Saturday, July 11

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Goshalas are requested to apply ; गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा तालुक्यामधून पात्र व इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे. सर्वसाधारण अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. भारत पशुधन प्रणालीवर गोशाळा मालकाची व गोशाळेत असलेल्या पशुधनाची नोंद असणे बंधनकारक आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवालात नमुद पशुधनाच्या नोंदीनुसारच अनुदान देय राहील. या संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखा परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत क...
Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

नांदेड, लेख
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 9 ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. 1. नागपंचमीचा इतिहास : सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, अस...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाने आज ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या तीन दशकामध्ये या संकुलाने अनेक विद्यार्थी घडविले. दरवर्षी या संकुलातील १५ ते २० विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण होतात. यावर्षीही १२ विद्यार्थ्यांनी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संकुलामधील बरेच विद्यार्थी बाहेर देशात चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. शिवाय या संकुलामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी उच्च प्रतीची दुर्बीण, टाईम डोमेन रोफलिटोमीटर, नॅनो मटेरियल प्रयोगशाळा इत्यादीसह अनेक उच्च प्रतीची उपकरणे उपलब्ध आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते. त्यामुळे गेल्या तीन दशकातील या संकुलाची वाटचाल ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि. ८ ऑगस्ट ...
Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी गुरुवार रोजी नांदेड येथे आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या शहर जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी चैतन्य नगर परिसरातील एम. के. फंक्शन हॉल येथे युवा संवाद मिळाव्यास संबोधित करत असताना युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे अशा सूचना केल्या. त्यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण हे उपस्थित होते. महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमुळे महिला स्वालंबी बनणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 17 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा अधिक महिलांना लाभ व्हावा, यासाठी युवकांनी ला...
मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांनी नांदेड येथील दैनिक नेता नगरीचे संपादक विजयकुमार सितळे यांची मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी निवड केली व निविडिचे पत्र श्री श्री श्री महंत राम भारती गुरु महाराज नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,नुकतीच शिवाजीनगर जालना येथे मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील श्री महंत राम बापू भारती महाराज हे होते. यावेळी मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषद संघटनेच्या वाढीविषयी चर्चा झाली. पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी तसेच पत्रकार संघटनेच्या प्रचार प्रसार करून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची निव...
किनवट जिल्हा करा इस्लापूर मांडवी तालुका करा या मुख्य मागणीसाठी मा. क .पा.चे इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन -NNL

किनवट जिल्हा करा इस्लापूर मांडवी तालुका करा या मुख्य मागणीसाठी मा. क .पा.चे इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने क्रांतीदिनाच्या पुर्वदिनी शेकडो शेतकरी-कष्टकर्यांचा रास्ता रोको आंदोलन इस्लापुर नाका परिसरा त मा.क.पा नेते काॅ.अर्जुन आडे यांच्या नेत्तुत्वात सपंन्न झाले. या आंदोलनामध्ये किनवट जिल्हा करा इस्लापूर, मांडवी, या गावांना तालुक्याचा दर्जा द्या या प्रश्नावर आक्रमक रित्या इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन छेड्यात आले. कापसला १२ हजार,सोयाबिणला ८ हजार हामीभाव जाहीर करा, शेतकर्यांची संपुर्ण कर्जमुक्ती जाहीर करा,रोजगारासाठी वनवण भटकनार्या मजुरांना गावातच कामसाठी रोजगार हामी योजनेची प्रभावी अमलबजावणी करुन ५०० रु मजुरी द्या, मंजूर घरकुल तातडिणे वाटप करुण अनुदान रक्कम ५ लाख करा,कसत असलेल्या ताब्यातील वन जमीन,गायराण जमीनीचे मालकी हक्क द्या,स्मार्ट वीज मीटर बिल वापस घ्या या मागण्याचे निवेदण ईस्लापुर पो.स्टेशनचे सह्यायक पोलीस निरिक्षक उमेश भोसल...
विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

करियर, नांदेड
लोहा। विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांना भाषा गणित याचे आकलन झाले पाहिजे. अध्ययन निष्पत्ती झाली पाहिजे आता कागदावर गुणवता टिकणार नाही. ती वास्तवात उतरली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी केले. शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत तपासणी बिईओ सतीश व्यवहारे यांनी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे,केंद्र प्रमुख डी आर शिंदे , केंद्र प्रमुख बाबुराव फसमले ,यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली मुख्याध्यापक यांच्या प्रशासनाचा गौरव केला शिक्षकांनी गुणवता वाढवावी तसेच विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान आले पाहिजे ,अध्ययन निष्पत्ती निश्चित करताना पुन्हा पडताळणी होणार आहे. असे सांगून बिईओ यांनी महत्वाच्या सूचना दिल्या. ...
Kinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

Kinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दि. ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार चाचपणी करण्यासाठी विधानसभाक्षेत्रात भगवा सप्ताह अभियानास सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी करीत असल्याने विधानसभा संपर्क प्रमुख वेदप्रकाश पाठक हे किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात दि.४ ते ११ ऑगस्ट दरम्यान गावोगावी जाऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेत येथील अहवाल पक्षश्रेष्ठी यांच्याकडे सोपविणार आहे. यामुळे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या भगवा सप्ताह संपर्क अभियाना दरम्यान उमेदवार चाचपणी करतांना वेदप्रकाश पाठक विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, सुनिल गायकवा...
Ashok Chavan Nanded | नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का; डी. पी. सावंतांनी काँग्रेसकडून मागितली उमेदवारी

Ashok Chavan Nanded | नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का; डी. पी. सावंतांनी काँग्रेसकडून मागितली उमेदवारी

महाराष्ट्र, नांदेड
नांदेड। राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नांदेडच्या राजकारणात असाच काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. डी. पी. सावंत यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवय्या उचवल्या आहेत. तर दुसरीकडे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपात गेले होते. प्रकृती ठिक नसल्याने काही महिने डी. पी. सावंत राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र सावंत यांनी आपण कोणासोबत ही भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे डी. पी. सावंत हे भाजपात जाणार ...
Praveen Patil Baswade Passed NETSET :  प्रवीण पाटील बस्वदे नेटसेट उत्तीर्ण -NNL

Praveen Patil Baswade Passed NETSET : प्रवीण पाटील बस्वदे नेटसेट उत्तीर्ण -NNL

करियर, नांदेड
नांदेड। नुकत्याच जाहीर झालेल्या नेट सेट परीक्षेच्या निकालात कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र प्रवीण तुकाराम पाटील बस्वदे यांनी अर्थशास्त्र विषयामधून नेट सेट परीक्षेत यश संपादन केले आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दासराव पाटील पुयड यांचे ते मावस भाऊ आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.....
error: Content is protected !!