Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Apply to the Group Development Officer | समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा – NNL

Apply to the Group Development Officer | समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मागास वर्गीयांना सामाजिक आर्थिक विकासासाठी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड उपकर 20 टक्के सेस मागासवर्गीय कल्याण निधी 2024-25 अंतर्गत नऊ योजनांबाबतचे अर्ज 10 ऑगस्टपर्यत मागविण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने परिपूर्ण अर्जाचा प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात 10 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केला आहे. या योजनांमध्ये मागासवर्गीय झेरॉक्स, (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशिन) वाटप करणे, मागासवर्गीय प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थीनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय मिरची कांडप पुरविणे योजना, मागास- वर्गीयांना...
District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

District Health Officer Dr. Sangita Deshmukh | जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी किनवट तालुक्‍यास भेट – NNL

आरोग्य, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्‍हा परिषदेच्या जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच किनवट तालुक्‍यातील सहस्‍त्रकुंड येथील मुलींच्‍या आश्रम शाळेस व मुलींच्‍या वसतीगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधून त्यांना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्‍यमान आरोग्‍य मंदीर केंद्र, इस्‍लापूर येथे भेट देऊन औषधी भांडार, लसीकरण विभा्र, शस्‍त्रकिया कक्ष, व उपलब्‍ध आरोग्‍य सुविधांची पाहाणी करुन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांचा आढावा घेतला. तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना हिवताप, डेंग्‍यू तसेच पाण्‍याची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्‍या. यावेळी त्यांनी आरोग्‍य संस्‍थेच्‍या इमारतीमध्‍ये उणीव असलेल्‍या इमारतींमध्‍ये बांधकाम, पाणी पुरवठा व ग्राम पंचायत विभाग यांच्‍याशी समन्‍वय साधून उणीवा दूर करण्याबाबत सांगितले. जिल्‍हा आरोग्‍य अधिका...
Leopard on the prowl in Mahur town | माहुर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकात दहशत – NNL

Leopard on the prowl in Mahur town | माहुर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकात दहशत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहुर शहरात बिबट्याचा वावर सुरु असल्याचे चित्र समाजमाध्यवर फिरत असल्याने शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मासाचे तुकडे व कुत्र्याचे मास प्रिय असल्यामुळे बिबट्याचा शहरात वावर दिसून येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे. जंगल व शेवटच्या टोकाला असलेल्या शहरातील देवदेवेश्वर मंदिराच्या खाली महानुभाव पुऱ्यात सोमवार दि.२९ जुलै रोजी रात्री ११ वा. सौरऊर्जेच्या खांबाखाली राजेश मधुकर आराध्ये व संदीप भगवंतराव गोरडे यांना बिबट्या दिसून आला. या दोघांनीही दाराच्या आडून त्याचे छायाचित्र काढले असून, सध्या ते संजमाध्यमवर फिरत आहेत. शहरात बिबटच्या वावर होत असल्याच्या चर्चा आता नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहुर शहरात या अठवड्यात न्यायालय, सोनापीर दर्गा परिसर व मालवाडा घाटात बिबट्या दिस...
डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

नांदेड, आरोग्य
भोकर| नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांची आज ग्रामीण रुग्णालय भोकर भेट दिली व विविध विभाग यांची पाहणी केली. रूग्णांना योग्य वेळेत उपचार व सुविधा देण्यात यावा. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला व सूचना दिल्या. यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, डॉ मोहिनी पाटील, डॉ अनंत चव्हाण, डॉ नितीन कळसकर, डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ सारिका जावळीकर, डॉ शिल्पा कळसकर, डॉ सविता कांबळे, डॉ मायादेवी नरवाडे, सत्यजीत टिप्रेसवार, गंगामोहन शिंदे, मनोज पांचाळ, संजय देशमुख, प्रल्हाद होळगे,बालाजी चांडोळकर, मल्हार मोरे, प्रकाश सर्जे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....
Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

