Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत झेंडा -NNL

कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परिक्षेत झेंडा -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोनाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करतांना आपली गुणवत्ता सिद्ध करत एकूण ३०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २०० विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले असून याबरोबरच ओमसाई ठाकूर याने राज्यात ६ वा क्रमांक पटकाविला आहे तर कू. श्रुतिका येलगे हिने पटकाविला १६ क्रमांक आहे. मुलांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व विषयांचे सखोल ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा बालगावी, या उद्देशाने महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या दोन्ही परीक्षेत नांदेडच्या कोनाळे क्लासेसच्या फाऊंडेशन बॅचच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करत आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोव...
राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

नांदेड
नांदेड। वसंतनगर नांदेड येथील नामांकित अशा राजर्षी शाहू विद्यालयात मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी कराण्यात आली. याप्रसंगी कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांच्या स्नुषा व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ. गायत्री वाडेकर यांच्या वतीने शाळेत गरीब, गरजू व होतकरू अशा 50 विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, स्कूल बॅग, वह्या इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी, आठवी व एमएनएमएस ह्यामधील खुल्या व राखीव प्रवर्गातील सहा विद्यार्थ्यांना तीस हजार रूपयांची शिष्यवृत्तीची घोषणा केली. डॉ. वाडेकर कुटुंबियांनी गेल्या 11 वर्षांपासून या शिष्यवृत्तीमध्ये खंड पडू दिला नाही. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉ. गोपाळराव कदम, चंद्रशेखर सोनवणे, डॉ. पी.डी. ...
पश्‍चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL

पश्‍चिम बंगाल येथे महीलांवर अत्याचारावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -NNL

नांदेड
नांदेड। पश्‍चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांनी पश्चिम बंगालमधील चोप्रा, उत्तर दिनाजपूर येथे एका महिलेला रस्त्यावर मारहाण करत आहेत. याविषयी कायदा व सुव्यवस्था संदर्भात संताप व्यक्त करणारे निवेदन सरस्वती प्रति्ष्ठाणच्या अध्यक्षा सौ छाया देशपांडे व कार्यकर्त्या सौ.सदिच्छा सोनी यांच्यासह शिष्टमंडळाच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ३० जून रोजी, चोप्रा भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये पश्‍चिम बंगाल येथील चोप्राचे आमदार हमीदुल रहमान दोन लोकांना - एक महिला आणि एक पुरुष - रस्त्यावर काठीने मारहाण करताना दिसत आहे. पुरुष आणि महिलेमध्ये कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ताजेमुल या प्रकरणात 'जलद न्याय' करत होता, ज्यासाठी तो ओळखला जातो. व्हिडिओमध्ये ताजेमुल महिलेला अनेक वेळा मारहाण करताना दिसत आहे. त...
कंम्प्लेट पेस्ट कंट्रोलचे चंद्रकांत कल्याणकर उद्योजकता पुरस्काराने सन्मानित -NNL

कंम्प्लेट पेस्ट कंट्रोलचे चंद्रकांत कल्याणकर उद्योजकता पुरस्काराने सन्मानित -NNL

नांदेड
नांदेड। येथील तरोडा खु. भागातील राधिका नगर येथील कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल चे संचालक श्री चंद्रकांत कल्णाणकर यांना ३ जुलै रोजी नाशिक येथे मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उद्यमशिल उद्योजकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कंम्प्लेट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट श्री चंद्रकांत देशमुख हे गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत, ते सांगतात की, घरात पेस्ट कंट्रोल नेहमीच आवश्यक आहे. शहरांत गटार किंवा पाइपच्या मार्गाने जीवजंतू घरात प्रवेश करतात आणि त्यांचा जर योग्य पद्धतीने बंदोबस्त केला नाहीत, तर ते तिथेच राहून आपला डेरा जमवतात. नेहमीच असे चि...
वक्ता दशसहस्त्रेषु असेल वक्तृत्त्व तर कराल नेतृत्त्व आणि गाजवाल कर्तृत्त्व -NNL

