नांदेडलाइफस्टाइल

Heavy Rain : हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी;  पिचोंडी शिवारात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर

हिमायतनगर, अनिल मादसवार| गुरुवारी दुपारी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट होत असताना तालुक्यातील पिचोंडी शिवारात वीज कोसळली. यामुळे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणौन दोघेही बालंबाल बचावले आहेत.
IMG 20250828 WA0036 Heavy Rain : हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी;  पिचोंडी शिवारात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी प्रभाताई रघुनाथ मिराशे, गजानन विठ्ठल मिराशे व कविता गजानन मिराशे हे गुरुवारी शेतात मुग तोडण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस व वीजांचा कडकडाट सुरू झाल्याने तिघेही झोपडीमध्ये आसरा घेत होते. यावेळी अचानक विजांचा कडकडाट झाला. दरम्यान प्रभाताई मिराशे व गजानन मिराशे हे झोपडीबाहेर असताना विजेचा जबर धक्का बसून दोघेही जागेवर कोसळले.

गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन मिराशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टाके घालावे लागले आहेत. तर प्रभाताई मिराशे यांच्या साडीला आग लागून पाय व हाताला जबर दुखापत झाली आहे. गंभीर परिस्थिती असूनही दोघेही मृत्यूच्या दाढेतून बचावले. दोन वर्षांपूर्वी याच शिवारात विजेचा आघात होऊन वडिलांचा मृत्यू झाला होता. “आज पुन्हा मुलावर तीच परिस्थिती आली होती, पण दैव बलवत्तर म्हणून वाचलो,” अशी भावना जखमींनी व्यक्त केली.

IMG 20250828 WA0014 Heavy Rain : हिमायतनगर तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी;  पिचोंडी शिवारात वीज कोसळून दोन शेतकरी गंभीर
या घटनेनंतर पिचोंडी व परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरु होता. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याने पुन्हा चार दिवस अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे समजल्याने हिमायतनगर तालुका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!