Thursday, May 14

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath Cave Episode – 10 | अमरनाथ गूहेतून भाग – १० | लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
माता वैष्णवी देवीला पायी जायचं म्हणुन पहाटे ५ च्या दरम्यान यात्रेकरू तयार होऊन हॉटेल बाहेर माझी वाट पहात होते.अनेकानी आधीच दर्शनासाठी आरएफआरडी कार्ड काढले होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑनलाईन यात्रा परची नांदेडलाच काढली होती पण तिला कोणी विचारले नाही. त्यामुळे वाचकांनी यापुढे ऑनलाइन यात्रा परची काढण्याची आवश्यकता नाही.आरएफआरडी कार्ड काढण्यासाठी स्वतः चे आधार घेवून बस स्टँड जवळील सेंटर जावे लागते. बस स्टॅन्ड ते बाणगंगा हा प्रवास ऑटोतून केला. बाणगंगाच्या पुढे कोणतेही वाहने जात नाही. ज्यांना डोली अथवा घोडे करायचे होते त्यांना ते ठरवून दिले. नियमापेक्षा जास्त पैसे मागणाऱ्यांना हो म्हणा पण आल्यानंतर त्यांना देवस्थान ने ठरविल्या दराप्रमाणे पैसे द्या आणि तो ऐकत नसेल तर त्याची कंप्लेंन मिलिटरी वाल्यांकडे करा अशा सूचना मराठीतून सर्वांना दिल्या. अंगात अमरनाथ यात्री संघाचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी, कप...
Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

नांदेड, लेख
भक्तीचे काजळ घालुन ज्या संतानी परमेश्वराला पाहिले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते परमेश्वराचे दिव्यत्व काय आहे हे फक्त संतच समजु शकतात. आपली भारत भुमी पावन शुमी झाली या संतानमुळेच अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. संताच्या साधनेमुळे आणि त्यांनी केलेल्या भगवंताच्या किर्तनामुळे आज या सृष्टीचा आणि आपल्या समाजाचा समतोल राखला गेला हे आशा थोर महान आणि दिव्य संताना मी बारंबार प्रणाम करते. साधारण मानवला अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून बावरे हसंत रुप खुप श्रेष्ट आहेत अशा संताची भगवंत पुजा करतात. अशा सर्व श्रेष्ट संताना मी बारंबार प्रणाम करते. अध्यात्माचे ज्ञान सत्संगाचे महत्व वाणीतून आणि कर्मातून फक्त आणि फक्त संतच समजावू शकतात. अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. भागवत, रामायण, आणि गीता हे सर्व श्रेष्ठ ग्रंथ संतानी लिहिले आणि समाजाला समाजवले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. ...
Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL

Department of Education | बंडू आमदूरकर: शिक्षण विभागाचा आत्मा -NNL

नांदेड, लेख
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर हे जिल्ह्या भरातातील शिक्षकांच्या मदतीला अडीअडचणी धावून जाणारे अधिकारी .ते 30जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .शिक्षण विभागाचा " आत्मा " असे त्याचे संबोधन व्हायचे आणि ते अगदी बरोबर होय .त्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी घेतला आहे एकदा बंडूला मी विचारलं, 'खूप ताण येतो तेव्हा तुम्ही काय करता?' 'काही नाही, कामांमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतो', तो उत्तरला. मला नवलच वाटतं या माणसाचं. कायम, सतत कामात व्यस्त. या कामातूनही फोनवर उत्तरं देणार. डोक्यात हजारो कामांची जंत्री, तरीही आता कोणतं काम करायचं याचं प्राधान्य लक्षात राहणार. नाही हे उत्तर वरिष्ठांना कधीच नाही. सोपवलेलं काम बरहुकूम करणार. तेही अचूक, अपेक्षित, वेळेवर! जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कोणताही पुरस्कार स...
Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath |अमरनाथ गुहेतून भाग – ९ \ लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
आज सकाळीच आम्हाला कटरा साठी निघायचे होते. पण यात्रेकरूमध्ये आपसात कुजबुज चालू होती की, श्रीनगरला येऊन शंकराचार्य मंदिर चे दर्शन घेणे आवश्यक आहे. दोघा तिघांनी मला सांगितले की, भाऊ कसेही करून शंकराचार्याचे आम्हाला दर्शन घेऊन द्या. प्रॉब्लेम असा होता की, शंकराचार्य मंदिर सकाळी साडेसातला उघडत होते.नो एन्ट्री सुरू होण्यापूर्वी डल लेक वरून कोणत्याही परिस्थितीत मोठ्या बसेस काढणे आवश्यक होते. यावर मी असा तोडगा काढला की, ज्यांना शंकराचार्य चे मंदिर पाहायचे आहे त्यांनी आपले सामान आपल्या मोठ्या बस मध्ये ठेवावे आणि दुसऱ्या कोणत्याही वाहनाने शंकराचार्य मंदिर पाहून बायपास वर उभ्या असलेल्या आपल्या बसमध्ये यावे. त्यावर सगळ्यांनी सांगितलं की, तुम्हीच काहीतरी वाहनाची व्यवस्था करून द्या. आता इतक्या सकाळी सगळ्यांसाठी वाहने मिळणे थोडे अवघड होते. मी सज्जादभाईला फोन लावला आणि सांगितले की, सहा टाटा सुमो कसेही ...
Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

