Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Collector Visit : माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

Collector Visit : माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

नांदेड, करियर
नांदेड| इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची अपुरी व्यवस्था असल्याचेही आढळले. ही बाब गंभीर मानून संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. तसेच संबंधित परीक्षा ...
Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

Mahashivratri Darshan : नागडोह देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी, आमदार भीमराव केराम यांनी घेतलं दर्शन

धार्मिक, नांदेड
इस्लापूर/किनवट | महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र नागडोह देवस्थानात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आमदार भीमराव केराम यांनी उपस्थित होऊन महादेवाचे दर्शन घेऊन शेतकरी, मायबाप जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान परिसरात सुव्यवस्थित दर्शन व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते....
Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली. मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांतून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मंदिर कमेटी...
Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार | महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल दोन ते अडीच तास रांगेत उभे राहावे लागले. महादेवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना हिमायतनगर बजरंग दलाच्या वतीने दुधाचे वितरण करण्यात आले. तसेच बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मार्कंडेय बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँकेच्या वतीने साबुदाणा फराळाचे वाटप करण्यात आले. विश्वकर्मा सुतार कारागीर संघटनेतर्फे केळी व पेयजलाचे वितरण करण्यात आले, तर शालेय विद्यार्थ्यांनी भाविकांना नायलॉन साबुदाणा पाकिटांचे वाटप केले. या उपवास प्रसाद व दूध वाटपाचा शुभारंभ श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सेक्रेटरी अनंता देवकते ...
Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

धार्मिक, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव तालुक्यातील हरडफ शिवारात पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नैसर्गिक रम्य परिसरातील वानवाडी महादेव मंदिर (हरडफ) येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ फेब्रुवारीपासून भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. यात्रेदरम्यान दररोज सकाळ व संध्याकाळ भजन, कीर्तन, पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. हे पुरातन महादेव मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेले असून पूर्वी हरडफ शिवारात वसलेले वानवाडी गाव कालांतराने स्थलांतरित झाले आहे. विशेषतः लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे इतरत्र स्थायिक झाली असली, तरी आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी दरवर्षी या यात्रेला ते आवर्जून उपस्थित राहतात. हरडफ–धोत्रा मार्गावर चार गावांच्या सीमेवर वसल...
Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रात्री अभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार असून गावात विविध ठिकाणी चहा पाणी फराळ व भाविक भक्तांचा स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटना यांच्या कडून स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय कडून दिवा बती, रस्ता स्वच्छता करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने रात्री 12 वाजता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्कराव पाटील खतगावकर व‌ समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर रात्री पासून श्रीकाळेश्वर दर्शन साठी भाविक भक्तांना सोडण्यात येणार आहे. महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले ...
Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड l हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. शाहिर सुभाष गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी गायनकलेच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, दलित समाजजागृती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सातत्याने पुढे नेत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. या ...
Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे 717 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती (The only standing idol of Lord Shri Parmeshwar) आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्याती...
Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा परिसरात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृष्ण त्रयोदशी, दि. 15 (रविवार) रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्यरात्री तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात श्रींचा महाअभिषेक, पूजा-अर्चना व अलंकार सोहळा (A grand alankar ceremony of Lord Shri Parmeshwar) भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाचे पारणे करण्यासाठी भाविकांची सकाळी ३ वाजल्यापासूनच मंदिर प्रांगणात दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने मंदिर समितीने विशेष सुविधा, बंदोबस्त तसेच चहा-फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. निमित्तानु...
Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
नांदेड| महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी होणाऱ्या या महाप्रसाद सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी दर्शन व प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या पवित्र पर्वात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मा. खा. सुभाषराव बापूराव वानरडे (हिंगोली लोकसभा मतदार संघ), बापूराव आरविंदराव वानरडे, भास्कर सुभाषराव वानरडे तसेच मा. सौ. रोहिणीताई भास्कर वानखेडे (नगराध्यक्ष, हदगाव नगरपालिका) यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्याव...
error: Content is protected !!