Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

Pandit pradeep mishra ; मुलींना शिक्षणासोबतच शस्त्राचे प्रशिक्षण द्या -पंडित प्रदीप महाराज मिश्रा-NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। परक्याचे धन आणि परस्री माणसाला सुखी करू शकत नाही, तर बरबाद करते. रावणाने सीता मातेचा हात धरला तर लंका जळाली.कलकत्त्याच्या दुष्टाची पण जळेलच. तथापि मुलींच्या रक्षणाची जवाबदारी पालकांची असून मुलींना खूप शिकवा, मोठे करा,सोबतच मॉ. जिजाऊ, अहिल्यादेवी, झाशीच्या राणी प्रमाणे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण द्या असे आवाहन आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार प. पू. पंडित प्रदीपजी मिश्रा ( सिहोर वाले) यांनी शुक्रवारी ( ता. 23) केले. कवठा परिसरातील मोदी क्रीडांगणावर शुक्रवारी ( ता. 23) शिव महापुराण कथेस उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कथा श्रवणासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा जनसागर पहिल्याच दिवशी उसळला. विराट जनसमुदायासमोर आपल्या रसाळ वाणीतून "बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण "कथेचे विमोचन करतांना पंडित प्रदीप जी मिश्रा ( सिहोरवाले) यांनी प्रारंभीच गो...
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शेगाव येथील दर्शन, मार्गदर्शन सोहळ्यात घेतले लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ -NNL

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शेगाव येथील दर्शन, मार्गदर्शन सोहळ्यात घेतले लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ -NNL

धार्मिक, हिंगोली
शेगाव/भोकर,गंगाधर पडवळे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळी दहा वाजता जगद्गुरुश्रींचे आगमन झाले, त्यानंतर जगद्गुरुश्रींची यजमानांनी शोडशोपचार पूजन केले. आणि त्यानंतर जगद्गुरुश्रींनी सर्व उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले व सर्व भाविकांनी स्वामीजींच्या अमृततुल्य प्रवचनाचे सर्वांनी लाभ घेतला "सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, गण गण गणात बोते..." या मनोरम्य भजनाने आजच्या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात जगद्गुरुश्रींनी प्रवचन चालू केले तद्नंतर जगद्गुरूश्रींनी प्रवचनामध्ये समस्या धारकांना व सर्व भक्तांना भक्तीचा काय महिमा आहे, व गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, हे अगदी साध्या आणि सरळ वचनांमधून सांगितले. महाभारतामध्...
Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

Prohibition order in Nadi Patra area near Kaleshwar temple : काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात प्रतिबंध आदेश -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| नांदेड तालुक्यातील काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात, जलाशयावर, धरण परिसरात जाऊन गर्दी करणे तसेच अनधिकृत बोटिंग चालविणे, बोटींमधून पर्यटकांना बसवून जलाशयामधून फिरविणे, नदीपात्रात स्नान करणे अथवा पोहण्यासाठी उतरणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे, इत्यादींना 21 ऑगस्ट रोजी 12 वाजेपासून ते 18 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. (हा आदेश काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी लागू राहणार नाही) आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत. अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड श...
Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl

Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl

नांदेड, धार्मिक
नांदेड | पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या मंडपात 48 तासांपुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात मुक्काम ठोकला आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भाविक आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, उत्तरप्रदेश येथून भाविक येतील, असे सांगण्यात आले. 23 ते 29 अॉगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेला महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून भाविक येणार आहेत. सभास्थळी 50 बाय 100 फूट विशाल शाही मंडप उभारण्यात येत आहे. 375 बाय 800 फूट तीन वॉटर फ्रूप मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन 5 हजार स्वंयसेवक नियुक्त केले आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांचे देशासह 156 देशात अनुयायी आहेत. नांदेडसह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अनुयाय...
P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL

