Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

भावसार समाज सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन -NNL

भावसार समाज सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन -NNL

नांदेड
नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर ,हडको नवीन नांदेड येथे महाआरतीचे आयोजन केले होते. मोठ्या उत्साहवर्धक, वातावरणात ,भक्तीभाव पूर्ण आनंदात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने महाआरती आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी पुष्पहार, पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी विनोद सुत्रावे , अध्यक्ष भावसार समाज सिडको ,शिवराज पेंडकर,संचालक एस.टी. महामंडळ सहकारी बँक नांदेड राजू आंबेकर, समन्वयक जीवनसाथी उप वधूवर सूचक मंडळ सिडको, राजू सितावार, ओमप्रकाश पेंडकर,विश्वानंद परळकर, समन्वयक शैक्षणिक मार्गदर्शन सिडको,संजय पेटकर, अध्यक्ष सौ.छाया शिवराज पेंडकर , सौ.शीतल राजू अंबेकर, सौ.शारदा विनोद सुत्रावे, विद्या संजय पेटकर यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते....
Vasant Cooperative Sugar Factory will continue at full capacity । वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार–अध्यक्ष अजय देशमुख -NNL

Vasant Cooperative Sugar Factory will continue at full capacity । वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार–अध्यक्ष अजय देशमुख -NNL

नांदेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी भाडे करारनामा रद्द करणे बाबत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेस दिलेले पत्र हे नजर चूकीने पाठविण्यात आले असून त्यात कुठलीही सत्यता नाही. आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत अहो. सद्यस्थितीत बॉयलरच्या टेक्निकल टीमचे कार्य व इतर अंतर्गत कामे ही वेगाने सुरू आहेत. तसेच रोलर सुद्धा रिसेलिंग करिता पाठविण्यात आले आहेत. आमचे मार्गदर्शक माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली लवकरच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसंत सहकारी कारखाना शेतकरी हितार्थ हंगामी गाळपास सज्ज असेल. वसंत सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरूचं राहणार असल्याची शास्वती कारखान्याचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी दिली. देशमुख हे दि. 18 जुलै रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी भाजपा यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा देखील उपस्थित...
Bhavji’s brother-in-law removed the thorn with the help of the three | तिघांच्या मदतीने भावजीचा मेहुण्याने काढला काटा – NNL

Bhavji’s brother-in-law removed the thorn with the help of the three | तिघांच्या मदतीने भावजीचा मेहुण्याने काढला काटा – NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| बोधडी (बु.) खून प्रकरणातील मुख्य आरोपी दयानंद जायभाये यास अटक होताच अवघ्या काही तासांत खून प्रकरणातील अन्य तीनही आरोपींना जेरबंद करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. मोबाइलच्या तांत्रिक माहितीवरून राम केंद्रेच्या खुनाचा उलगडा झाला. प्रॉपर्टीच्या कारणावरून मेव्हण्यानेच इतर तिघींच्या मदतीने भावजयीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. बोधडी (बु.) गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील आखाड्यावर राम महादेव केंद्रे (३८) व त्यांची आई गयाबाई (६०) हे १३ जुलैच्या रात्री झोपी गेले होते. रात्री ९:३० ते १०:०० वाजेच्या सुमारास 'राम राम' असा आवाज आला. आई- भावजयीचा आवाज आहे, म्हणत राम आवाजाच्या दिशेने गेला. तेव्हा चार जणांनी मारहाण सुरू केली. या मारहाणीत राम यांचा मृत्यू झाला. तर गयाबाईचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी गयाबाईने मोठ्या हिमतीने एकाच्या पाठीत काठी घातली. त्यात एकाच...
“Pandharichi Wari” Abhangavani and devotional music | “पंढरीची वारी” या अभंगवाणी व भक्ती संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

“Pandharichi Wari” Abhangavani and devotional music | “पंढरीची वारी” या अभंगवाणी व भक्ती संगीत कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

नांदेड, मनोरंजन
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिरात देव शयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम मंदिर सभागृहात दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान संपन्न झाला. या कार्यक्रमास भाविकांनी व संगीत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दिनांक १७ बुधवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताचे स्व. विमलबाई लिंगारेड्डी तिप्पनवार यांच्या 17 व्या पुण्यस्मरण स्मृती प्रित्यर्थ "पंढरीची वारी " या अभंग वाणीचा विशेष कार्यक्रम गजानन तिप्पनवार, परमेश्वर तिप्पनवार आणि परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमांची सुरुवात सेवानिवृत्त मुख्यध्यापक नागनाथ अक्कलवाड सरांच्या हस्ते मातोश्रीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलीत करून झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्री परमेश्वर तिप्पनवार यांच्या स्वराने.."वार...
विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर,असद मौलाना| कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गाजापुर येथील मस्जीद पाडण्याचा प्रयत्न केला व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्ले करणाऱ्या समाजकंटका विरुद्ध कठोर कारवाई करावी. अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने हिमायतनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गाजापुर येथील काही विघ्न संतोषी समाजकंटक यांनी जमा मस्जिद पाडून आतील पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळून तेथील मुस्लिम वस्तीवर अचानक हल्ले करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान केले. अश्या प्रकारे अचानक हल्ले करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील मुस्लिम समाजाचे वतीने पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना दि. १८\७\२०२४ रोजी लेखी निवेदन देण्यात आले. तसेच तालुका दंडाधिकारी हिमायतनगर व महाराष्ट्र शासनाला पोलीस प्रशासनामार्फत निवेदनाच्या प्रती पाठवून तुमच्या भावना कळविण्यात य...
An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL

