Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Prohibitory order in examination center premises | जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

Prohibitory order in examination center premises | जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशात नमूद केलेल्या राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर नांदेड, आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 20 नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 18 जुलै ते 30 जुलै 2024 (दि. 21,26,27,28 जुलै 2024 वगळून) या कालावधीत तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्र...
Register on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा – NNL

Register on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा – NNL

नांदेड
नांदेड| नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ई-समृध्दीचा दिलेला क्युआर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन क...
Chief Minister My Beloved Sister Yojana | नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – NNL

Chief Minister My Beloved Sister Yojana | नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी ? कशासाठी ? त्यासाठी कोणत्या अर्जांची आवश्यकता आहे. अर्जासाठी कोणते कागदपत्र हवे आहेत, याबाबतची सोपी आणि सुटसुटीत माहिती देणारी एक मुलाखत उद्या बुधवारी नांदेड आकाशवाणी वरून साडेअकरा वाजता प्रसारित होणार आहे .श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्या या योजनेबाबत सद्यस्थिती व योजनेचे महत्त्व विशद करणारी मुलाखत साडेअकरा वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत आहे. या योजनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्या नां...
5 rupees for milk and 30 rupees for milk powder export | दुधासाठी पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान – NNL

5 rupees for milk and 30 rupees for milk powder export | दुधासाठी पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान – NNL

नांदेड
नांदेड| राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यात दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना कार्यरत खाजगी दुध प्रकल्प व फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्याकडे दुधाचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. गाईच्या 3.5/8.5 गुण प्रतीला 30 रुपये देणे बंधनकारक राहील. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय टॅगिंग, मोबाईल नंबर बँक खाते इ. दुध पुरवठा करणाऱ्या खाजगी दुध प्रकल्पाकडे लॉगीन करावे. ही योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीपर्यत राहील यांची नोंद दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे....
Citizen’s health should be maintained intact | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये स्वच्छता ठेवून नागरिकाचे आरोग्य अबाधित राखावे – NNL

Citizen’s health should be maintained intact | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये स्वच्छता ठेवून नागरिकाचे आरोग्य अबाधित राखावे – NNL

नांदेड
हिमायतनगर| शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये घानीचे साम्राज्य पसरले असून, घानी च्या दुर्गधीमुळे नागरीकांस विविध आजाराची लागण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरांच्या स्वच्छतेची घडी संपूर्णतः विस्कटली असून नागरीकांस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता वार्ड क्र. १७ सह शहरातील स्वच्छतेचे काम तात्काळ हाती घेऊन संपूर्ण स्वच्छता राखावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी केली आहे. नगरपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात हेंद्रे यांनी म्हटले आहे की, नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्र. १७ मध्ये प्रताप लोकडे यांच्या सेतू केंद्रांच्या पाठीमागे नाला असून सदर नल्यामध्ये शहरातील सांडपाणी वाहून जाते. परंतू सदरील नाल्यामध्ये झाडे, झुडपे वाढली असल्याने केर कचरा वाहून न जाता नाल्यामध्ये अडकून पडला आहे. महा मार्ग रस्त्यावर असलेल्या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास ...
Demand for arrest | शेतीमाल खरेदी करून पैसे न देणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी – NNL

Demand for arrest | शेतीमाल खरेदी करून पैसे न देणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी – NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| कंंधार तालुक्यातील पेठवडज येथील शेतकरी सुरेश मुगावे व नायगाव तालुक्यातील रातोळी येथील शेतकरी राम गायकवाड शेतकऱ्यांचे 2021 साली सोयाबीन,तुला खरेदी करून व्यापारी दिलीप बाबुराव येवतीकर (गायकवाड) रा.येवती ता.मुखेड यांनी पैसे दिले नसल्यामुळे पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सदरील व्यापाऱ्यांविरोधात भादवी 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप आरोपीला अटक करण्यात आली असल्याने पिडित शेतकऱ्यांनी उपविभागी पोलीस अधिकाऱ्यांना 15 जुलै रोजी निवेदन देऊन अटक करण्याची मागणी केली आहे . व्यापारी दिलीप येवतीकर यांनी सुरेश मागावे यांच्याकडून 12 क्विंटल 28 किलो सोयाबीन दोन क्विंटल 65 किलो तुर असे 1 लाख 8 हजार 795 रुपयाचा किती मला खरेदी केले तर साथीदाराचा मला त्यांच्या कडून सोयाबीन तूर हरभरा असे 1 लाख 44 हजार रुप...
Damage to agriculture due to cloudburst-like rain | ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान – NNL