वक्ता दशसहस्त्रेषु असेल वक्तृत्त्व तर कराल नेतृत्त्व आणि गाजवाल कर्तृत्त्व -NNL

नांदेड
नांदेड। येथील अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाडसाने बोला आणि जग जिंका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सभा धीटपणा , सकारात्मक विचारनिर्मिती, आत्मविश्वास विकसन व सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास यासह व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी आवश्‍यक असलेल्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणारी ही एक महत्वपूर्ण कार्यशाळा असेल अशी माहीती आयोजक तथा अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रा.प्रकाश पाटील गिरे यांनी यावेळी दिली. या विषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , आयुष्याला नवा विचार, नवी दिशा देणारा रविवार हा दिवस ठरेल कारण ही कार्यशाळा ही आठवड्यातुन एक दिवस म्हणजे रविवारी आयोजित करण्यात येते आणि यात एकूण आठ आठवड्याची ही कार्यशाळा असते तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करण्याचा आत्मविश्वास देणारे एकमेव वक्तृत्त्व प्रशिक्षण केंद्र म्हणून अष्टपैलू वक्तृ...
Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होतांना दिसुन येत आहेत. काही कामे शासनमान्य कञांटदाराच्या नावे असली तरी राजकीय नेत्याचे चेलेचपाटे कामे करित असल्याने रोडच्या कामाचा दर्जा टक्केवारीमुळे सुमार झालेला दिसून येत आहे. या बाबतीत संबंधित विभागाला होणा-या कामाच्या बाबतीत बोर्ड लावण्यासंबधी काही जागरुक नागरिकांनी लेखी पञाद्वरे कळविलेले असतांना ही प्रशासनाने त्याची साधी दखल घेतलेली नसल्याचे दिसुन येत आहे. कञाटदाराच्या नावे राजकीय नेत्याचे जवळचे काही कार्यकर्ते हे काम करित असल्याने सा.बा विभाग व नगरपरिषद प्रशासन माञ ह्या कामाचा दर्जा न पाहता त्यांची बीले पास करतांना दिसुन येत आहे. रोडच्या कामाची गुणवत्ता ढासळेली आसतांना या बाबतीत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर ह्यानी लक्ष घालावे. शासनाच्या होणा-या निधीचा चागल्या दर्जाच्या कामाला उ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हूडी येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम -NNL

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हूडी येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी पाड्यातील डोंगर दरीत असलेल्या हुडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम राबविला. औचित्य होते वाढदिवसाचे, त्यानिमित्ताने चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप केले. डोंगरदरीच्या कुशीत वसलेल्या हूडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये मुख्याध्यापक पदी कार्यरत असलेल्या बालाजी हिंगोलै यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान बालकांमध्ये शालेय शैक्षणिक साहित्य व वही पेन वाटप करून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. व या शाळेत शिकणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांची मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले. वाढदिवस संपल्यानंतर लागलीच या विद्यार्थ्यांना अल्पोउपहार व गोड पदार्थाची वाटप ...
सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL

सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाण्याचा ठणठणात, टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा करा -NNL

नांदेड
नवीन नांदेड। नावामनपा हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरात गेल्या आठ दिवसा पासुन मालमत्ता धारकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने पाणी पुरवठा विभागात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने महिला पुरुष, युवक यांना पाण्यासाठी हातपंपाचा शोध घ्यावा लगत असुन तात्काळ टॅंकरने तात्काळ पाणी पुरवठा चालू करावा अशी मागणी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व माजी नगरसेविका प्रतिनिधी संजय पाटील घोगरे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे, मागणी दखल घेत तात्काळ दोन टॅकरने पाणी पुरवठा प्रशासनाने चालू केला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विष्णुपूरी जलाशयातून काळेश्वर येथुन सिडको जलकुंभ येथे दैनंदिन पाणी पुरवठा होत असता, संबधित विष्णूपूरी गावात केद्रीय महामार्ग रस्ता काम चालू असल्याने रस्ता खोदलेल्याने पाणी पुरवठा करणारी लाईन गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज ...
कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

कमठाला जिल्हा परिषद शाळेतील नव्या वर्ग खोल्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील ग्रामपंचायत कमठालाच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कमठाला येथे, जिल्हा निधीतून बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन तसेच शाळेच्या 2 एकर नवीन जागेत आणि स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपन किनवट/माहूर मतदारसंघाचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 4-5 फूट उंचीची व एक ते दोन वर्षाची वड,पिंपळ, कडूनिंब, शिसम, नारळ व विविध प्रकारचे वृक्ष,पेरू, चिकू,आंबा यासारखी फळझाडे, इतर शोभेची झाडे अशी 200 देशी-विदेशी झाडे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कमठाला ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा श्रीमती अनुसयाबाई तडसे यांनी भूषविले. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात शाळेला प्रशस्त जागा,क्रिडांगण ,सीसी रस्ता उपलब्ध करून दिल्याबाबत तसेच अतिशय जुन्या व धोकादायक असलेल्या खोल्यांची पड...
मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL

मराठा आरक्षण जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-किनवट तालुका सकल मराठा समाज -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ८ जुलै रोजी नांदेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सामील व्हावे, असे आवाहन किनवट तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाकरीता जनजागृती करण्यासाठी ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी शनिवारी पहिली रॅली हिंगोली जिल्ह्यात होणार आहे. र...
error: Content is protected !!