Wednesday, May 20

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

Arrival of Shri Ganesha : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत श्री गणेशाचे शहरी व ग्रामीण भागात ऊत्साहात आगमन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सिडको हडको भागासह वसरणी, नवीन कौठा जुना कौठा व ग्रामीण भागातील विष्णुपुरी, वाजेगाव, धनेगाव ,तुप्पा याससह पाच गावात एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया घोषणांनी स्वागत करून स्थापना करण्यात आली.शहरी भागात २२ तर ग्रामीण भागात १३ सार्वजनिक गणेश मंडळ यांनी आनलाईन परवानगी घेतली आहे. तर अनेक गणेश मंडळ यांनी परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव चतुर्थी निमित्ताने सिडको हडको परिसरातील शहरी भागातील नरसिंह, श्री गणेश, रिघ्दी सिध्दी, अष्टविनायक, बाळ गणेश मंडळ ,आर्दश,महषी वाल्मीकी, नवयुवक, जयमल्हार जिजाऊ, वसरणीअसदवन,वाघाळा, राहुल वैभव नगर, हडको, सिडको,जिजाऊ, गरूडा, सिध्दी विनायक, महाकाल, एकता, विसावा गणेश मंडळ, शिवराज...
Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| रेल्वे, ट्रैक्टर, टेम्पोने शहरात दाखल जालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल - गोपाल व नवतरुण युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषापूर्ण वातावरणात स्वागत केले. दरम्यान पावसाच्या सारी कोसळल्याने गणरायाच्या स्वागताला वरून राजाही अवतरले असल्याने उत्सवाच्या आनंदात आणखीन भर पडली होती. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेला होता. श्रावण शुक्ल ४ दि.०७ सप्टेंबर शनिवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी वरून राजाने स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपला...
Nanded Collector Abhijit Raut was gifted Gomay Ganesh : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अभिनेता विनय देशमुख यांचेकडुन गोमय गणेश भेट -NNL

Nanded Collector Abhijit Raut was gifted Gomay Ganesh : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अभिनेता विनय देशमुख यांचेकडुन गोमय गणेश भेट -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सिने अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंचे शेण,माती,गोमुत्र पासुन बनवलेली "गणेश मुर्ती" गोमय गणेश भेट दिली आहे. पर्यावरण पुरक गणेश मुर्ती असल्याने राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गणेश उत्सव काळात श्री गणेशाची प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन बनवलेल्या मुर्ती पुजेत ठेवतात. नंतर त्याचे विसर्जन करतात परंतु प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात दिर्घ काळ तशाच राहुन पर्यावरणास बाधक ठरतात याला पर्याय म्हणुन शाडु मातीच्या मुर्ती ही संकल्पना समोर आली. याही मुर्ती विसर्जनानंतर त्याचा गाळ साचतो. याही पुढे जाऊन अभिनेता विनय देशमुख यांनी गाईंच्या शेण गोमुत्रा पासुन गोमय गणेश बनवण्याचे काम मागिल दोन वर्षा पासुन सुरू केले आहे. गोमय गणेश पाण्यात सहज विरघळतो, तुळशी वृंदावनात विसर्जीत केल्यास त्याचे खत बनते, या मुर्तीत वेगवेगळ्या वनस्पतीच्या ज्यात तुळ...
Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने घेतली पाहिजे. आपण कोणत्याही धर्माचे असू पण इतर धर्माबद्दल आदर बाळगावा असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. गणेशोत्सव, ईद-ए- मिलाद, वर्षवासानिमित्त जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आर डी सी वडदकर, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सुरज गुरव, डी वाय एसपी आयपीएस कृतिका मॅडम, उपायुक्त गिरीश कदम, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, वसिम भाई शोयब तसेच गणेशोत्सव...
rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL

rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागात सार्वजनिक जयंती मंडळ यांनी परवानगी घेणे, मंडप सज्जावट यासह अनेक कामे अंतिम टप्प्यात आली असून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ग्रामीण शहरी भागातील जवळपास २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी साठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ७ सप्टेंबर रोजी गणेश बाप्पा आगमन होणार असून दोन दिवस शिल्लक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी परराज्यातील तेलंगणा व आंध्रप्रदेश तर महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागातील अमरावती, उमरखेड,लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, नांदेड जिल्ह्यातील लोहा ,नांदेड शहरातील गाडीपुरा,जुना व नवीन कौठा भागातील, साईबाबा मंदीर वसरणी परिसरातील गणेश मूर्ती कारखाना येथुन आकर्षक व सुबक अशा गणेश मूर्ती आणल्या तर काही मंडळानी बुकिंग केले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी शहरी भागातील मनपा क्षेत्रीय क...
Collector Abhijit Raut : गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collector Abhijit Raut : गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज शांतता समितीच्या बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती. सोशल मिडियाच्या अफवांना दुर्लक्ष करा जिल्ह्यात गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अग...
Chivardan to Bhikkhu Sangha by President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते भिक्खू संघास चिवरदान -NNL

Chivardan to Bhikkhu Sangha by President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते भिक्खू संघास चिवरदान -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भिक्खू संघाला चिवरदान करण्यात आले. तसेच भिक्खू संघाकडून त्यांना बुद्ध मूर्ती भेट देण्यात आली. डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत बोधिपालो महाथेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पंयाबोधी थेरो, भदंत पय्यानंद थेरो, भदंत नागसेनबोधी थेरो, भदंत सत्यपाल थेरो, भदंत करुणानंद थेरो, भदंत महाविरो, भदंत धम्मशील थेरो आदी भिक्खू संघ उपस्थित होता. उदगीर (जि. लातूर) येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थ...
In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण हनुमान मंदिराच्या वेशीवर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानकरी असलेल्या मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या बैलांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अनेक शेतकरी राजाने सजवून आणलेल्या बैलजोडी ढोलताशांच्या गजरात फिरवण्यात आला, यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. बैलपोळा सणाच्या निमित्ताने विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता ढोलताशांच्या गजरात, उत्साहाने शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला सजावट करून या बैलपोळा मिरवणूक मध्ये सहभागी केले होते, एक दोन नव्हे तर दिडशे बैलजोडी सहभागी झाली होती, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मानकरी मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या मानकरी असलेल्या बैलजोडीने पोळा फिरविण्यास सुरूवात केली,मुख्य पुजारी राजेजी महाराज ठाकूर या...
बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते – कृष्णकांत बावा -NNL

बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते – कृष्णकांत बावा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते, त्यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना शक्तीबल आणि प्रेरणा देते असे प्रतिपादन बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी केले. 1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आलेला आहे. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडले. संत बाबा बलविंदरसिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटरनॅशनल फाऊंडेशन ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अश्विनी बावा यांची विशेष उपस्थित होती. यावेळी संत बाबा बलविंदरसिंघ जी,नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,अमनदीपसिंग,कांचन बावा, सुशीलकुमार शीला, अश्विनी बावा यांचा विशेष सत्कार करण्या...
Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL

Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| पुढील वर्ष ओम नमः शिवाय....नामजपाचे तिसरं वर्ष आहे. यंदा या जपामध्ये तुम्हाला सामील करून घेण्यासाठी महान घ्यावी लागली. पुढील वर्षी स्वतःहून श्रावण महिन्यात आयोजित होणाऱ्या ओम नमः शिवाय यज्ञात जास्तीत जास्त पुरुष व महिलांनी सहभागी होऊन पुण्यकर्म पदरी पडून घ्यावं. असा दिव्या संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी देऊन समारोपाला उपस्थित झालेल्या सर्वाना खूप खूप आशीर्वाद दिले. संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ओम नमः शिवाय नामजाप यज्ञाचा शुभारंभ दि.०५ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ०६ वाजता परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. ७१ वर्षाने आलेल्या श्रावण महिना सोमवारी आणि समारोप देखील सोमवारी होत असल्याने या महिनाभर अखंडपणे नामजप यज्ञ करण...
error: Content is protected !!