Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Vishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी मंडळी विष्णुपूरी यांच्या वतीने महाप्रसाद – NNL

Vishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी मंडळी विष्णुपूरी यांच्या वतीने महाप्रसाद – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी भाजपाचे डॉ. संतुकराव हंबर्डे, युवा नेते नरसिंग हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता , विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्ताने सकाळपासून भाविक भक्तांची मोठया संख्येने दर्शना साठी गर्दी केली होती. १९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी रामेश्वर अप्पा महाराज धनमणे ,सतिश धनमणे,यांच्या उपस्थितीत विध...
शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| आपल्या रसाळ वाणीने शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून लाखो भाविकांना मंत्रमूग्ध करणारे विश्वविख्यात कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी भव्यदिव्य आणि शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दि. 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळात शिवमहापुराण कथा वाचन होणार आहे. या महाकथेचा लाभ घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत सावकार पातेवार यांनी दिली. सभास्थळी 50 बाय 100 फूटाचे विशाल शाही व्यासपीठ उभारण्यात येत आहे. भाविकांना कथेचा लाभ घेण्यासाठी 375 बाय 800 फूटाच्या जागेत तीन भव्य सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना पिण्याचे पाणी, पंखे, कुलर आदींसह पार्कीगचीही व...
श्री.शिवलिंगेश्वर मंदिर सिडको ते श्री काळेश्वर मंदिर विष्णूपूरी भव्य पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

श्री.शिवलिंगेश्वर मंदिर सिडको ते श्री काळेश्वर मंदिर विष्णूपूरी भव्य पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। श्रावण मास निमित्ताने संयोजक संतोष कांचनगिरे यांच्या वतीने सिडको शिवलिगेश्वर मंदिर ते श्री काळेश्वर विष्णुपूरी येथे १८ आगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत माजी मुख्य पुजारी पिंटू महाराज ,सनमुख महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करून काढण्यात आली. यावेळी पदयात्रा मार्गावर पदयात्रेत सहभागी भाविक भक्तांसाठी किशनराव येवते व गजानन आयलवाड यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होते, हर हर महादेव, काळेश्वर भगवान कि जय यासह घोषणांनी परिसर दणाणून गेला या पदयात्रेत महिला सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शिवलिंगेश्वर मंदिर, सिडको, नांदेड ते श्री काळेश्वर मंदिर, विष्णुपूरी येथे दि.१८ आगस्ट २४ रोज रविवारी सकाळी ११ वाजता भव्य पदयात्रा शिवलिगेश्वर मंदिरात महादेव पुजन व महाआरती करून या पदयात्रेस विनोद माधवराव कांचनगिरे,ड...
Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर/उमरखेड| उमरखेड तालुक्यातील मौजे विडूळ येथील उत्तरेश्वर कावड मंडळ, भोई गल्लीतील शिवभक्त युवकांनी सहस्रकुंड पाई कावड यात्रा काढली असून, तिसऱ्या सोमवारी येथील मंदिरात स्थापन होणारी शिवपिंड या कावड यात्रेत सोबतआणली होती. या कावड यात्रेला उचलण्यासाठी ६ युवकांना परिश्रम घ्यावे लागले. सहस्रकुंड येथून परत निघालेली कावड यात्रा दिनांक १७ रोजी हिमायतनगर शहरात दाखल झाल्यानंतर अनेक भाविकांनी कावड यात्रेच्या युवकांनी आणलेल्या भगवान शिवलिंगाचे दर्शन घेतले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवकांचे स्वागत केल्यानंतर कावड धारि युवकांनी येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन रात्रीला हिमायतनगर वाढोणा येथील श्री वरद विनायक मंदिराजवळ मुक्काम केला. परत रविवारी सकाळी हि कावड यात्रा उमरखेड विडूळ गावच्या दिशेने हर हर महादेव.... जय श्रीराम नावाच्या घोषणा देत निघाली. या कावड यात्रेत सहभागी झालेल्या युवका...
शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL

शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड, हिंगोली
शेगाव/भोकर| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन मंगळवार दिनांक 20 व बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी 9 : 00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे साहेब , पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे साहेब यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदा...
Kavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL

Kavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड कावड यात्रा काढण्यात आली यंदाची ही कावड यात्रा बांगलादेश मधील हिंदूंवर असलेल्या अत्याचाराला समर्पित ही कावड यात्रा होती. पाच दहा कावड, एका भक्ताने 40 लिटर कावड तयार करून आणली होती. पाण्याची तर लहान बालकांनी भूत अघोरींचे वैशभुषा साकारून कावड यात्रा मधील नागरिकांचे लक्ष वेधले. कावड यात्रेमध्ये हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नवीन नांदेड सिडको,नांदेड शहर दुम दुमले होते. तसेच जुनामोंढा येथे बांगलादेश विरुद्ध घोषणाबाजी ही करण्यात आली. सिडको पासून ते उर्वशी महादेव मंदिरापर्यंत व्यापाऱ्यांनी तथा शिवभक्तांनी कावड यात्रेचे स्वागत केले. सिडको येथील अण्णा भाऊ साठ...
भाविकांचा सहभाग व भक्तीभावात संपन्न होणार परिक्रमा यात्रा; लाखो भाविकांचे होणार आगमन -NNL

भाविकांचा सहभाग व भक्तीभावात संपन्न होणार परिक्रमा यात्रा; लाखो भाविकांचे होणार आगमन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर| माहूरगडावर पार पडणाऱ्या तीन मोठ्या यात्रेपैकी एक असलेली परिक्रमा हि यात्रा दि.१८ व १९ ऑगस्ट या दोन दिवशी भक्तीभावात साजरी होणार आहे. दि.१३ रोजी श्रावण शु.८ अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात झाली. दि.१८ ऑगस्ट रोजी श्री दत्तशिखर संस्थानच्या दत्त मंदिरातील महापुरुष 'सर्वतीर्थ 'या कुंडात स्नान करून भगवान दत्तप्रभू यांचे दर्शन व प. पू. प. म. श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतात.त्यांच्या परवानगीने नियुक्त महापुरुष यांचे नेतृत्वात मोठ्या संख्येत जमलेल्या भाविकासंह सायं.४ वा परिक्रमा यात्रेला निघतात. परिक्रमेला दत्तशिखर येथून सुरुवात होते, पुढे काळेश्वर मंदिर, सयामाता मंदिर,मातृतीर्थ तलाव, विष्णुकवी मठ,पांडवलेणी, श्रीदेवदेवेश्वर मंदिर, वनदेव मंदिर, कैलास टेकडी, शेख फरीद, दत्त मांजरी,अनुसयामाता मंदिर, सर्वतीर्थ कुंड मार्गे रात्र दिवस प्रदक्षिणा करुन दुसऱ्या...
श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
किनवट, परमेश्वर पेशवे। हिंदू धर्मामध्ये पवित्र मास म्हणून श्रावण महिन्याकडे बघितले जाते . या श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकराची आराधना उपासना केली जाते. हजारो भाविक भक्त गण श्रावण सोमवारी वेगवेगळ्या शिवमंदिरामध्ये शिवालयामध्ये गर्दी करत असतात. तर काही शहरातून गावामधून पायी कावड यात्रा ही काढली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव समिती मांडवी च्या वतीने मांडवी ते उनकेश्वर असे पायी कावड यात्रेचे भव्य दिव्य आयोजन दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या पायी कवडयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश शेंडे, सचिव हर्षल शेंडे, शिवभक्त दीपक जयस्वाल, गजानन शेंडे, सुनील राठोड सर, सुनील दादा श्रीमनवार चंदन मांडण, अमोल जयस्वाल, पिंटू जयस्वाल, आशिष जयस्वाल, नितीन ठाकूर, या सर्व शिवभक्तांनी या पायी कावड यात्रेमध्ये परिसरातील सर्व भ...
Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL

Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी नांदेड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांच्या सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यासह अधिकारी यांनी दर्शन घेतले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती. १२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी गणेश अप्पा महाराज धनमणे यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले,...
Satish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL

Satish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नांदेड | माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी झाली होती. मरळक येथे परिवर्तन संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. मरळक येथे झालेल्या किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन नगर शिवमंदिर (तरोडा बु) येथे अभिषेक करून परिवर्तन संकल्प यात्रा आरंभ करण्यात आली होती. ह भ प काशिनाथ महाराज माने यांनी समाज प्रबोधनवर आधारीत अंसख्य उदाहरणे देवून उपस्थित जनसमुदयास प्रेरणादायी संदेश देत किर्तनातून जनजागृती केली. माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक कार्याची पावती त्यांना नक्की मिळेल असा विश्वास ह .भ. प‌. काशिनाथ महाराज माने यांनी व्यक्त केला. यावेळी किर्तन व महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्...
error: Content is protected !!