Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अधिनियम 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दुहेरी परवानगी प्रक्रिया टळणार असून नागरिकांची वेळ व आर्थिक बचत, वार्षिक करपद्धती ऐवजी सुलभ एकरकमी अधिमूल्य, प्रशासनात पारदर्शकता व सुसूत्रता राहणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून 31 डिसेंबर 2025 पासून लागू असलेल्या सुधारणा तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या अधिनियमान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा अधिनियम 2025 (57/2025) अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलमे 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड व कलम 44, 44 अ, 45, 46 व 47 अ वगळण्यात आली आहेत. ...
Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर/हदगाव/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने मार्च महिन्यात आयोजित भव्य दिव्य श्री रामकथा, श्री १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याच्या पूर्वतयारी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैठकीस राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण Ashok Chavan व आमदार बाबुराव कदम कोहळीकर Baburao Kadam Kohalikar यांनी उपस्थित राहून भक्तगणांशी संवाद साधला. सादर बैठकीस बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम कथा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली Meghna Kavli, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील Archana Patil यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत...
Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

नांदेड, कृषी, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, यवतमाळ, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी...
सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा व दिलेली उद्दिष्टे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, अशा सूचना प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकार राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाशी संलग्न विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विज्ञान केंद्राचे शा...
Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l भारत - अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती जाहीर केली. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, संसदीय पातळीवर संवाद वाढविणे तसेच परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळणार आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले असून, या नियुक्तीमुळे भारत - अर्जेंटिना संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त ...
आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

नांदेड
नांदेड l शास्त्रीय गायन, वादन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या संगीत शंकर दरबारची महाराष्ट्रामध्ये एक आगळी-वेगळी ओळख निर्माण झाली असून उद्या दि. 25 फेब्रुवारीपासून नांदेडकरांना संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. संगीत शंकर दरबारचे हे 22 वे वर्ष आहे. यशवंत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे दि. 25 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण हे राहणार असून यावेळी भोकरच्या आ. श्रीजयाताई चव्हाण यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात डॉ.राम बोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळयानंतर अनुपमा जोशी यांचे सरोद वादन, रुचिरा केदार व पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या ...
CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट

CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट

नांदेड, क्राईम
नांदेड| सेलू जिल्हा परभणी येथील २४ वर्षीय युवक अनिकेत शेरे हा एक वर्षांपासून बेपत्ता झाला होता. त्याला त्याच्या दोन मित्रांनी तो काम करीत असलेल्या कापड दुकानातून बोलावून नेले होते. परंतु तो घरी आलाच नाही. अनिकेत चे वडील बळवंत शेरे पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस ठाणे सेलू येथे मिसिंग दाखल केली होती.बेपत्ता मुलाच्या नातेवाईकांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी पोलीस ठाण्या समोर धरणे आंदोलन केले. प्रभारी ठाणेदार दिपक बोरसे यांनी जाणीवपूर्वक तपासात हलगर्जीपणा केला व आंदोलन कर्त्या नातेवाईकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. असा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देखील मिसिंग व तक्रारी अर्ज देण्यात आला होता. परंतु ठोस कार्यवाही झाली नाही. या प्रकरणात आतापर्यंत चार अधिकाऱ्यांनी तपासकामी काम पहिले आहे. शेवटी नव्याने तपास करणारे उप निरीक्षक शे...
Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर

Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर

नांदेड, कृषी
हिमायतनगर, अनिल  मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे दुधाळ जनावरे अनुदानाच्या प्रश्नावरून प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. तब्बल ४० हून अधिक शेतकरी सोमवारपासून आमरण उपोषणावर बसले असून, मंगळवारी दुसरा दिवस पूर्ण झाला असून, आज बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ठोस निर्णयाऐवजी केवळ “उपोषण मागे घ्या” अशी विनवणी केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाच्या प्रधानमंत्री कृषी विकास योजना अंतर्गत मंजूर दुधाळ जनावरांच्या अनुदानाची रक्कम मागील चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भातील बाजारात जनावरे खरेदी केली; परंतु उर्वरित अनुदान खात्यात जमा झालेच नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत अडकले आहेत. परिणामी, थकबाकी वाढल्याने...
Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी

Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी

क्राईम, धार्मिक, नांदेड
नांदेड /नायगाव | नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोरट्यांनी मंदिरातील देवाच्या चांदीच्या दागिन्यांमध्ये सुमारे ६५ तोळ्यांचा एक मुकुट, ३३ तोळ्यांचा दुसरा मुकुट, तसेच ३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि कपाटातील अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटे मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. श्वान ‘कोको’चा चोख तपास घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान ‘कोको’ हिला कपाटाची चावी व ड्रॉवरचा वास देण्यात आला. त्यानंतर तिने मंदिर परिसरातून वास घेत थेट पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेगाव–कार्...
Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका

Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेत शिवारात केबल चोरट्यांचा सुळसुळाट थांबण्याचे नाव घेत नाही. सिरपल्ली भागातील चोरीच्या घटनेनंतर एकंबा परिसरातील नदीकाठच्या शिवारात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २० शेतकऱ्यांचे मोटारपंप केबल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरीच्या घटनांनी दुहेरी संकट ओढवले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आवश्यक असलेली मोटारपंप केबल चोरीला गेल्याने शेतीकाम ठप्प झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वीही हिमायतनगरसह कारला, सिरपल्ली, पळसपूर, सवना, पिचोंडी आदी भागांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पथक ...
error: Content is protected !!