Sunday, May 17

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

birth of Saint Phulaji Baba ; किनवट तालुक्यातील 33 गावा मधून संत फुलाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा – NNL

birth of Saint Phulaji Baba ; किनवट तालुक्यातील 33 गावा मधून संत फुलाजी बाबा यांचा जन्मोत्सव साजरा – NNL

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील 33 गावामधून श्री परमहंस सद्गुरु फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पटनापूर येथील जन्मोत्सव कार्यक्रम तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा या परिसरात प्रसिद्ध असलेले व तेलंगणा येथील पटनापुर येथे समाधीस्थ झालेले परमहंस संत फुलाजी बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.यामध्ये भजन, कीर्तन ,ध्यानधारणा, महाआरती, व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.हा कार्यक्रम किनवट तालुक्यातील गोकुंदा, टिंगनवाडी ,चिखली खुर्द, थारा, डोंगरगाव(ची) ,बेलोरी धानोरा, सावरगाव, तल्लारी ,जलधरा यासह एकूण 33 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच तेलंगणा राज्य सरकारने पटनापुर येथे या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास विदर्भ, मराठवाडा, व तेलंगणातील लाखोच्या संख...
Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL

Kaleshwar temple ; पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची मुसळधार पावसातही दर्शनासाठी साठी गर्दी… – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| श्रावण महिन्यातील शेवटच्या पाचव्या श्रावण सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे हजारो भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शन घेतले यावेळी डॉ. सचिन पाटील ऊमरेकर, डॉ.प्रमोल शंकरराव हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, यावेळी नंदीकाठ तिरावर जीवरक्षक दलासह , पोलीस,होमगार्ड, यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता, विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती, संततधार पाऊस असुनही भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. २ सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवटचा पाचव्या सोमवार निमित्ताने पुजारी रामेश्वर अप्पा मह...
in Osmannagar celebrated Pola ; उस्माननगर परिसरात पोळा उत्साहात साजरा.. – NNL

in Osmannagar celebrated Pola ; उस्माननगर परिसरात पोळा उत्साहात साजरा.. – NNL

धार्मिक, नांदेड
उस्माननगर| माणिक भिसे एक सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या बैलांना वाजत गाजत, फटाक्यांच्या आवाजात पारंपारिक पद्धतीने मारुती मंदिराजवळ आणण्यात आले. पोळा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मागील दोन तीन दिवसांच्या धुवांधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाहेर फिरणे मुश्किल झाले होते. सोमवारी दुपारी तीन नंतर विश्रांती घेतल्यावर बैल पोळ्यास सुरूवात झाली. सायंकाळी पाच वाजता मानकरी यांच्या घराकडून वाजत गाजत गावातील मारुती मंदिराकडे जमा झाले. पोळ्याला ग्रामदैवत श्री महारूद्र हानुमाण मंदीराभोवती फिरण्याचा मान उस्माननगर येथील कै. व्यंकटराव पाटील घोरबांड व आनंदराव पाटील घोरबांड यांचा असतो. यावेळी भाविकीतील प्रतिष्ठित नागरिक बाबुराव पाटील घोरबांड , माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड यांच्या हस्ते नारळ फोडून , गुलाल उधळून पोळ्यास प्रारंभ केला मानाचे बैल फिरविण्यास सुरूवात. खा...
“Gyan Da Sagar Sri Guru Granth Sahib” ; “ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांना भेट.. – NNL

“Gyan Da Sagar Sri Guru Granth Sahib” ; “ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांना भेट.. – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| "इलाही ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब" हे पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ आणि गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ विजय सतबीर सिंग यांना बाबा बंदासिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने भेट देण्यात आले. बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने फाऊंडेशनचे वतीने फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा, संरक्षक मलकीतसिंग दाखा, हरियाणा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमराव सिंग छीना, सरचिटणीस गुलजिंदरसिंग लोहारा, फाऊंडेशनच्या महाराष्ट्र ाचे अध्यक्ष अमनदीप सिंग आणि संयोजक यात्रा तरलोचनसिंग बिलासपूर, रणजितसिंग साहनेवाल, शीला भगत हे यावेळी उपस्थित होते. "इलाही ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब" हा किताब गुरु ग्रंथ साहिबजींच्या शिकवणुकीचा देश-विदेशात प्रसार करण्यासाठी हा ग्रंथ प्रेरणास्त्रोत आहे, असे संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले...
bailpola ; पावसाची संततधार ..तरी शिंगे रंगविली..बाशिंगे बांधली ..चढविल्या झुली …! – NNL

bailpola ; पावसाची संततधार ..तरी शिंगे रंगविली..बाशिंगे बांधली ..चढविल्या झुली …! – NNL

धार्मिक, नांदेड
लोहा | शिंगे रंगवली...बाशिंगे बांधली.. चढविल्या झुली..एनेदार.... राजा ..परधान्या ..वजीर पठाण ...सुस्त .. मस्त असे दृश्य संतत्तधार पाऊस असताना बैल पोळ्याच्या निमित्ताने लोहा शहरात पाहवयास मिळाले लोहा शहरात जुन्या भागातील मारुती मंदिरास मुकदम यांचे बैल सर्वप्रथम फिरतात. सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम , माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी बैल फिरल्या नंतर शहरातील सर्व शेतकऱ्यांची बैल मारोती मंदिरास फिरली. वाजती गळ्यात ..घुंगराच्या माळा सण बैल पोळा ऐसा चाले...असे शेतकऱ्यांचे आपल्या बैलावरील प्रेम दिसले.शहरात व तालुक्यात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला .पावसाची थोडी विश्रांती मिळाली आणि वाजतगाजत दारासमोर बैलांचे पारंपरिक पद्धतीने लग्न लावण्यात आले . पशुधन कमी झाले पूर्वी सारखा आता पोळा राहिला नाही असेच चित्र आजच्या दिवशी दिसून आले.पण मातीचे बैल पुजण्याची घरात मांडण्याची परंपरा क...
Ganesh Murti ; क्लासिक एन एक्स फॅशनच्या वतीने मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम..! -NNL

