांदेड येथे पीआरओ तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याने केलेले काम तेथील ग्रामस्थांच्या मनात आदराचा भाव निर्माण करणारे ठरले आहेत श्री. ...
नवज्योतसिंघ गाडीवाले यांची घरवापसी; मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश -NNL

नवज्योतसिंघ गाडीवाले यांची घरवापसी; मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश -NNL

नांदेड
नांदेड| शिवसेनेचे युवा नेतृत्व नवज्योतसिंघ गाडीवाले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून मातोश्रीवर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत , संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. सकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्यातील युवकणाध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व नवज्योतसिंघ गाडीवाले हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिवसेनेत कार्य करत राहिले मात्र दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता मात्र येथे केवळ दोनच महिन्यात त्यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांची शिष्टाई कामाला आली. माधव पावडे यांच्या जिल्ह...
राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL

राजपुत (क्षत्रिय) समाजातर्फे हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती साजरी-NNL

नांदेड
नांदेड। राजपुत (क्षत्रिय) समाज बांधवांच्या वतीने हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शहरातील महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होवून अनेकांनी अभिवादन केले. हिंदू कुलभूषण राष्ट्रवीर विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त  आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व सहकार्‍यांनी पुतळ्याजवळ येवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. शहरातील चैतन्यनगर भागातून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात तेथून मिरवणूक काढून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यापर्यंत हि मिरवणूक आली. त्यानंतर मिरवणुकीतील सर्व मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. यानिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्ह...
error: Content is protected !!