Thursday, July 9

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी येथी ल साईबाबा मंदिर येथून द 6 ऑगस्ट रोजी शिर्डी कडे प्रस्थान करणार असून या पालखी सोहळ्यास खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आरती व मान्यवरांच्या उपस्थित या पदयात्रेची सुरूवात होणार आहे. दर वर्षी प्रमाणे सलग 13 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा सिडको येथून प्रस्थान करणार आहे,या पदयात्रेत जवळपास १०० भाविक भक्त सहभागी होणार असून ही यात्रा ४१७ किलोमीटर आहे,यात पहिल्या दिवशी सिडको ते मरळक, आरळ, परभणी, पाळोदी, पाथरी, आष्टी, पिपरखेडा, घुंगरडे, हदगाव, ऊचेगाव, पैठण, भायेगाव, नेवासा मार्ग शिर्डी २० आगस्ट रोजी ही पदयात्रा पोहचणार आहे. ६ आगस्ट रोजी या पदयात्रा शुभारंभ खासदार अशोकराव चव्हाण ,माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर ,नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभ सोह...
डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL

डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती नांदेड शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील डॉ.अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर येथे डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रयत सेवाभावी संस्थेचे संचालक कॉ.इरवंत सूर्यकार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर,संविधान उद्देशिका व वृक्ष वाटप करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड तर या शिबिराला माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,दिलीप कंदकुर्ते,बालाजी बच्चेवार,कॉ.उज्वला पडलवार, कॉ.आशा गायकवाड,आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड,डी. एन.गवळी, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक सतीश जी कावडे, परमेश्वर बंडेवार,शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, प्रा.डॉ.माधव बसवंते,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे, माजी सभापती जिं.प. नांदेड डॉ.दिनेश निखाते, शंकर ग...
अदिम ठाकूर जमात मंडळ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने प्रबोधन मेळाव्याचे आयोजन – NNL

अदिम ठाकूर जमात मंडळ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने प्रबोधन मेळाव्याचे आयोजन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सर्व ठाकूर-ठाकर आदिवासी बंधू-भगिनीनी समाज प्रबोधन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे अदिम ठाकूर जमात मंडळ राज्य शाखेने केले आहे. आदिम ठाकूर जमात मंडळ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी (रविवारी) सकाळी ठीक 11.00ते5.00 यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी ठाकूर ठाकर बंधू भगिनींसाठी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये,ठाकूर ठाकर समाजा विषयी संपूर्ण माहित,ठाकूर-ठाकर जमातीचे प्रमाणपत्र मिळविणे, वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठीची माहिती सेवानिवृत्त बंधू-भगिनीचा सत्कार,नांदेड जिल्ह्यातील आदीम ठाकुर जमात मंडळाची नूतन कार्यकारणी निर्मिती करणे,समाज बंधू भगिनींना उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेले बी फॉरमॅटमधील सर्टिफिकेट सी फॉरमॅटमध्ये आणा त्याशिवाय वैद्यता होणार नाही हे सहयुक्तच्या लेखी आदेशाला कोर्टात आव्हान देणे व बी फॉरमॅट मधील सर्टिफिकेटचीच पडताळणी करू...
Satyanarayan Maharaj Khude passed away | सोनपेठ मठाचे मठाधिपती सत्यनारायण महाराज खुडे यांचे अल्पशा आजाराने निधन – NNL

Satyanarayan Maharaj Khude passed away | सोनपेठ मठाचे मठाधिपती सत्यनारायण महाराज खुडे यांचे अल्पशा आजाराने निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| सोनपेठ जलधरा मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री सत्यनारायण महाराज गणपत खुडे यांचे आज दिनांक 3 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचे किनवट माहूर तालुक्यामध्ये हजारो भक्त गण होते. ते जलधरा येथील डॉक्टर चांगदेव खुडे यांचे वडील असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौ. रंगुबाई चांगदेव खुडे यांचे ते सासरे आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षण क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत काम करणारी कर्मचारी असलेले त्यांना चार नात जावई चार नाती दोन नातू व दोन सुना असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहेत. परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचा अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता जलधरा येथील महादेव मंदिराच्या परिसरामध्ये होणार असून पंचक्रोशीतील हजारो भक्तगण या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या देवाज्ञांनी...
free diagnosis and treatment camp : लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावतीने तामसा येथे रविवारी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर – NNL

free diagnosis and treatment camp : लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावतीने तामसा येथे रविवारी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर – NNL