Ganesh Murti ; क्लासिक एन एक्स फॅशनच्या वतीने मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम..! -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| येथील तिरंगा चौक स्थित क्लासिक एन एक्स फॅशन या कपड्याच्या भव्य दालनात प्रेमचंदानी आणि कुटुंबियांच्या वतीने व राबविण्यात येणारा इको फ्रेंडली गणेश मूर्ती हा उपक्रम याही वर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे "मूर्ती आमची किंमत तुमची" या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना क्लासिक एन एक्स फॅशनच्या संचालिका सौ काव्या प्रेमचंदांनी यांनी सांगितले की शाडू मातीचे गणपती हे निसर्गाला धरून म्हणजेच इको फ्रेंडली असतात ज्यामुळे पर्यावरणाचाही रास होत नाही आणि धर्माचे ही पालन आपल्या हातून होत असते याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आम्ही मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम आमच्या क्लासिक एन एक्स फॅशन या दालनामध्ये राबवितो यासाठी लागणाऱ्या गणेश मूर्ती आम्ही यापूर्वी आंध्र प्रदेश येथून मागवायचं पण अलीकडच्या काळात आम्ही या मुर्त्या कलकत्ता येथून मागविल्या आहेत. त्याबरोबरच ...
Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL

Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL

धार्मिक
नवीन नांदेड l आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते असे प्रतिपादन शिभप रजनीताई मंगलगे गंगाखेडकर यांनी चतुर्थ संजीवन समाधी उत्सवा निमीत्त भव्य कीर्तन सोहळा ०१ सप्टेंबर २४ रोजी शिवलिगेश्वर मंदिर सिडको येथे आयोजित चतुर्थ पुण्यस्मरण सोहळा प्रसंगी केले. प.पु.सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज दि. १ सप्टेंबर २० रोजी लिंगैक्य झाले, माऊलींनी १०४ वर्षे आपले आयुष्य समाजासाठी अहोरात्र झिजवले, दिव्य-सानिध्य प.पु. गुरुवर्य राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी वीरमठ (राजुर) अहमदपुर यांचे अमृतोपदेश ०१ सप्टेंबर २०२४ रोज रविवारी आयोजित केला होता.यावेळी शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेड (सुप्रसिध्द किर्तनकार व गुरुदेव या चरित्रपर पुस्तकाच्या लेखिका) यांचे शिवकीर्तन व सुप्रसिध्द गायीका गोदावरीताई मुंडे गंगाखेड यांची गायनसाथ दिली. यावेळी अप्पा...
पंढरपूर च्या संत नामदेव पायरीचा दरवाजा २६ लाखाच्या चांदीने मढविणार : बिलोली च्या भाविकांचा पुढाकार -NNL

पंढरपूर च्या संत नामदेव पायरीचा दरवाजा २६ लाखाच्या चांदीने मढविणार : बिलोली च्या भाविकांचा पुढाकार -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार बांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार या आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हे काम करून देणार आहेत. सदरचे भाविक है श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त असून नियमित दर्शनासाठी जात असतात ते बिलोली (जिल्हा नांदेड) येथील रहिवासी असून, या दरवाजासाठी सुमारे ३० किलो चांदीचा वापर करण्यात येणार असून, त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे २६ लाख इतकी किंमत होत असल्याचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा चे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा चे प्रवेशद्वारावरच संत नामद...
Shree Kedar Jagadguru’s : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता -NNL

Shree Kedar Jagadguru’s : श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्री हिमवत्‌‍ केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008 श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य (उत्तराखंड) यांच्या 52 व्या श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा बुधवार दि. 4 सप्टेबर रोजी होणार आहे. हा श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा गुरु दशमुख आश्रम भीमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड येथे होणार आहे. त्या अनुषंगाने 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रावणमास अनुष्ठान कार्यक्रमनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी सुरु आहे. या निमित्ताने दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 दु.12 यावेळात इष्टलिंग महापुजा, दु.12 ते 2 यावेळात धर्मसभा आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दु. 2 ते 6 यावेळात महाप्रसादाचा कार्यक्रम होइल. या सर्व कार्यक्रमाचा भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदशमुखाश्रम गोपाळचावडी भक्तमंडळी यांनी केले आहे....
beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील गणेश मूर्तीकार गोविंद लक्ष्मण चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक अशा गणेश मूर्तीला ग्रामीण भागासह सार्वजनिक व घरगुती गणेश मंडळांनी मागणी केली असून या वर्षी तिस टक्यांनी भाव वाढले असून महागाईतही गणेश मूर्ती मागणी वाढल्याचे सांगितले, सार्वजनिक मंडळांनी गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक मुर्तीकारांना प्राधान्य मिळत असल्याने मुर्ती कलाकार मध्ये ऊत्साह असल्याचे सांगितले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मूर्ती ला लागणारे साहित्य कलर, वारनेस,माती पिओपी ,नारळ काता हे साहित्य तिस टक्यांनी वाढले आहे तर मजुरी दरात वाढ झाल्याचे सांगुन दरवर्षी फेब्रुवारी मध्ये साधारण एक दोन फुटी गणेश मुर्ती तयार करावयाची व नंतर उर्वरित तीन महिने कलर देणे हि कामे नित्यांचे झाल्याचे सांगुण मोठया मुर्ती चार फुट तयार करण्यासाठी लागणार वेळ जागा यानुसार व मागणी प्रमाणे करण्यात येत अस...
error: Content is protected !!