Damage to agriculture due to cloudburst-like rain | ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान – NNL

नांदेड
किनवट/ परमेश्वर पेशवे| किनवट माहुर तालुक्यातील अनेक भागात दिनांक 15 जुलै च्या मध्यरात्री झालेल्या उसळधार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांची महसूल प्रशासनाकडे केली आहे. दिनांक 15 जुलै च्या मध्यरात्री किनवट माहुर तालुक्यातील जलधरा, इस्लापूर, शिवणी, बोधडी, गोकुंदा सारखाणी उमरी बाजार मांडवी वाई, वानोळा वरचे मारेगाव, खालचे मारेगाव,तसेच आप्पारापेठ, आमलापूर कंचेली, पांगरपहाड, तोटंबा, मलकजाम, मलकजाम तांडा,दयाळ धानोरा, गोंडजेवली, तल्हारी, तल्हारी तांडा, झळकवाडी, कुपटी, भिशी, मुरझळा, कोल्हारी,सोनपेठ, सोनवाडी, लोखंडवाडी, करंजी हुंडी कोसमेट, पांगरी, परोटी, नंदगाव, नंदगाव तांडा, इरेगाव, रिठा भंडारवाडी, पिपरी, डोंगरगाव, कोपरा, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प...
Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL

Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड
नवीन नांदेड| आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा निमित्त, सिडको हडकोतील भाविक भक्तांसाठी सुरेल अभंग व भक्ती गितांचा कार्यक्रम स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला दिनांक १७ जुलै २०२४ रोज बुधवार वेळ सायं६.३० वाजता स्थळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, क्रांती चौक, सिडको नविन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मोहन आण्णा हंबर्डे (आमदार, नांदेड दक्षिण) तर प्रमुख पाहुणे एन. एस. आयलाने (पोलीस निरीक्षक, ग्रा.पो.स्टे. नांदेड) व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, सिडको, नांदेड यांनी केले आहे. वासवी क्लब, नविन नांदेड द्वारा गजर हरी नामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन नवीन नांदेड भागवत सिडको वासवी क्लब व वासवी वनीता क्लब द्वारा स्वरांजली प्रस्तुत "गजर हरी नामाचा" ...
Teachers should be recruited based on merit | टी.ई.टी.परिक्षा बंद करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी – NNL

Teachers should be recruited based on merit | टी.ई.टी.परिक्षा बंद करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| टी.ई.टी.परिक्षेतील यापूर्वीचे घोटाळे पाहता पात्र व गरिब विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये म्हणून हि परिक्षाच बंद करावी अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या शिक्षण सचिवा सह, शिक्षण आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात तलवारे यांनी म्हटले आहे की,टी.ई.टी.परिक्षा घोटाळ्यात आय.ए.एस.अधिकारी सुशील खोडवेकर, परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह पन्नास च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांना तुरुंगात जावे लागले होते.नंतर हे सर्वजण जमानतीवर सुटले व त्यांना पुन्हा मुळ पदांवर आस्थापना देण्यात आली. सद्या नीट परिक्षेचा मुद्दा देशभरात गाजत आहे.कोणत्याही पात्रता परीक्षेत घोटाळा हा जणू ठरलेलाच आहे असे समीकरण झाले आहे.सद्या शासन शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत जी माहिती देत आहे त्यात प्रचंड तफावत आहे.नव्याने टी.ई.टी.व्दारे...
Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे होत आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, धनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, या लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणे, थकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वार...
error: Content is protected !!