लाइफस्टाइल, नांदेड
हिमायतनगर| राज्याचे वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर उमरखेड रोडवर असलेल्या राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल परिसरात आर्यवैश्य समाज बांधवाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. दि. ३० मंगळवारी राज्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून, हिमायतनगर शहरातील राष्ट्र साधना पब्लिक स्कूल मध्येही आर्यवैश्य समाजांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्याम रायेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री रायेवार म्हणाले की, आर्यवैश्य समाज इतर समाजाला दिशा देण्याचे काम सातत्यानं करीत आला आहे. आणी म्हणून यापुढेही आपण समाज बांधवांनी राज्याचे वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प करावा. नुसत...
Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

Abolish caste certificate issued to Maratha community from OBC category | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर कडकडीत बंद – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी कवाणा तालुका हदगाव जी.नांदेड येथे सुरु केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी करत हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन शहरातील मुख्य रस्त्याने एक ओबीसी लाख ओबीसी... आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं... अश्या घोषणाबाजी करत भव्य रैली काढली. यामध्ये नांदेड, हदगाव, किनवट येथील ओबीसीं समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील शेकडो ओबीसी बांधव सामील झाले होते. ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवाणा येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. आजघडीला उपोषणाला दहा दिवस उलटले मात्र अद्याप...
Pradhan Mantri Crop Bima Yojana | प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दोन दिवस -NNL

Pradhan Mantri Crop Bima Yojana | प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दोन दिवस -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस उरले असून या योजनेत ज्यांनी विमा काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता केवळ १ रुपया भरुन PMFBY पोर्टल http://pmfby.gov.in वर स्वत: शेतकऱ्यांना तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्रांमार्फंत योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू झाली असून सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील ज...
Let’s give priority to people’s development along with party organization | काॅग्रेसच्या माध्यमातून तरोड्यातील पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्राधान्य देऊ -NNL

Let’s give priority to people’s development along with party organization | काॅग्रेसच्या माध्यमातून तरोड्यातील पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्राधान्य देऊ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| स्वातंत्र्यपूर्वकाळापासून देशप्रेम व जनहित,धर्मनिरपेक्ष भारत देशासाठी कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये श्रेष्ठीने आपणांस दिलेल्या पदाच्या माध्यमातून पक्षसंघटनवाढीसह जनविकासाला प्रथम प्राधान्य देऊन कर्तव्यतत्पर राहू व पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे नवनियुक्त शहर जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या शूभहस्ते व नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव पाटील चव्हाण,आ.मोहन हंबर्डे,शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व महेश देशमुख तरोडेकर यांची नुकतीच नियुक्ती करुन त्यांना तसे,नियुक्तीपत्र मुंबई प्रदेश कार्यालयात नुकतेच प्रदान करण्यात आल्यानंतर त्...
ओळखीचा पुरावा असतानाही ग्रामसेवक पदासाठीच्या परिक्षेपासून वांचित ठेवल्याची तक्रार -NNL

ओळखीचा पुरावा असतानाही ग्रामसेवक पदासाठीच्या परिक्षेपासून वांचित ठेवल्याची तक्रार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| ओळखीचे पुरावे असतानाही परिक्षेला बसू न दिल्याची तक्रार ग्रामसेवक पदासाठी परीक्षा देणार्या उमेदवार मिनाबाई सूर्यवंशी यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. दि.29 जुलै रोजी सहयोग कॅम्पस येथे ग्रामसेवक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान परिक्षेसाठी आलेल्या काही महिला उमेदवारांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आदी ओळखीचे पुरावे असतानाही पॅनकार्डवर पतीचे नाव वर आणि वडिलांचे नाव खाली असल्याच्या कारणावरुन परिक्षेत बसू देण्यात आले नाही. या प्रकारबाबत विचारले असता परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी उलट महिला उमेदवारांशी हुज्जत घातली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन ग्रामसेवक पदासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी मिनाबाई सूर्यवंशी यांनी सुरवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी निवेदन न स्वीकारल्याने त्यांनी जिल्ह...
Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

करियर, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, 9 वी 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 5 वी ते 7 वी आणि इ. 8 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती,महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजना इ. योजना राबविण्यात येत आहेत...
error: Content is protected !!