Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL

Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL

धार्मिक, नांदेड
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींसाठी राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” यासाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट आहे. या योजनेसाठी 60 वर्षावरील नागरिकांनी सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत. 30 हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे. कशी आहे योजना ? भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा...
Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

Ban on flying man-made objects with drone | नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 26 ते 30 जुलै 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 30 जुलै 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी राऊत यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे....
blood donation camp was organized | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजन – NNL

blood donation camp was organized | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजन – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजक दिलीपसिंह भागिले समन्वयक नांदेड दक्षिण विधानसभा यांच्या कडून महाभव्य रक्तदान शिबीर व अन्नदान वाटप २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सिडको मुख्य रोडवरील श्री साई मोटर्स लातूर फाटा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रथमच यावर्षी नांदेड समन्वयक दिलीपसिंह बाबुसिंह भागिले यांच्याकडून महाभव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे ऊदघाटक नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार,नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख बंडु खेडकर,डॉ.सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महिला जिल्हा संघटक नांदेड वत्सलाताई पुयड, माजी ऊपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड दक्षिण उपजिल्हा प्रमुख व्यंकोबा येडे, भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे,नांदेड दक्षिण तालुक...
Democracy Day on 12th August | विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

Democracy Day on 12th August | विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

छत्रपती संभाजीनगर, नांदेड
छत्रपती संभाजीनगर| विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. विहित नमुना अर्ज प्रप्रत्र-1 (क) आवक शाखेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत पुर्व अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, खोकडपुरा औरंगाबाद तथा सदस्य सचिव यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा...
the peacock flourished its feathers | पाऊस आला… मोराने पिसारा फुलवला – NNL

the peacock flourished its feathers | पाऊस आला… मोराने पिसारा फुलवला – NNL

फोटो गॅलरी, नांदेड
सध्या सजिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु आहे, या पावसाच्या ढगांनी अचानक गर्दी केली आणि पावसाच्या सारी कोसळल्या. पाऊस येणार म्हंटल कि मोरांचा त्याची चाहूल लागते पाऊस येण्याचा आनंद व्यक्त करताना मोर पिसारा फुलवत नृत्याला प्रारंभ केल्याच्या चित्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात पाहावयास मिळाले आहे.
Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी अभ्यासकेंद्रास शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नांदेड विभागीय केंद्रातून प्रवेश संख्येमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले आणि केंद्रसंयोजक तथा उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड यांचा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माहूर परिसरातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच मुंबई , पुणे येथील कंपनीमध्ये नोकरी करून संसार चालविणाऱ्या युवांचे शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांनाही दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे या उदात्त हेतूने बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी २००४ मध्ये या अभ्यासकेंद्रास मान्...
Agricultural school | आदर्श गाव मौजे नागापूर येथे कृषी विभागाची सोयाबीन पिकशेतीशाळा; शेतकऱ्यांचा प्रतिसाद – NNL

Agricultural school | आदर्श गाव मौजे नागापूर येथे कृषी विभागाची सोयाबीन पिकशेतीशाळा; शेतकऱ्यांचा प्रतिसाद – NNL

कृषी, नांदेड
भोकर| महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर येथील तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व येथील मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकतीच निवड करण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील आदर्श गाव मौजे नागपूर येथे राज्य पुरस्कार एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी घेतली. यावेळी येथील कृषी सहाय्यक दिलीप काकडे यांनी सदरील शेतीशाळेत सोयाबीन पिकाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिकता तन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल सविस्तर मार्गदर्शक केले. तसेच नॅडप/वर्मी कंपोस्ट तयार करणे,निंबोळी अर्क 5% तयार करणे ची प्रात्यक्षिक व दशपर्णी अर्क, बिजामृत,जीवामृत त...
Drizzling rain everywhere in Himayatnagar taluka | हिमायतनगर तालुक्यात चौथ्या दिवशी देखील सर्वदूर रिमझिम पाऊस; सुर्य दर्शन नाही; शेती कामे खोळंबली – NNL

Drizzling rain everywhere in Himayatnagar taluka | हिमायतनगर तालुक्यात चौथ्या दिवशी देखील सर्वदूर रिमझिम पाऊस; सुर्य दर्शन नाही; शेती कामे खोळंबली – NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले असून, खरिप पेरणीतील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, ही पिके बहरात आली आहेत. तालुक्यात सध्यातरी पिक परीस्थिती बर्‍यापैकी दिसून येत असली तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान सर्वदूर सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतीकाम खोळंबली असल्याचे दिसून येत असून, तालुक्यात आजपर्यत ३८३.७० मी. मी. पाऊस झाला आहे. हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून पेरणी क्षेत्र ३९ हजार चारशे चौर्हेचाळीस आहे. यावर्षी कपाशीचा पेरा घटला असून, नगदी पीक सोयाबीनचा पेरा प्रकर्षानं वाढला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान तालुक्यात ८६७. ३० मी. मी. पाऊस सरासरी अपेक्षित आहे. मात्र यावर्षी रोहिण्या संपूर्णतः कोरड्या गेल...
Draupadi Murmu | राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना बळीरामपूर नांदेड तिर्थक्षेत्रास भेट देण्याचे विश्वस्थांकडून निमंत्रण – NNL

Draupadi Murmu | राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना बळीरामपूर नांदेड तिर्थक्षेत्रास भेट देण्याचे विश्वस्थांकडून निमंत्रण – NNL

नांदेड, देश विदेश
नविन नांदेड| देशाच्या सर्वोच्च पदावर एका आदिवासी लाडक्या बहिणीची आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा संदेश दिला आहे. त्यांचा हा निर्णय सर्व मागास जाती- जमाती व सर्व महिलांच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल करणारा ठरेल व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल असे उद्गार श्री संत रोहिदास महाराज मंदिर तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेडचे मागील 40 वर्षापासूनचे संस्थापक सचिव वामनराव विष्णुपूरीकर यांनी दै. प्रजावाणी नांदेड दि. 29 जुलै 2022 रोजीच्या माध्यमातून व्यक्त केले होते. सदरील तिर्थक्षेत्राचे प्रमुख विश्वस्त, तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील मॅडम, तत्कालीन राष्ट्रपती भारत सरकार यांची त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा पास क्रं. 002549 अन्वये दि. 3 नोव्हेंबर 2008 रोजी रितसर प्रत्यक्ष भेट घेऊन तिर्थक्षेत्राच्या विकास ...
Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे. इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जु...
error: Content is protected !!