Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

अवैध सागवान, टाटा इंडिका सहीत एकुण पाच लाख पस्तीस हजारांचा माल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
किनवट,परमेश्वर पेशवे। दिनांक 03 जुलै रोजी अंबाडी - धामणदरी रोडवर गस्त करत असतांना संशयावरून पांढऱ्या रंगाची tata intra v30 मध्ये अवैध सागी गोल माल भरताना दिसली असता सदर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी पळून गेले. टाटा इंडिका tata intra v30 वाहन क्रमांक MH 26 CH 0476 पकडण्यात आले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधसागी गोल नग -15 आढळून आले. आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री केशव वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.किनवट पी. एल.राठोड यांच्या मार्गद्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अंबाडी बी. एस संतवाले, एम.एन. कतुलवार, एस. एम. कोम्पलवार, एस. एम. यादव, हारी चौधरी पाटील, वनरक्षक कु.एस एस.काकडे, मुकुंद डोईफोडे, रवि दांडेगावकर, कल्पना खराटे तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवल...
सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL

क्राईम, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाने अनेक वेळा नोटीस बजावून देखील सहस्त्रकुंड येथील शेतकऱ्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशीत करून पोलीस बंदोबस्तातच इस्लापूर वन विभागाने त्या अतिक्रमण जमीनीवर वन महोत्सव अंतर्गत पोलीस बंदोबस्तातच वृक्षारोपणाची लागवड केली. नांदेड किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन, अशा या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या वाळकी (बु) सर्वे नंबर 52 येथील वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवल्याने त्यावेळी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र या शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्ष...
आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

नांदेड
हिमायतनगर। मातंग समाज अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा कागदोपत्री वाटेकरी आहे. परंतु काही विशिष्ट एका जातीनाच या आरक्षणाचा लाभ होत असल्याने, उर्वरित जाती पैकी मातंग समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाचा फायदा होत नाही. या विषयी दिनांक ०१जुलै २४पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक/अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण महाउपोषण सुरू केलेले आहे. ते महाउपोषण मागील पाच दिवसांपासून चालत आहे. त्या उपोषणाला पाठींबा म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला. भरांडे सरांची तब्येत सतत खालावत आहे. त्यामुळे महाउपोषणाला जाहीर समर्थनार्थ व लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावे.अशी न्यायाची मागणी घेऊन आज दिं.०४जुलै२४ रोजी मौजे पोटा बु.येथील भोकर-हिमायतन...
नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

नांदेडात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली… ८ जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार -NNL

नांदेड
नांदेड। सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे सकाळी ११.०० राज काॅर्नर तरोडेकर चौक-राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय.टी.आय.चौक-शिवाजीनगर-एस.पी.ऑफीस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर या मार्गाने भव्य शांतता रॅली निघणार आहे व मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवास छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातुन संवाद साधणार आहेत.सदरील रॅलीचे नेतृत्व मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील हे करणार आहेत. मागील पंधरा दिवसापासुन सदरील रॅलीच्या नियोजनासाठी अखंड मराठा समाज नांदेड जिल्हा व जिल्हा नियोजन समिती यांच्याकडुन रॅलीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. २०जुन २...
तिरुमला तिरुपती येथे परकामनी सेवा करिता २० कर्मचारी रवाना -NNL

तिरुमला तिरुपती येथे परकामनी सेवा करिता २० कर्मचारी रवाना -NNL

नांदेड
नांदेड। तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेश येथे दि. ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत तिरुमाला तिरुपती देवस्थान (टिटीडी) तिरुमला येथे परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या करीता परकामनी सेवा आहे. त्याकरिता दोन ते तीन महिने अगोदर श्री तिरुमला तिरुपती देवस्थान यांच्या संकेतस्थळावर परकामनी सेवेकरीता ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ज्यांची निवड झाली त्यांना संदेश द्वारे कळविण्यात येते. त्या करिता जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत कर्मचारी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, माधव कोल्हे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, कैलास लंकलवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, अजित कोटूरवार, राजप्पा बाबशेट्टे, विनायक मोरे, लिपिक शाम सावंत, किरण कुलकर्णी, भारत हांम्पले, जिल्हा परिषदचे संदिप भंडारे, श्री...
पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री माधवराव जाधव हिने चीन, दुबई, पोर्तुगाल, मोरक्को, पॅरिस, जपान येथे झालेल्या जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट केली आहे. सदर स्पर्धांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याने भारताचा नावलौकिक केला आहे. बंगळूरू, नवी दिल्ली, गोवा येथे वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांवर आपले नाव कोरत तिने महाराष्ट्राची शान राखली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ...
संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार -NNL

संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार -NNL

नांदेड, व्हिडीओ
नांदेड। नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला असून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात बम बम भोले चा गजर करत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले. शुक्रवार दि.५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता यात्रेकरू आकाशी टी शर्ट व टोपी परिधान करून स्टेशन वर आले. लंगर साहब गुरुद्वारा तर्फे संतबाबा बलविंदरसिंघजी व बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ, प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी करण्यात आली . यात्रे दरम्यान अन्नदान करणारे नवनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,नारायण गवळी, रेखा...
नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधीत जमीनीचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश -NNL

नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधीत जमीनीचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश -NNL

नांदेड
नांदेड। गेल्या काही महिन्यांपासून फेरमुल्यांकनाच्या मागणीवरून प्रचंड वादात अडकलेल्या नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधीत जमीनीचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हे दिसत असून नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सभागृहात केलेल्या फेरमुल्यांकनाच्या मागणीची शासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत. दरम्यान शासन स्तरावर झालेल्या बैठकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाधीत जमीनीचे फेरमुल्यांकन करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. नांदेड-जालना समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पात नांदेड दक्षिण मतदारसंघातील शेकडो एकर जमीनीची भूसंपादन करण्यात आले. परंतु शासनाने बाधीत शेतकर्‍यांना जमीनीचा मोबदला अत्यंत तुटपुंज्या स्वरुपात देवू केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बाधीत शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले असून जमीनीच्या मुल्यांकना...
अष्टपैलू व्यक्तीमत्व: गं.ई. कांबळे -NNL

अष्टपैलू व्यक्तीमत्व: गं.ई. कांबळे -NNL

नांदेड
गंई या दोन शब्दाच्या नावाने ओळखले जाणारे गई कांबळे हे अत्यंत उत्साही नाविन्यपूर्ण उपक्रमाची कास असणारे आणि अनेक शैक्षणिक उपक्रमात विहिरीने सहभाग घेऊन नामांकित असणारे शिक्षक आहेत. गंई कांबळे यांचा जन्म 17 जून 1966 चा. देगलूर तालुक्यातील टाकळी वडग हे त्यांचे गाव. तीन भाऊ दोन बहिणी आई असं छोटसं कुटुंब. घरात शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणामुळे काय फायदा होईल हे माहित नाही. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू झाली आणि बाबासाहेबांनी सर्वांनी शिकलं पाहिजे हा मूलमंत्र दिला आणि तो मूलमंत्र जेव्हा खेड्यापाड्यात पोहोचला तेव्हा इरबाजी कांबळे यांनी आपल्या मुलाला शिकवायचे ठरवलं . 1972 साली त्यांनी गंगाधर यांना पहिलीत प्रवेश दिला. ठणठणीत प्रकृती, उत्तम बांधा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उठून दिसू लागले. अंगभूत हुशारीमुळे शिक्षकांमध्ये लवकरच लोकप्रिय झाले. इयत्ता दहावी मध्ये कुंड...
हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड| हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन हा निषेध नोंदविला. हिंगोली सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना 4 जुलै रोजी रविंद्र वाडे या व्यक्तीने रात्री घरात घुसून मारहाण केली. मोबाईलवर केलेल्या व्हॅटसॲप मॅसेज व दूरध्वनीनुसार कंत्राटी भरतीमध्ये आपण सांगितलेले दोन उमेदवार का घेतले नाही यासाठी जाब विचारून घरात घुसून मारहाण केली. यामध्ये जखमी झालेले सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर...
error: Content is protected !!