Saturday, May 16

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kavad yatra ; सहस्त्रकुंड ते हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या कावड यात्रेत ठिकठिकाणी जोरदार स्वागत -NNL

Kavad yatra ; सहस्त्रकुंड ते हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या कावड यात्रेत ठिकठिकाणी जोरदार स्वागत -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून सहस्त्रकुंड ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेत शेकडो युवकांनी खांद्यावर कावड घेऊन यात्रेत सहभाग घेतला. यावेळी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर आणि कृष्णा पाटील आष्टीकर यांनी कावड यात्रेला भेट देऊन सर्व युवकांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवरचे औचित्य साधून भव्य पै कावड यात्रा काढण्यात आली होती. रविवारी श्री परमेश्वर मंदिरापासून शेकडो युवक रात्री सहस्त्रकुंड येथे पोचले येथे कृष्णाजी देशमुख यांचा मार्गदर्शन झालं. त्यानंतर सकाळी गंगा स्नान करून शेकडो युवकांनी जय श्री राम... हर हर महादेव नामाचा जयजयकार करत १८ किलोमीटरची पैदल कावड यात्र...
Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL

Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| कोणत्याही धार्मिक कार्यात अडचणी येतात म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे, हे निश्चित मानले पाहिजे, जेव्हा ईश्वर आपली परीक्षा घेतो, तेव्हा आपण प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे, जेवढी प्रतीक्षा तेवढेच चांगले फळ ईश्वर आपल्या भक्तांना प्रदान करतो, आलेल्या संकटांना, दुःख, त्रास आणि परिश्रमांना न घाबरता भोळ्या शंकराची आराधना करीतच रहा, तुम्हाला एक ना एक दिवस शिवकृपा प्राप्त होईल, असा उपदेश परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी रविवारी शिवमहापुराण कथा वाचनात भक्तांना दिला. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे रद्द झालेली शिवमहापुराण कथा रविवारी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी ऑनलाईन कथावाचन केले. लाखो भाविकांनी या कथावाचनाचा लाभ घेतला. कथा वाचनाच्या प्रारंभीच पुज्य पंडितजींनी नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कथामंडपात कथा होऊ शकली नसल्याचे सांगून ही अतिवृष्टी म्हणजे भोळ्या शंकराने नांदेडमध्य...
Janmotsav at Shri Krishna Temple at CIDCO : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन -NNL

Janmotsav at Shri Krishna Temple at CIDCO : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही २१वे वर्षी, भगवान पुर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण परमात्माच्या जन्मोत्सव व सर्वज्ञांची कृपा, गुरुवर्याची प्रसन्नता, सुत्दांचे शुभचिंतन आणि आपले सर्वांचे ओतप्रीतयामुळेच जन्मोत्सव सोहळा या एक पवित्र क्षणाचा सुयोग आला आहे. त्यानिमित्त भगवदगीता पारायण, श्रीकृष्ण नामजप, श्रीकृष्ण चालिसा स्तोत्र पारायण प्रवचन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. सोमवार दि. २६ आगस्ट २४ सकाळी ७ वा. धुपआरती व प्रसाद ७ ते ९ श्रीकृष्ण ना...
शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील शिवणी येथील श्रीकृष्ण मंदिरात आज सोमवार दि.२६ आगस्ट व उद्या मंगळवार २७ आगस्ट असे एकूण दोन दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हभप जनकिराम महाराज कंधारकर यांचे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन व महाप्रसादाचे कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार दि.२६ आगस्ट रोजी शिवणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरात रात्री ८ वाजेपासून ११ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर २६ रोजी रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांचे गोपाळकाला काल्याच्या कीर्तनाचे आयोजन आहे.तर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी महाप्रसादाचे कार्यक्...
Administration’s struggle for Mahashivpuran : महाशिवपुराण‌’साठी प्रशासनाचे जीवाचे रान -NNL

Administration’s struggle for Mahashivpuran : महाशिवपुराण‌’साठी प्रशासनाचे जीवाचे रान -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| येथील कौठा परिसरातील मोदी ग्राऊंडवर आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्यात शुक्रवारच्या अतिवृष्टीमुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. मैदानावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे महाशिवपुराण कथा ऑनलाईन सुरू झाली आहे. मात्र हे मैदान पूर्ववत करून हा कथा सोहळा पुन्हा नियोजित कार्यक्रमस्थळीच सुरू करण्यासाठी प्रशासनानी जीवाचे रान केले आहे. हे कार्यक्रमस्थळ पूर्ववत करण्यासाठी कंबर कसण्यात आली असून निसर्गाने साथ दिल्यास लवकरच पंडित प्रदीप मिश्रा हे लाखो भाविकांच्या साक्षीने महादेव कथेचे वाचन करताना दिसून येतील अशी अपेक्षा आहे. महाशिवपुराण सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अथक प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यआयोजक डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, संजय कऱ्हाळे ,पिंकू पोकर्णा,संतोष पांडागळे,बालाजी पांडा...
Maha Aarti, thousands of devotees thronged the story site : कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी -NNL

