Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

home guard registration | होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

home guard registration | होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 335 चा होमगार्ड सदस्य अनुशेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे. यासाठी 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे....
23 Help Centers of Municipalities to accept applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र -NNL

23 Help Centers of Municipalities to accept applications | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी मनपाचे 23 मदत केंद्र -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वार्ड समिती केंद्रामार्फत पात्र लाभार्थी महिलाचे अर्ज संकलित करण्याचे कामकाज नांदेड महानगरपालिकेच्या 23 मदत केंद्रामार्फत सुरु आहे. तसेच अंगणवाडी सेविकाही घरोघरी जावून पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्याचे काम प्राधान्याने करीत आहेत. आतापर्यत मनपाच्या मदत केंद्रावर ऑफलाईन 5 हजार व ऑनलाईन 1 हजार 500 असे एकूण 6 हजार 500 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेट देवून 5 हजारावर अर्ज संकलित केले आहेत. आजपर्यत असे जवळपास 12 हजारावर अर्ज प्राप्त झाले आहेत. तरी जास्तीत जास्त पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आपले अर्ज भरावेत, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज स्विकारण्यासाठी शहरी भागात वार्डनिहाय समित्या गठीत केल्या आहेत. तसेच मनपाच्यावतीने 23 मदत केंद...
Chief Minister Tirtha Darshan Yojana | “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” साठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा -NNL

Chief Minister Tirtha Darshan Yojana | “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” साठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांचा समावेश राहील. यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल...
Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL

Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरामध्ये एकुण 25000 वृक्षांची लागवड करण्याचे उदिष्ट समोर ठेवले असुन क्षेत्रिय कार्यालय क्र.4 वजिराबाद अंतर्गत गुरुपोर्णीमेचे औचित्य साधुन भारत विद्यालय येथे गुरुपोर्णीमा व वृक्ष लागवडीचा संयुक्तकार्यक्रम भारत विद्यालयाच्या परीसरात संपन्न झाला. भारत विद्यालयातील मुख्या‌द्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली असुन कार्यक्रमादरम्यान सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी विद्यार्थ्याना वृक्षाचे महत्व पटवुन दिले. याप्रसंगी मुख्याद्यापक साहेबराव चव्हाण यांनी विद्यार्थ्याना वृक्ष लावण्याचे आवाहन करुन लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद करतील असे अस्वस्थ केले. भारत वि‌द्यालय परीसरात 160 झाडे वृक्षारोपन करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम क...
Notice to Manpa Lok Adalat to owners of outstanding property | मनपा लोक अदालतसाठी सिडको अंतर्गत ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा -NNL

Notice to Manpa Lok Adalat to owners of outstanding property | मनपा लोक अदालतसाठी सिडको अंतर्गत ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा -NNL

नांदेड
नवीन नांदेड| नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २७ जुलै रोजी लोक अदालतीसाठी होणाऱ्या ११९९ मालमत्ता धारकाकडील थकबाकी असणाऱ्या ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत नोटीसा देण्यात येत असून थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे. नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत एकुण मालमत्ता धारक जवळपास २८ हजार असुन मालमत्ता करापोटी थकीत मालमत्ता कर १८ कोटी ३५ लाख ९३ हजार ७५६ रूपये असुन चालू वर्षीच्या मालमत्ता कर ३कोटी ३ लाख ६५ हजार ६१७ आहे.असा एकुण २१ कोटी ३९ लाख ५९ हजार ३७३ रूपये आहे. मनपा प्रशासन यांच्या वतीने मुख्यालय येथे २७ जुलै रोजी थकीत मालमत्ता करा संदर्भात संबंधित थकबाकीदार असलेल्या मालमत्ता कर धारकासाठी लोक अदालत ठेवण्यात आली असून यात मालमत्ता धारकांना थकीत बाकी रक्...
Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL

Bodhi primary health center building has leaked | बोधडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारतीला लागली गळती -NNL

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर राहणाऱ्या लोकांना प्रथम उपचार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. मात्र हेच प्राथमिक आरोग्य केंद्र जीर्ण अवस्थेत आले असून या परिसरात सर्व साधारण पाऊस झाला तरी अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ईमारती गळत असल्याचे ताजे चित्र बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहावयास मिळत आहे. बोधडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हे मोठ्या प्रमाणात गळत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर येथिल औषधी, आरोग्य साहित्य हे झाकून ठेवावे लागत आहे आणि गळतीच्या ठिकाणी टोपले ठेवावे लागत आहे.अशा परिस्थितीत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाची तपासणी करून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी व स्टॉप कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत...
Voter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – NNL

Voter Special Brief Review Program | नांदेड महापालिका क्षेत्रात मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्य निवडणुक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र दिनांक १२.०७.२०२४ अन्वये भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित दिनांक २५ जुलै ते दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) संदर्भात प्रचार प्रसिध्दी करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार नवमतदारांचे नाव नोंदणी, मतदारांच्या नाव/पत्त्यातील बदल, स्थलांतरीत मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी इत्यादीसांठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणी साठी व दुरुस्तीसाठी www.voter.eci.gov.in हे संकेत स्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲपवरून ऑनलाईन प्रक्रीयेची सुविधा उपलब्ध आहे. तरी या कार्यक्रमाची महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी व नागरिकांनी नोंद घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे करण्यात येत आहे....
Average 10 mm in the district – जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस – NNL

Average 10 mm in the district – जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस – NNL

नांदेड
नांदेड | जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 372.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 9.70 (345.90), बिलोली-8.20 (417.10), मुखेड- 3.60 (412.30), कंधार-2 (383.10), लोहा-5.70 (371.80), हदगाव-11.70 (300.70), भोकर-19.10 (332.10), देगलूर-4.20 (325.90), किनवट-16.50(480.10), मुदखेड 15.60 (397.10), हिमायतनगर- 12.70 (341.90), माहूर- 10 (359.40), धर्माबाद- 12.70 (442), उमरी- 14.60 (316.20), अर्धापूर- 19 (420), नायगाव-9.90 (267.70) मिलीमीटर आहे....
rural fellowship – प्रथम येणा-या विद्यार्थ्‍यास ग्रामीण फेलोशिप देवून गौरव करण्यात येणार – NNL

rural fellowship – प्रथम येणा-या विद्यार्थ्‍यास ग्रामीण फेलोशिप देवून गौरव करण्यात येणार – NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्‍हा परिषद आणि शासन स्‍तरावील राबविण्‍यात येणा-या विविध योजनाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्‍यासाठी तसेच अभ्‍यासपूर्ण उपाययोजना सुचविण्‍यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक (Rural Fellows) हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून आज त्‍यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. जिल्‍हा परिषदेच्‍य यशवंतराव चव्‍हाण सभागृहात घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात उच्‍च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. किरणकुमार बोंदार, माध्‍यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, सहाय्यक शिक्षण उप निरिक्षक हनुमंत पोकळे, सांखिकी विस्‍तार अधिकारी सुधीर शिंदे आदींची उपस्थिती होती. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यावेळी म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागात केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध यो...
हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL

हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,दत्ता शिराणे। हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम म्हणायला सुरू आहे. परंतू कामाला कुठलीच गती नसल्याने काम थांबूनच आहे. रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला असल्यानै प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने वेगाने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पतंगे यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या कामाला जवळपास तिन वर्षापुर्वी मंजूरी मिळाली. ...
error: Content is protected !!