Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

नांदेड, करियर
नांदेड| राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज नांदेड जिल्ह्यामध्ये झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते दोन तरुणांना नियुक्तीपत्र देऊन या प्रशिक्षण योजनेची प्रतिनिधिक स्वरूपात सुरुवात जिल्ह्यात आज करण्यात आली. कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा यादृष्टीने ही ६ महिन्यांच्या नियुक्तीची योजना आहे. याचबरोबर उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ या योजनेद्वारे घडविता येणार आहे. आज दुपारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे पहिले कार्यादेश प्रदान करण्यात आले.सुप्रसाद सूर्यकांतरा...
Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL

Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्यातील सर्व धर्मियांमधील जेष्ठ नागरिकांना भारतातील 73 व राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आता शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे पूर्ण करता येणार आहे. जे नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांच्यासाठी भारतातील आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येइल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन , निवास इ. सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक आहे. वय वर्षे 60 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त न...
 Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL

 Nandagiri fort | नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| गोदाकाठी वसलेला नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली. जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ल्यास आ. मोहनराव हंबर्डे यांनी भेट देवून पाहणी केली.त्यांच्यावतीने किल्ला परिसरात दगडी चुरी टाकण्याचेही काम सुरु करण्यात आले.ते म्हणाले, हा किल्ला म्हणजे नांदेड जिल्ह्याची शान असून किल्ल्याला ऐतिहासीक वारसा आहे.गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याचे उत्तम संवर्धन आणि डागडुजी केल्यास देश -विदेशातील पर्यटकांसाठी नंदगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरणार ...
Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण – NNL

Plantation of trees by judges in the court | हिमायतनगर येथील न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| हिमायतनगर येथील दिवानी न्यायालयांच्या परिसरामध्ये न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. दि. २९ सोमवारी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश कि. रा. खोंद्रे यांच्या संकल्पनेतून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम न्यायालयात दि. २९ सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान पार पडला. न्यायालयांच्या परिसरात पिंपळ, वड, जांभूळ, कडुलिंब अश्या विविध गुणकारी एकूण ६३ वृक्षांची लागवड न्यायाधीश खोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश व तालूका विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड, विशेष सरकारी वकील अँड. श्रीमती कोरेवाड, महिला संरक्षण अधिकारी संदिप कदम, नगरपंचायतीचे ओएस महाजन, आदींसह न्यायालयीन कर्मचारी, हिमायतनगर शहरातील जेष्ठ एडवोकेट दिलीप राठोड, इतर ...
farmers are deprived of remuneration | प्रशासकीय मान्यता मिळाली तरीही शेतकरी मोबदल्यापासून वंचित – NNL

farmers are deprived of remuneration | प्रशासकीय मान्यता मिळाली तरीही शेतकरी मोबदल्यापासून वंचित – NNL

नांदेड, कृषी
नांदेड| जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात ई. स. २०१८ मद्ये झालेल्या अंतीम वर्क आऊट मद्ये नांदेड जिल्हा प्रशसनाच्यावतीने खाजगी वाटाघाटी अंतर्गत तलबीड येथील शेकऱ्यांची जमीन जलयुक्त शिवार प्रकल्पसाठी अतिरिक्त भूसंपादन केली गेली. सदरील काम पूर्ण होईन ७ते ८ वर्ष उलटून गेली आजपर्यंत शेतकऱ्याना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला गेलेला नाही. या अगोदरही शेतकऱ्यांनी संबधीत कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्यावर अद्याप कोणतीही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय ,बिलोली येथील उपविभागीय SDM ऑफिस, जिल्हाजलसंधारण अधिकारी ऑफिस येथे वारंवार पत्रव्यवहार केला. समक्ष संबधीत ऑफिस मध्ये जाऊन निवेदन दिले तरी तेथील अधिकारी कर्मचारी आपले हातवर करीत माहिती गोळा करून देतो असे सांगत वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित आहेत. जमीन संपादित करून 8 वर...
Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL

Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लाइफस्टाइल
छत्रपती संभाजीनगर| येथे आयोजित राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती यांचा समाज गौरव पुरस्कार समारंभात यावर्षीचा समाजरत्न पुरस्कार नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांना देऊन सन्मानित करण्यात आला. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला होता त्यामध्ये किन्नर समाजासाठी आपले अमूल्य योगदान देऊन उन्नतीसाठी काम करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवाणी यांना विविध मान्यवरांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्काराचे उत्तर देत असताना डॉ. जेठवाणी यांनी तृतीयपंथी समुदाय सध्या उन्नतीच्या मार्गावर लागलं आहे त्यासाठी शासकीय व अशासकीय पात्रावर विविध काम सुरू झाले आहेत परंतु हा मार्ग खडतर असून त्याचे फक्त सुरुवात झाली आहे याचे यश मिळण्यासाठी खूप कालावधी लागेल पण आपण नक्की प्राप्त करू असे उद्गारवाचक भा...
Adv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL

Adv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या किनवट/माहूर विधानसभेत आमदारकीच्या उमेदवारी वरून भाजपाच्या ईच्छूकान मध्ये घमासान रंगले आहे. त्यातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अविनाश राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीकरीता आपली तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून सत्ता पक्षाचेच आमदार विद्यमान स्थितीत किनवट /माहूर क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. दरम्यान भाजपने संधी दिली तर आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेती व रोजगार या ज्वलंत मुद्यांवर निवडणूक लढणार असल्याची इच्छा ॲड.अविनाश राठोड यांनी त्यावेळी व्यक्त केली. सदर काही मुद्यांना विधानसभा मुकली असून आपल्या कल्पनेतील विधानसभा कृतीतून खरी करून दाखविणार असल्याचे मत त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना राठोड यांनी व्यक्त केले. स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि.२९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत आयोजन करण...
An unknown thief looted an amplifier worth 70 thousand | हिमायतनगरातील लकडोबा हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने ७० हजाराचा ऍम्प्लिफायर लंपास केला – NNL

An unknown thief looted an amplifier worth 70 thousand | हिमायतनगरातील लकडोबा हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने ७० हजाराचा ऍम्प्लिफायर लंपास केला – NNL

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील गजबजलेल्या लकडोबा चौक वस्तीत असलेल्या हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने पावसाच्या सरी आणि शांततेचा फायदा घेऊन अंदाजे ७० हजार रुपये किमतीचा अहुजा कंपनीचा ऍम्प्लिफायर चोरून नेला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, चोरटा अंगावर भगवी दस्ती खांद्यावर टाकून एम्प्लिफायर घेऊन जात असल्याचे दिसत असल्याने पोलीस या दिशेने तपास सुरु केला आहे. हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडत असताना यावर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहरात पावसाची संतधर सुरु आहे, या संधीचा फायदा घेत हिमायतनगर शहर व परिसरात चोरटे सक्रिय झाले आहेत. पावसाची रिपरिप चालू असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून अज्ञात चोरटे दुकान फोडणे, घरफोडी करणे, मंदिरातून व इतर ठिकाणाहून साहित्य चोरून येणे आदि छोट्या-मोठ्या चोर...
Siranjani Bypass muddy road | सिरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लाऊन युवकांनी केला गांधीगिरी मार्गाने निषेध – NNL

Siranjani Bypass muddy road | सिरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लाऊन युवकांनी केला गांधीगिरी मार्गाने निषेध – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| सिरंजनी बायपास रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने सिरंजनी, एकंबा,कोठा येथील युवकानी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत रस्त्यावर वृक्ष लावून आमदार खासदार व प्रशासनाचा जाहीर निषेध केला. तात्काळ या रस्त्याची नोंद घेऊन कायम समस्या सोडवावी अन्यथा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत राजकीय नेत्यांचा दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हिमायतनगर आद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून सिरंजनी, एकंबा, कोठा गावाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन रस्ता जीवघेणा बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाच्या बसला चिखलातून जाणे येणे करणे अवघड झाले आहे. पावसामुळे तर अक्षरशः बस बंद पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा विचार ...
Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL

नांदेड, आरोग्य
हिमायतनगर| प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर (वाढोणा) द्वारा आयोजित नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना सप्ताहभर उपचार दिला जाणार आहे. या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे साप्ताहीक उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय जि. नांदेड येथे अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीर दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताहात दररोज सकाळी 9 ते दु.1 आणि दु.4 ते सायं. 8 वाजेच्या दरम्यान अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे कुमार (जोधपुर राजस्थान) मो. 7976498807 आणि जितेंद्र सिंह (जोधपुर राजस्थान) प्रमोद मो. 9782386341 हे उ...
error: Content is protected !!