Wednesday, May 20

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात….शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात….शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। दि. 08 जुलै रोजी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असुन, सगेसोयरे कायद्याची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी ते पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करून समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत. 6 जुलै पासून हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या *शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅलीला* अनुक्रमे परभणी, नांदेड, लातुर धाराशिव, बीड, जालना आणि शेवट हा छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस अशा हिशोबाने जरांगे पाटील हे त्या त्या जिल्ह्यातील समाज बांधवांशी संवाद करून जर का सरकारने 13 जुलै पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या काळातला मराठा समाजाचा निर्णय हा सरकारला परवडणारा नाही मग तो 288 विधासभेत मराठा उमेदवार उभे करने असेल किंवा मग त्यांचे पाडणे असेल या सर्व विषयावर ते सरकारला चेतावणी आणि समाजासोबत संवाद या दोन गोष्टी साठी ते मराठ...
पंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध डॉ. विजयसतबीर सिंघ -NNL

पंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध डॉ. विजयसतबीर सिंघ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब नांदेडचे मुख्य व्यवस्थापक डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय.ए.एस. यांच्या आदेशानुसार आज एक विशेष शिष्टमंडळ रेल्वे विभागाचे डी.आर.एम. नीती सरकार मॅडम यांच्याशी भेट घेऊन सचखंड एक्स्प्रेस आणि पंजाबहून येणाऱ्या इतर गाड्या उशिरा आल्याने भाविकांना खूप अडचण होत आहे, ती त्वरित सोडवावी, अशी मागणी केली. कोणतीही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटते, तर ती सुटण्याची नेमक्या वेळेची संबंधित प्रवाशांना द्यावी, जेणेकरून प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उन्हाळी हंगामामुळे चार ते पाच तास थांबण्याचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षेमुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण होतात. ज्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात आणि मार्गात थांबल्यामुळे आणखी उशीर होतो, त्यानंतर डब्यांमध्ये पाण्याची कमतरता असते आणि स्वच्छता अत्यंत खराब होते,...
नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस साढेतीन तास उशिरा; धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार -NNL

नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस साढेतीन तास उशिरा; धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस दि.20 रोजी साढेतीन तास उशिरा सुटणार असून, धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे. तसेच उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नारसपूर वेळेवर धावणार आहे. अशी माहिती नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दिनांक 20 जून 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस तीची नियमीत वेळ सकाळी 09:30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 13:00 वाजता सुटेल. हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरी चे दुरुस्तीचे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे, तसेच उशिरा धावण...
हदगाव तालुक्यातील ओबीसीचे शिष्टमंडळ वडगोद्री येथे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भेटीला -NNL

हदगाव तालुक्यातील ओबीसीचे शिष्टमंडळ वडगोद्री येथे उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या भेटीला -NNL

महाराष्ट्र, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। मौजे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे अंतरवालीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी हाके यांना भेटण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती राज्य सरकार जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण न देण्याबाबत लेखी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे सोमवारी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून चारशेहून अधिक गाड्या वडीगोद्री येथे दाखल झाल्या होत्या यामध्ये शिरूर तालुक्यातून तब्बल दोनशेहून अधिक गाड्या आल्या होत्या याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून व तालुक्यातून आंदोलनाला पाठिंब...
पेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा -NNL

पेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मायबाप शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कंपण्या आता थेट व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या लक्ष करीत असून कृषी अधिकाऱ्यांचे काम स्वतः आपले प्रतिनिधी नेमून छापेमारी करण्यास सुरवात केली आहे. मल्टिनेशनल कंपण्याची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक अपूर्ण मागण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटना व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर स्थानिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे. गोदरेज,एफएमसी,अदामा सारख्या कंपण्या आपल्या खाजगी प्रतिनिधी मार्फत कीटक नाशक दुकाने तपासणी करीत आहेत. खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवा मोंढा ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात...
पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड जिल्हा पोलीस भरती-२०२२-२३, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना देण्यासंदर्भात आज पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भरती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. पोलीस भरती निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणाने होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे असे आवाहन त्यानी केले आहे. नांदेड येथे पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.१९.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४ पर्यंत पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी ०५०० वाजता पासून राबविण्यात येणार आहे. भरती दरम्यान पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. भारती काळात काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली...
आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. 16 जून 2024 रविवार रोजी सकाळी ठिक 12.00 वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा- बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा 2026 कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकार्‍यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा म...
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

महाराष्ट्र, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी मिळून दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण न्यायालयासाठी शहरात तात्पुरती इमारत मिळत नसल्याने बिल्डिंगची फरफट कायम आहे. अनेक वर्षांनंतर अतिरिक्त व सत्र न्यायालय मंजूर झाल्याने पक्षकार व वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे, पण लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी बिल्डिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून किनवट हा तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. येथे अतिरिक्त सत्र न्यायालय नसल्याने पक्षकाराची मोठी परवड व्हायची. सत्र न्यायालयाशी निगडित न्यायालयीन कामकाजासाठी गोरगरीबांना नांदेड येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. आणखी हे काही थांबलेले नाही. किनवट हा आदिवासी डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय नाही. ते इथे मंजू...
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे प्लॉट वाटपाच्या लिलावावरुन संचालक व व्यापाऱ्यात राडा -NNL

हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे प्लॉट वाटपाच्या लिलावावरुन संचालक व व्यापाऱ्यात राडा -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड/हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकाम पूर्वी प्लॉट वाटपावरून संचालक व व्यापाऱ्यात वादावादी झाली. शाब्दिक चकमक होऊन एकमेकात धक्काबुक्की झाली या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक न्यूज चैनेलला प्रसारित झाल्याने गाळे प्लॉट वाटपाची फेर प्रक्रिया करून यात पारदर्शकता आणली जाईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले आहे. हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी लिलाव पद्धती बिट सुरू करू असे आश्वासन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली. मात्र शेतकऱ्यांच्या विषयी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. तसेच शहरातून मोठया प्रमाणावर भुसार माल मोठया बाजारपेठेत जातो, त्या वाहनांसाठी वसूल करण्यात येणाऱ...
मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करा – NNL

मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करा – NNL

महाराष्ट्र
नागपूर/दापोली| खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्यात यावी. अशी मागणी प्रवाशांची असिन, या मागणीला अनुसरून राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पोस्टल रजिस्टर द्वारे केली आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापक...
error: Content is protected !!