Especially for women | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

लेख, नांदेड
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना आता निकष झाले सोपे ;ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्या वतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ योजना सुरु केली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेत नांदेड जिल्ह्यात एकटया ग्रामीण भागात कालपर्यत 48 हजारावर अर्ज दाखल झाले आहेत. तसेच जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय, वार्डनिहाय, गावनिहाय अर्ज भरुन घेण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर मेळावे, कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. आता या योजनेत अर्ज भरण्याची सुविधा अत्यंत सुलभ झाली असून शासनाने कागदपत्रातील निकष व अटीमध्ये शिथीलता दिली...
Dear sister scheme | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

Dear sister scheme | खास महिलांसाठी…‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्...
Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला. पर...
Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा...
Rabindra Singh Modi | अष्टपैलू व्यक्तिमत्व रविन्द्रसिंघ मोदी -NNL

Rabindra Singh Modi | अष्टपैलू व्यक्तिमत्व रविन्द्रसिंघ मोदी -NNL

नांदेड, लेख
नांदेड शहराच्या विकासात येथील शीख समाजाचा मोठा वाटा आहे. येथील सुप्रसिद्ध धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब मुळे नांदेडची कीर्ति समस्त जगतात आहे. नांदेडचा शीख समाज धार्मिक आस्थावान आणि परंपरेला समर्पित असा समाज आहे. येथील शीख समाजात सक्रिय व्यक्तिमत्व असलेले स. रविन्द्रसिंघ मोदी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. रविंद्रसिंघ मोदी यांचे कार्य समाजान्तर्गतच आहे असे नसून सामान्य माणसासाठी आणि सार्वजनिक हितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यतरिक्त रविंद्रसिंघ मोदी यांची एक पत्रकार, कवि, हिन्दी साहित्यिक, वक्ता आणि यूट्यूबर म्हणून एक आगळी - वेगळी ओळख कायम आहे. मागील तीस वर्षांपासून रविंद्रसिंघ मोदी हे मराठी, हिन्दी आणि पंजाबी वर्तमान पत्रांसाठी पत्रकारिता करीत आहेत. गुरुद्वाराच्या बातम्या असो की स्थानीक शीख समाजाच्या बातम्या असो ते वर्तमान पत्रांच्या मा...
coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

नांदेड, लेख
विद्यार्थी, शिक्षक, पालक हा शिक्षणाचा ‘पिरॅमिड’ आहे. शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे ही बाब सुसंस्कारादृष्टीने विविध पातळ्यावर शिक्षणाचा दर्जा ठरत असे. शाळा- महाविद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असायचे, आजघडीला शैक्षणिक संस्थांचा आणि संस्काराचा अर्थाअर्थी काही संबंध राहीला नाही. शिक्षणाचे अर्थकारण प्रचंड प्रमाणात उलाढाल होत आहे. शिक्षण महाग, संस्कार स्वस्त झाले आहेत. संस्काराचा आणि व्यावहारिक बाबींचा सहसंबंध राहिला नाही. खासगी कोचिंग क्लासेसचा सुुळसुळाट झाला आहे. गल्लोगल्ली कोचिंग क्लासेसवाल्यांनी आपली दुकाने थाटून कोचिंगची उलाढाल करीत आहेत. शैक्षणिक हब आता ‘कॉर्पोरेटर’ झाले आहे. पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे क्लासेसवाल्यांची चांदी होत आहे. सामान्यातील सामान्य पालक, सामान्यातील अतिसामान्य विद्यार्थी असला तरी तो नामांकित खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्याच्या हट्टवादीपणामुळे ...
error: Content is protected !!