P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| कलियुगात संसाररूपी मायेच्या विषामुळे मनुष्य जीवन जखडलं गेलं आहे. हे विषारी वलय बाहेर काढून फेकायचं असेल आणि मानसिक समाधान मिळवायचं असले तर "ओम नमः शिवाय" नामाचा अथवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका भगवंताच्या नामाचा जाप करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते. असे अमृतमय विचाराचा संदेश श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थांन पिंपळगावचे मठाधिपती प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना दिला. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांच्या सूचनेवरून पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून "ओम नमः शिवाय" नामजप यज्ञाला सुरुवात झाली आहे. यज्ञाच्या सोळाव्या दिवशी म्हणजे दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अचानक स्वामीजींनी भेट दिल्यानंतर उपस्थित भाविकांना...
धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण – पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन  -NNL

धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण – पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रामणेरांच्या दीक्षाभूमीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. धम्मचळवळीत हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि भिक्खू संघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात श्रावण पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान आदी कार्...
Shiva Mahapuran story : श्री शिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात; श्री शिव महापुराण कथा मंडपात कार्यशाळा -NNL

Shiva Mahapuran story : श्री शिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात; श्री शिव महापुराण कथा मंडपात कार्यशाळा -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या दिनांक 23ते 29 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग श्री शिवमहापुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कथेच्या यशस्वीतेसाठी 27 समित्या, 41 कार्यकारिणी सदस्य, 25 पेक्षा अधिक सेवाभावी संस्था कार्य करीत आहेत. या कथेचे यजमान डॉ. श्री शिवराज नांदेडकर व श्री प्रशांत पातेवार हे आहेत. समितीत ऑफिस समिती व स्टॉल समिती, पाणीपुरवठा समिती, पाणी वाटप समिती, वैद्यकीय समिती, मेडिकल सेवा समिती,किराणा सामान समिती, भोजन समिती, भोजन कक्ष समिती, भाजीपाला समिती, स्वच्छता समिती, वाहनतळ व्यवस्था समिती, प्रसिद्धी, वॉशरूम समिती, पोलीस समन्वय समिती, बॅनर समिती व इंटरनेट समिती, सूत्रसंचालन समिती, विद्युत समिती, चौकशी समिती, लाईट रिपेरिंग समिती, आसन व्यवस्था समिती, अग्निशमन व्यवस्था समिती, ओळखपत्र वाटप समिती, सुरक्षा स...
One can have darshan of Shri Parameshwara idol in ornamental form : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

One can have darshan of Shri Parameshwara idol in ornamental form : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार। जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात येणाऱ्या चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मूर्तीला सुवर्ण अलंकाराणे सजविण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम भाविक भक्तांना दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. हिमायतनगर (वाढोणा) नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सव्वा सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराला इतिहासकालीन वैभव प्राप्त झाले असून, मागील काही वर्षपूर्वी शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील ...
Arjun Maharaj Khade : चांगले मरण यावे यासाठी पुण्य कर्म करा; तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा नेता येत नाही – हभप.अर्जुन महाराज खाडे -NNL

Arjun Maharaj Khade : चांगले मरण यावे यासाठी पुण्य कर्म करा; तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा नेता येत नाही – हभप.अर्जुन महाराज खाडे -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार। चांगली कर्म करावी, जेणेकरून देवांनी तुमची वाट बघावी,,, संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 22 व्या वर्षी समाधी घेतली. मनुष्य जन्माचा उद्देश सफल झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी लोकांनी त्यांना न जाण्याची विनंती केली. चांगलं काम करणाऱ्या लोकांना देव सुद्धा प्रेम करतो.. आणि प्रेम करणारी लोक भरपूर असतात. मात्र आपल्या मनुष्य जीवनात वय जास्त दिवस झाले की, घरातील लोक सुद्धा मरायची वाट पाहतात, त्यामुळे मानव जन्माला आल्यानंतर संत, महंतांचे विचार ऐकून पुण्य कर्म करून मनुष्य जीवनाचे सार्थक करा. जेणेकरून देवाचं स्मरण करत मनुष्याने देह ठेवला पाहिजे... तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा सोबत नेता येत नाही असा उपदेश हभप.अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी केला. हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अ...
Ganeshotsav  ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार – NNL

Ganeshotsav ; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिम...
error: Content is protected !!