Wednesday, May 20

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

On the occasion of Gangauri festival, Mahalakshmi ; गणगौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुंटुबाचा निवासस्थानी महालक्ष्मी स्थापना,तिन दिवशीय पुजेची सांगता -NNL

On the occasion of Gangauri festival, Mahalakshmi ; गणगौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुंटुबाचा निवासस्थानी महालक्ष्मी स्थापना,तिन दिवशीय पुजेची सांगता -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गणगौरी लक्ष्मी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक निवासस्थानी व ग्रामीण भागात महालक्ष्मी स्थापना विधीवत पुजन करून स्थापना केली असून मुखवटे , मखर,मंडप व सजावट केली असून मोठ्या संख्येने महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप,लाईट,डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले होते तर जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक,यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तर महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने सिडको परिसरातील विविध भागात पूजेचे साहित्य विक्री साठी आले होते. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आवाहन १० सप्टेंबर रोजी सायंकाळी झाले तर११ लासायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ सप...
Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

धार्मिक, नांदेड
हदगाव। मोहम्मद पैगंबर व गणेश विसर्जन हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम योगायोगाणे दोन दिवसानी आल्यामुळे प्रशासनाला अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला आहे. हदगाव शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोहम्मद पैगंबराचा वाढदिवसानिमित्त मिलादुनबीचा कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी होता. परंतु गणपती विसर्जन दिनांक 17 सप्टेंबर रोजी असल्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने हदगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये दि 16 सप्टेंबर रोजी असलेला ईद-ए-मिलादू नबीचा कार्यक्रम 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी घेण्याचे ठरविले आहे. यामुळे दोन्ही समाजात ऐक्य व शांतता दृष्टीने हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी असे आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी हदगाव तहसीलदार हदगाव व हदगाव पोलीस स्टेशन...
Adv.Dilip Thakur’s residence : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी अमरनाथ गुहेमध्ये महालक्ष्मी मुर्त्याची स्थापना -NNL

Adv.Dilip Thakur’s residence : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी अमरनाथ गुहेमध्ये महालक्ष्मी मुर्त्याची स्थापना -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| विक्रमी चोवीस वेळा अमरनाथ चे दर्शन घेतलेले धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी यावर्षी अमरनाथची गुहा तयार करून त्यामध्ये महालक्ष्मी च्या स्थापना करण्यात आल्या असल्यामुळे या सुंदर देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणारे दिलीप ठाकूर यांनी यावर्षी त्यांच्या शिवशक्ती नगर, मील रोड, नांदेड येथील निवासस्थानी अमरनाथ ची गुहा तयार केली आहे.अमरनाथ ला ज्याप्रमाणे गुहा आहे त्याप्रमाणे हुबेहूब देखावा तयार करण्यात आला आहे.या गुहेत बाबा बर्फानीची देखणी पिंड, कबूतरे, त्रिशूल,डमरू, भगवा झेंडा च्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी श्री च्या पाचशे पेक्षा मुर्त्या ठेवण्यात आलेले आहे. एक दुसऱ्याशी किंचितही साम्य नसणाऱ्या या मुर्त्या पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो म...
Brahmakamal sprouted as many as 5 times this year : हाळणीत शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवले या वर्षात तब्बल ५ वेळा ब्रम्हकमळ -NNL

Brahmakamal sprouted as many as 5 times this year : हाळणीत शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवले या वर्षात तब्बल ५ वेळा ब्रम्हकमळ -NNL

धार्मिक, नांदेड
मुक्रमाबाद/नांदेड| मुखेड तालुक्यातील हाळणी येथील शंकरअप्पा हेसे यांच्या घरात यावर्षी मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री ५ ब्रह्मकमळ उगवले असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सलग पाच वेळा असे एकूण ११ ब्रह्मकमळ उगवले आहेत. मागील पाच वर्षापासून दरवर्षी सलग पाचव्यांदा हेसे यांच्या घरी ब्रह्मकमळ उमलत आहे. यंदा गुरूवार दि.२५ जुलै रोजी मध्यरात्री पहिल्यांदा १ ब्रह्मकमळ, याच महिन्यातील शनिवार दि.२७ जुलै रोजी मध्यरात्री दुसऱ्यांदा १ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०२ ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा २ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०९ ऑगस्ट रोजी चौथ्यांदा २ ब्रह्मकमळ व मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाचव्यांदा ५ ब्रह्मकमळ असे एकूण ११ ब्रह्मकमळ हेसे यांच्या घरी उमलले असून, या उगवलेल्या ब्रह्मकमळाचे समस्त परिवाराने मनोभावे पूजन,आरती करून दर्शन घेतले. ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यात उगवत...
Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य शासनाने भारतातील तोर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबरपर्यंत आहे.  या योजनेसाठो ६० वर्षावरील नागरिकांनों सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे अर्ज दाखल करायचे आहेत. ३० हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.  कशी आहे योजना ? - भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपेको एका स्थळाच्या यात्रकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्...
Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