Maha Aarti, thousands of devotees thronged the story site : कथास्थळी महाआरती, कथेच्या आशेपोटी हजारो भाविकांनी केली गर्दी -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवमहापुराण कथास्थळी पाणीच पाणी साचल्यामुळे शनिवार दि.24 ऑगस्ट रोजीचे कथावाचन रद्द करण्यात आल्यानंतरही मोदी मैदानावर कथा होईल, या आशेने शिवभक्तीत तल्लीन झालेले हजारो भाविक पाण्याची, चिखलाची पर्वा न करता ठाण मांडून बसले होते. काहीही झाले तरी जागा सोडायची नाही या निर्धाराने बसलेल्या भाविकांना अखेर पंडित प्रदीपजी मिश्रा यांनाच व्यायपीठावर येवून मंडप खाली करण्याचे आवाहन करावे लागले. महाआरती करून आजची कथा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. शुक्रवारी रात्री अचानक वादळी-वार्‍यासह मुसळधार पावसाने नांदेड शहर व परिसराला अक्षरशः झोपडून काढले. शिवमहापुराण कथेचा शुक्रवारचा पहिला दिवस असल्याने भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. कथेच्या समाप्तीनंतर पावासला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कथास्थळी सर्वत्र पाणीच पाणी साचले. बाहेर गा...
Grand Kavad Yatra organized : मुखेड येथे दि. 26 रोजी श्रावण सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन -NNL

Grand Kavad Yatra organized : मुखेड येथे दि. 26 रोजी श्रावण सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
मुखेड/नांदेड| मुखेड शहरात श्री विरभद्र मंदीर पासुन ते श्रावण कावडी पर्यंत दि. 26 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 7 वाजता भव्य कावड यात्रेचे आयोजन श्रावणकावडी देवस्थान व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. ही कावड यात्रा मुखेडचे नगरीचे कुलदैवत श्री विरभद्र मंदीर पासुन सकाळी 7 वाजता सुरु होणार असुन शहरातील विविध भागातून ही कावड यात्रा जाणार आहे. शहरापासुन जवळच असलेल्या ऐतिहासिक रामायणकालीन श्रावणकावडी देवस्थान येथे या कावड यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पुर्वी श्रावण चलम्यातील जल घेऊन श्रावण कावडी येथील महादेवास जलाभिषेक भक्तांच्या कावडने होणार आहे. श्रावण कावडी येथे मागील एक वर्षापासुन लोकहभागातून श्रावणबाळ व त्यांच्या आई वडीलाच्या मंदीराचे जिर्णोध्दार होत असुन मंदीराचा खुप कायापालट झालेला आहे. श्रावणबाळ,त्यांचे आई वडील, संत गाडगेबाबा व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाक...
Gram Gita ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत – NNL

Gram Gita ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे केले स्वागत – NNL

धार्मिक
नांदेड | केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दिल्ली येथून आगमन झाले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. स्वागतानंतर ही ग्रामगिता मी वाचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती....
Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व  – NNL

Shri Krishna Janmashtami ; श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व  – NNL

धार्मिक, लेख
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबर या दिवशी आहे.या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे  महत्त्व पहाणार आहोत.   1. महत्त्व - जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्...
Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड। हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात नांदेडमध्ये महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून महादेवांच्या कथेचे श्रवण करण्याचे भाग्य नांदेडकरांना मिळतय असे भावोदगार माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी काढले. महाशिवपुराण कथा सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी संबोधन करताना ते बोलत होते. आपल्या स्वागतपर छोटेखानी भाषणात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की , पंडित मिश्रा यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी दुरदुरुन भक्तगण नांदेड मुक्कामी आले आहेत. या सर्व भक्तांचे नांदेडकरांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. या मोदी मैदानावर अनेक विराट सभा झाल्या आहेत पण या सर्व सभापेक्षा वेगळी भक्तीच्या शक्तीची अलोट गर्दी इथे पहायला मिळते आहे. पवित्र श्रावण महिन्यात मिश्राजींच्या सुमधूर वाणीतून आ...
error: Content is protected !!