An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL

नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील दुधड /वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये...वडाचीवाडी, धनेवाडी, बुरकुलवाडी, रामनगर या गावातील आदिवासी बांधवाना रानभाजी कर्टुले वरदान ठरू लागले आहेत. नांदेड जिल्यात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजार पेठ म्हणून वाळकेवाडी ओळखली जाते. येथील माल हे थेट भारतात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजारापेठ असलेले ठिकाण हेंद्राबाद या ठिकाणी दर शुक्रवारी निर्यात केला जातो.जंगलामधील रान भाज्या तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे या भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक श्रोत निर्माण झाला आहे. रानातील चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक शरीराला उत्तम स्वास्थ्य देणाऱ्या भाज्या व फळे नागरिकांना खायला मिळतात. या रान भाज्यांमध्ये करटुले नामक एक भाजी असून, ती भाजी शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. या भाजीला कुठलीही रासायनिक फवारणी या खत व...
From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

From Amarnath Cave Episode – 13 | Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur |अमरनाथ गुहेतून भाग – १३ | लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Blog, नांदेड, लेख
तेविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये दिलीपभाऊ ठाकूर यांच्यासोबत सहभागी झालेल्या यात्रेरात्रकरुंचे मनोगत या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे कुमार कुलकर्णी , मनपा वार्ड ऑफिसर पाहता पाहता, अमरनाथ यात्रा परतीचा चा शेवटचा टप्पा दोन ते तीन तासात येईल, ज्यांना ज्यांना जवळ च्या स्टेशन हून सोयीस्कर होईल ते उतरत आहेत, सगळ्यांनी केलेल्या सहकर्या बद्दल मनापासुन आभार, कळत नकळत काही चूक झाल्यास, कोणाचे मन दुखावले असल्यास आम्ही उभयतां दिलगिरी व्यक्त करतोत, आपले प्रेम स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा हीच अमरनाथ चरणी प्रार्थना, विशेषतः श्री दिलीप भाऊ यांचे विशेष आभार, त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, दांडगा संपर्क, गोड वाणी आणि आत्मविशवासाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच, बाबा बर्फानी तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो, असेच सत्कार्य तुमच्या हातून घडो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना, पुढच्या प्रकल्पात आम्ही निश्चितच सहभागी ...
Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL

Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL

मनोरंजन, नांदेड
नांदेड। कलांगण प्रतिष्ठान व दैनिक प्रजावाणीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी आषाढी एकादशी निमित्त कुसुम सभागृहात आषाढी महोत्सव संपन्न झाला. यानिमित्त सादर करण्यात आलेल्या गजर हरिनामाचा या पांडुरंगाच्या भक्तीगीतांच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व रसिक जन भक्तीरसात न्हाऊन निघाले! सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह खचाखच भरले होते. या मैफिलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी पांडुरंगाच्या मूर्तीपूजेसह दीप प्रज्वलन करून केले. प्रमुख अतिथी श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक व श्री महेश कुमार डोईफोडे, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका दोघेही सपत्नीक उपस्थित होते. तर विशेष निमंत्रितांमध्ये डीसीबी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती प्रीती जमदाडे, प्रसिद्ध उद्योजक श्री माधवराव पटणे, उद्योजक श्री अनिल शेटकार, यशवंत नगरच्या राम मंदिराचे अध्यक्ष श्री रमेश मिरजकर...
Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

नांदेड
नांदेड| जवाहर नवोदय विद्यालय प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.बी.एस.सी. शिक्षण पद्धतीने शिक्षण आदिवासी होतकरू मुलांना मिळावा, यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलची स्थापना आदिवासी विकास विभाग च्या वतीने करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून शाळा उत्कृष्ठ सुरू आहेत व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ह्या शाळेत परीक्षा देऊन टक्के वारी नुसार प्रवेश घेतला जातो. सुरुवातीच्या काळात एक दोन पदे वगळता सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पण घेण्यात आले. २०१८ मधील कोवीड सेंटर मनून अश्या बऱ्याच शाळांना दिले.त्यात शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केली. तसेच शाळेत जवळ पास ५ ते ६ वर्ष अल्पश्या पगारात काम करून घेतल्या नंतर ,आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या मनसुभा राज्य सरकार चा असून, NEXT या कंपनी च्या वतीने न...
50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। माहूर ते किनवट राष्ट्रीय मार्गावर माहूरपासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवळणी फाट्याजवळील शेतकरी तुळशीराम राठोड यांच्या शेतात दि.५ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा अवलंब करत या गंभीर घटनेतील आरोपींचे फोटो प्रकाशित करुन त्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास पोलिस अधीक्षकांकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहूर-किनवट मुख्य महामार्गावरील माहूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नखेगाव ते हिवळणी फाट्याजवळ एका शेतात दिड महिन्यापूर्वी अंदाजे २० ते २५ वर्षाच्या महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मुत्तदेह आढळला होता. सदर महिलेची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तिचे मारेकरी नेमके कोण हे पोलिसांना काही केल्या समजत नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोली...
error: Content is protected !!