Tehsildar Vitthal Parlikar : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम असला पाहिजे – तहसीलदार विठ्ठल परळीकर -NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| दैनंदिन जीवनात आपण एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असतो तसेच प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून सण उत्सव गणेशोत्सव , ईद व सर्व धार्मियांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. हे करताना सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच पोहचणार नाही. यांची काळजी घ्यावी असे आवाहन लोहा तहसीलदार व मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्स निमितताने शांतता समितीची बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बोलत होते. गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,माजी नगराध्यक्ष कि...
State Govt Tenga to Thirthakshetra Unkeshwar Sharbhang Rishi Ashram : तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रमाला राज्य सरकारचा ठेंगा -NNL

State Govt Tenga to Thirthakshetra Unkeshwar Sharbhang Rishi Ashram : तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रमाला राज्य सरकारचा ठेंगा -NNL

धार्मिक, नांदेड
किनवट /परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले किनवट तालुक्यातील एकमेव राम वन गमन मार्ग असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील शरभंग ऋषी आश्रम देवस्थानाची दयनीय अवस्था झाली असून विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारला झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील ग्रामीण 8 देवस्थानाच्या विकासासाठी 275 कोटी रुपये ला मंजुरी दिली. त्यामध्ये मात्र हेमाडपंती तीर्थक्षेत्र उनकेश्वरच्या विकासासाठी एक छदामही राज्य सरकारने निधी दिला नसल्याने किनवट माहूर मतदारसंघात तीव्र नाराजी पसरली आहे. नांदेड जिल्ह्या पासून तब्बल 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या व माहूरच्या पायथ्याशी असलेले गरम पाण्याचे झऱ्याचे तीर्थस्थानकुंड असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रम हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, वनवासात असताना त्यांनी येथील शरभंग ऋषी आ...
On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

On the occasion of Gangauri festival ; गणगौरी सणाच्या निमित्ताने सिडको तील मुख्य बाजार पेठेत महिलांची गर्दी – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| गणगौरी लक्ष्मी सणासाठी मुखवटे ,मखर,मंडप व ईतर साहित्य घेण्यासाठी महिलांनी सिडको व हडकोतील मुख्यबाजार पेठेतील दुकानात खेळणे व लक्ष्मी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप, लाईट, डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले असून जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक, यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. गणगौरी आवाहन १० सप्टेंबर सायंकाळी तर ११ ला सायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ तारखेला दर्शन व रात्री उशिरापर्यंत विसर्जन होणार असून गणपती बाप्पा स्थापना नंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या गणगौरी सणाच्या निमित्ताने महिलांनी मखर, मंडप, गणगौरी मुखवटे घेण्यासाठी गर्दी केली आहे. मंडप...
Sarvajna Sri Chakradhar Swami’s : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोक्षमार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही – आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा -NNL

Sarvajna Sri Chakradhar Swami’s : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोक्षमार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही – आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| महानुभाव पंथाचे महास्थान असलेल्या श्री देवदेवेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव गुरुवार दि.५ सप्टेंबर रोजी भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित धर्मसभेचा अध्यक्षीय समारोप करतांना आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा मोक्षमार्ग हा सहजासहजी प्राप्त होत नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष आचार्य महंत एकोव्यासबाबा, मकरधोकडा निवासी प.पू.न्यायंबासबाबा शास्त्री, महंत मुधोव्यासबाबा, आचार्य रुद्धपुरकरबाबा शास्त्री, आचार्य महंत पाचराऊतबाबा, महंत शहागडकरबाबा, प.पू. अशोक शास्त्री पुणे, हदगाव निवासी योगीराजदादा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन माहूर पिठाधिष प. पू. प. म.मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी केले होते. पुढे मार्गदर्शन करतां...
Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्री गजानन महाराज यांच्या 114 व्या पुण्यतिथी ऋषिपंचमी उत्सवानिमित्त रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी श्री गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड, तरोडा खु. नांदेड येथे सकाळी 7.३० ते 8.३० श्रीस अभिषेक आरती सकाळी 10 ते 12 सुप्रसिद्ध संतसाहित्याचे तत्वचिंतक तथा उपासक ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे श्री गजानन महाराजांचे जीवन कार्यावर प्रवचन आयोजित केले आहे. दुपारी 12 वा. महाआरती नंतर 1 ते 4 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे....
error: Content is protected !!