आरोग्य, नांदेड, हिंगोली
हदगाव, शेख चांदपाशा| तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार असून, रुग्णांची कुठल्याही आजारावरील शस्त्रक्रिया व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त, लघवी चाचणी, ई.सी.जी. सिटीस्कॅन, एम.आर.आय.इत्यादी चाचण्या मोफत करण्यात येणार असणं, रुग्णास हॉस्पिटलला जाण्याचा खर्च, भरती रुग्णांना खाट शुल्क व जेवण मोफत असणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे तामसा येथे आयोजन बाबुराव कदम कोहळीकर (जिल्हाप्रमुख शिवसेना, नांदेड) यांच्या वतीने रविवार ०४-ऑगस्ट -२०२४ रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात पुढील आजाराची तपा...
Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

नांदेड, राजकीय
लोहा /माळाकोळी| विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीच्या आरक्षणास धोका नाही तो खरा निवडणूक झाल्यानंतर आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभेत किमान शंभर आमदार ओबीसींचे निवडणूक जाणे गरजेचे आहे. मनोज जरांगेंच्या अवास्तव मागणींमुळे व दादागिरीच्या वागण्यामुळे ओबीसी समाज एकवटला आहे. त्याच्यात राजकीय जागृती झाली ही आनंदाची बाब आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन होताच माळेगाव यात्रा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. लोहा विधानसभा मतदार संघात वंचित "कडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले .तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने त्याचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यात आले. माळाकोळी येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित ओबीसी मेळाव्यास ऍड प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले.वंच...
Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL

Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| हिमायतनगर येथे साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातही ठिक ठिकाणी जयंतीच्या औचित्याने अभिवादन सभा घेण्यात आल्या आणि अन्नदान करण्यात आले आहे. हिमायतनगर शहरात डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने संजीवनी हाॅस्पीटल येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व तसेच परमेश्वर मंदिर परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाळासाहेब खानजोडे , संतोष हातवेगळे, संतोष बनसोडे, सुभाष दारवंडे, गंगाधर गायकवाड, संजय गुंडेकर, अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप गुंडेकर, डाॅ. प्रेमकुमार वाघमारे, सचिन वाघमारे, बालाजी ...
Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL

Ad Prakash Ambedkar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका – एड प्रकाश आंबेडकर-NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| ओबीसी आणि मराठा ताट वेगळे आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची भूमिका आहे. जर आमच्या हातात सत्ता आली तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा वेगळा मार्ग आम्ही काढू. मात्र मराठा व ओबीसी समाजातील ‎वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी ‎घेत आहेत. महाराष्ट्राचे मणिपूर करू ‎‎नका, हे शरद पवार यांचे वक्तव्य ‎आग लावणारे आहे. तसेच ‎‎आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र‎ मोदींकडे जावे, जागा वाढवून घ्या,‎असे ठाकरे यांचे वक्तव्य‎ चिथावणीखोर आहे. असा आरोप‎ एड प्रकाश आंबेडकर यांनी केला‎ आहे. ते आरक्षण बचाव यात्रेच्या मंचावरून बोलत होते. ‎‎शुक्रवारी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आल्यानंतर एड प्रकाश आंबेडकर यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं. ‎ जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ‎माळेगाव येथून यात्रेला शुक्रवारी‎ प्रारंभ झाला. माळेगाव येथील प्रसिद्ध ‎श...
Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

Biloli police : बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने सुनावला पाच वर्षाचा सश्रम कारावास – NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड| खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश्या विविध गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पकडून गजाआड केले. आणि बिलोली पोलीसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा झाली होती. पोलिसांनी सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा कारागृह नांदेड येथे शिक्षा भोगण्याकरीता सोडले आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, सरकारी कामात अडथळा करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणी वसुल करणे अश गुन्हयातील फरार आरोपीतां विरूध्द मा. न्यालयाने काढलेल्या पकड वॉरंटातील आरोपीस पकडुन त्याचे विरूध्द योग्य ती प्रतिबंधात्व कार्यवाही करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि. अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते.यातील फिर्यादी नामे गोदावरी हिने यांनी दिन...
दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मनोज कीर्तने यांचा पाठपुरावा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे तत्कालीन सरपंच विमलबाई बळीराम पवार आणि ग्रामसेवक एल.एल.पपुलवाड यांनी संगणमताने कसल्याही प्रकारचे विकास कामे न करता ग्रामपंचायत दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगातील निधी तेरा वेळा उचलून रक्कम हडप केली आहे. त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी असा लेखी अहवाल पंचायत समिती माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दि.८ऑगस्ट २०२२ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी अहवाल देवून दोन वर्ष झाली. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने दत्तमांजरी येथील माजी उप सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज किर्तने कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार...
error: Content is protected !!