Saturday, July 4

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार -NNL

माहितीचा अधिकार; द्वितीय अपिलासाठी एसएमएस, ई- मेल, व्हॉटसॲप ग्रुप व वेबसाईटवर नोटीस, निर्णय मिळणार -NNL

महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे असणाऱ्या द्वितीय अपिल सुनावणीसाठीची नोटीस तसेच अपिल निर्णय इ. आता एसएमएस, ई-मेल. व्हॉट्स ॲप ग्रुप व वेबसाईटवर देण्यात येण्याची व्यवस्था खंडपीठाने केली आहे, अशी माहिती राज्य माहिती  आयोगाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे. राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, द्वितीय अपिलासाठी  सुनावणीची नोटीस ही टपालाद्वारे पाठविण्यात येते. मात्र बऱ्याचदा या नोटीस अपिलार्थिंना, जनमाहिती अधिकाऱ्यांना वेळेत प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी द्वितीय अपिल सुनावणीसाठी अपिलार्थी, जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांना एसएमएस, ई- मेल, वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्या त्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांच्य...
सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण सभा घेण्यात येणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील विविध विषयासंदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा यावेळी करण्यात येणार आहे. ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अशा तक्रारदारांना पंचायत समितीच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख तक्रार निवारण सभेसाठी उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली आहे....
खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL

खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL

हिंगोली, नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाकडून सण 2022 मध्ये निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमदार खासदाराच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आलेल्या हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन वर्षभरापूर्वी ठेकेदाराने पलायन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर आजच्या रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक वाहनधारकांना मात्र दुचाकी व चारचाकीला लागलेल्या चिखलाचे पेंढ काढता काढता नाके नऊ आल्याने राजकीय नेते व संबंधित गुत्तेदारासह अभियंत्यांच्या नावाने बोट मोडण्याची वेळ आली आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त संत गतीने केले जाते आहे, एव्हढंच नाहीतर वर्षभरापासून ...
राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर -NNL

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर -NNL

महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी, मेड...
हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

हदगाव शहर व तालुक्यात कोट्यावधी रुपायाच्या विकास कामावर माहीतीचा फलकच नाही – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजनाद्वारे हदगाव शहर व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या विकास कामाची माहीती देणारे फलक संबंधित कञांटदारांनी लावले नसल्याने या कामात 'कुछ तो गडबड है 'चे स्पष्ट मत बहुतांशी रोडचा दर्जा पाहील्यावर दिसुन येत आहे. हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपयाचे निधीतून रोडचे विकास कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, शासनाच्या विविध विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या करोड रुप्याच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. शासना दारे लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या नावाखाली निधी आणला अस सागतात. पण ते काम कोणत्या कंञाटदाराच्या नावावर कोणत्या एजन्सीच्या नावावर आहे, आणि काम कुणी तरी तिसरी व्यक्ती करत असल्याने माञ कामाचा काहीच दर्जा राहीलेला नाही. या बाबतीत नागरिक व ग्रामस्थ अनभिज्ञ असुन, संबंधित विभाग काम आमच्या विभागामा...
राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

राजपूत (भा) समाजाविषयी लक्ष्मण हाकेचं वादग्रस्त विधान; पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेध -NNL

महाराष्ट्र
पुणे। राजपूत (भा) समाजा विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके याच्यावर शासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी या स्वरूपाची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर व राजपूत समाज सभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरूवार दि. २७ जून २०२४रोजी वाशिम मध्ये tv9 या चॅनलच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यानी राजपूत (भामटा) समाजा बदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामूळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय राजपूत समाजाला टार्गेट करत समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे चुकीचे काम करत आहेत, अश्या समाज द्रोही व्यक्तीला महाराष्ट्रात फिरण्यावर तात्काळ प्रभावाने बंद...
नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL

नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| कोरोना काळापासून बंद पडलेल्या विमान सेवाला नांदेडमधून अखेर सुरुवात झाली आहे. स्टार एअर कंपनीने नागपूर-नांदेड-पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर नांदेड-पुणे विमानाची सुरुवात झाली आहे. पाहिलं विमान दिनांक २७ जून रोजी पुण्याच्या दिशेनं उड्डाण घेतली असून, ८० आसन क्षमतेच्या विमानात नांदेडहून पहिल्याच दिवशी ५२ प्रवाशांनी नांदेडहून पुण्यासाठी 40 मिनिटांचा प्रवास केला आहे. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा प्रसिध्द असल्यामुळे पंजाब, अमृतसरसह अन्य राज्यातुन शिख समाज बांधव मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नांदेडात येत असतात. नांदेड येथून विमानसेवा पूर्ववत सुरु झाल्यामुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आता कमी वेळात नांदेड शहर गाठता येणार आहे. स्टार एअर इंडिया या विमान कंपनीने नागपूर -नांदेड- पुणे विमान सेवा सुरु करण्यासाठी तयारी दर्शविल्यानंतर दिनांक २७ जून रोजी प्र...
वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| तालुक्यातील एकघरी, बिरसा मुंडा चौक अंतर्गत रस्त्यावर वाशी गावाजवळ सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या कामात स्टील वापरणे अनिवार्य होते. परंतू ठेकेदारांनी तसे न करता नुसते सिमेंट काँक्रीटचे थातुर माथूर तेही अत्यल्प मटेरियलचा वापर करूण काम पुर्ण केले आहे. या कामाबाबत असंख्य तक्रारी होवूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्ता कामाची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन उपअभियंत्याकडून ठेकेदारचे देयके काढण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे तक्रारकर्ते दत्ता शिराणे हे आमरण उपोषण करण्याच्या मार्गावर आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरकडे जाणाऱ्या एकघरी, बिरसा मुंडा चौक ते वाशी या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून ५ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. आणी या कामाची प्रत्यक्षात सुरूवात झाली ठेकेदाराने दिलेल्या मुदतीपूर्वी र...
राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस -NNL

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याला नोटीस -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील 95 गावातील आदिवासी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या निम्न पैनगंगा चिमटा धरण प्रकल्प कामाला पेसा कायदा डावलून मंजुरी दिल्या प्रकरणी एक चिमटा धरण रद्द करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचीत जनजाती आयोग दिल्ली यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भात पंधरा दिवसात उत्तर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी देण्याची नुकतीच नोटीस बजावली आहे. निम्न पैनगंगा चिमटा धरण प्रकल्प पुढील क्षेत्रात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील 95 गावे येत असून 42 गावे अनुसूचित आदिवासी पेसा क्षेत्रातील असून त्यापैकी 18 अनुसूचित आदिवासी पेसा गावांची जमीन अधिग्रहणाची महाराष्ट्र राज्य सरकारकडून अधिसूचना 11 1 जारी करण्यात आली आहे. त्या 18 गावांपैकी 17 गावे अनुसूचित आदिवासी क्षेत्र पेसा अंतर्गत येतात यामधील 11 गावे यवतमाळ जिल्ह्यातील तर नांदेड जिल्ह्यातील 7 गावांचा समावेश आहे. पुनर्वसन, भू...
सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान – NNL

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी व व्याख्यान – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीस आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. सुरवातीला आमदार बालाजी कल्याणकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा स्नेहनगर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. या दिंडीत आमदार बालाजी कल्याणकर, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्...
error: Content is protected !!