Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

चैतन्यनगर शिवमंदिर (नांदेड) येथे महाशिवरात्रीचा भव्य उत्सव – विवध कार्यक्रमाचे आयोजन..

चैतन्यनगर शिवमंदिर (नांदेड) येथे महाशिवरात्रीचा भव्य उत्सव – विवध कार्यक्रमाचे आयोजन..

धार्मिक, नांदेड
नांदेड| उत्तर शहरातील चैतन्य नगर येथील प्रसिद्ध व भाविकांच्या नवसाला पावणारे श्री शिव मंदिर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. रात्री 12-00 वाजता श्री शिव मंदिर संस्थान तर्फे शंभूचा अभिषेक झाल्यानंतर भाविकांचे अभिषेक सुरु होइल व सकाळी 4-00 वाजता भाविकांसाठी शंभूचे दर्शन सुरू होईल. मंदिर संस्थान तर्फे सकाळी 7-00 वाजता नांदेड उत्तर चे आ. बालाजीराव कल्याणकर व जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या शुभ हस्ते साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भावीक भक्तांना दिवसभर अखंडपणे साबुदाणा खिचडी चे वाटप सुरू राहणार आहे. भाविकांना शंभूचे सुलभतेने व कमी वेळात दर्शन उपलब्ध व्हावे याकरिता बॅरिकेट लावून पुरुष व महिलांच्या वेग वेगळ्या दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच उन्हापासून भ...
Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात

Maha Abhishek of Shri Parameshwara : श्री परमेश्वरचा महाअभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेला सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. सकाळी ०६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत मंदिर संस्थानचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या हस्ते सपत्नीक श्री परमेश्वराचा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकडा भजन होऊन सकाळी सात वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विना पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रा महोत्सवाची सुरुवात झाली असून, भाविक भक्ताना मंदिरात येताच प्रसन्न वाटले पाहिजे यासाठी मंदिराच्या कळसासह प्रवेश द्वार व मंदिर परिसरात विदुत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच कळस व परिसरात भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. सोमवारपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली असून, व्यासप...
A Kumbh Mela : औरंगाबाद येथून कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परतूर रेल्वे स्थानकावर थांबा

A Kumbh Mela : औरंगाबाद येथून कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परतूर रेल्वे स्थानकावर थांबा

नांदेड, धार्मिक, परभणी
नांदेड| प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 07101 / 07102 औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद या कुंभ मेळा विशेष रेल्वे साठी परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता अतिरिक्त थांबा जाहीर केला आहे. औरंगाबाद ते पटना (प्रयागराज मार्गे) विशेष रेल्वे गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 आणि 25 फेब्रुवारी ला धावणार आहे. तसेच पटना ते औरंगाबाद हि विशेष रेल्वे पटना येथून दिनांक 21 आणि 27 फेब्रुवारी ला धावणार आहे . या दोन्ही विशेष गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. परतूर रेल्वे स्थानकावर गाडीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील -   07101 औरंगाबाद ते पटना स्थानक 07102 पटना ते औरंगाबाद 19.53 / 19.55 जालना 05.10 / 05.12 20.23 / 20.25 परतूर 04.35 / 04.37 20.48 / 20.50 सेलू 04.10 / 04.12 प्रवाशांनी नो...
Shiv Mahapuran Story 108 Kundi Vishwashanti Dattayag Maha Yagya : मार्च महिन्यातील शिवमहापुराण कथा १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाची पिंपळगाव येथे जय्यत तयारी

Shiv Mahapuran Story 108 Kundi Vishwashanti Dattayag Maha Yagya : मार्च महिन्यातील शिवमहापुराण कथा १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाची पिंपळगाव येथे जय्यत तयारी

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्र ते होळी या पर्वकाळात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या दत्तमंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव परीसरात दिनांक ६ ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन (Shiv Mahapuran Story 108 Kundi Vishwashanti Dattayag Maha Yagya in the Month of March Successfully Prepared at Pimpalgaon) करण्यात आले आहे. या कथेसाठी भारतातील १ लाख गायीची सेवा करणारे संत श्रीश्रीश्री १००८, अयोध्या येथुन १००, वृंदावन येथुन ५०, ऋषिकेश जगन्नाथपुरी, बद्रिनाथचे मुख्य पुजारी, ऊज्जैन जगद्‌गुरू संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील ३०० ते ४०० साधुसंत, महंतांच्या विशेष ऊपस्थीमध्ये सप्ताह सत्संग सोहळा होणार आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे.  भूतो नं भविष्यती होणाऱ्या सत्संग सोहळा अनंत श्रीविभ...
Gajanan Maharaj Temple ; सिडको येथील गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन

Gajanan Maharaj Temple ; सिडको येथील गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी सिडको येथील संत गजानन महाराज मंदिर संभाजी चौक सिडको येथे महाअभिषेक व भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,तर हडको येथील गजानन महाराज मंदिर येथेही प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे याही 25 व्या वर्षी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 श्रींच्या अभिषेक अरूण कुलकर्णी महाराज यांच्या मंत्रोच्चार करून केला,8 ते 10 होमहवन व सकाळी 10ते 1 यावेळी गजानन महाराज पालखी व गजानन महाराज फोटो असलेली भव्य मिरवणूक सिडको संभाजी चौक,संत गाडगेबाबा महाराज मंदिर, बालाजी मंदिर,महाराणा प्रतापसिंह पुतळा ,महाविर चोख, मार्ग मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशा गजर, फटाक्यांची आतिषबाजी मध्ये व काळा हनुमान मंदिर सिडको हडको भजनी मंडळ व महिलांच्या समावेश असलेली मिरवणूक काढण्यात आली.मिरवण...
Akhand Dattanam : माहूरगड येथील विष्णुकवि मठात अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

Akhand Dattanam : माहूरगड येथील विष्णुकवि मठात अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री श्री परमहंस परिवर्जकाचार्य १००८ महंत मधुसुदनजी भारती महाराज दत्त शिखर माहूरगड यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री संत प्रज्ञाचक्षु बालयोगी भगवान गिरीजी महाराज गुरू कैलास गिरीजी महाराज दत्त संस्थान आष्टी व बरडशेवाळा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२ फेब्रु.ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री.दत्त प्रभुच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त असलेल्या विष्णु कवि मठ मातृतीर्थ रोड माहूरगड येथे सप्ताहाचे आयोजन केले आहे.तरी भाविक भक्तांनी या अखंड दत्तनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा,असे आवाहान करण्यात आले आहे. जोपर्यंत पशुवृत्तीतुन आपण मानवतावादी होत नाही.जोपर्यतं मानवतावादी जीवातुन आपण आत्मसाधक होऊन तत्वमार्गक्रमण करत नाही आणि जोपर्यत आपण दत्तसाधक होऊन दत्ततत्वदास्यभक्ती करत नाही तोपर्यत आपला उद्धार या जगात अथवा या ब्रम्हांडात कोणीही करु शकणार नाही.या उदात्त...
Vishnupuri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजन

Vishnupuri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे 20ते 27फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून 27 फेब्रुवारी रोजी हभप शैलेश महाराज कामठेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे दि. 20 दि. 27 फेब्रुवारी पर्यंत ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदिर पुजारी, विष्णुपूरी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजीत केलेला आहे. दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन सकाळी 7 ते 9 शिवलिलामृत पारायण, सकाळी 11ते 12 गाथा भजन सायं. 6 ते 7हरीपाठ व रात्री 8 ते 10 हरी क...
Parameshwar Mandir : श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी केली भव्य शिवमहापुराण कथा स्थळाची पाहणी 

Parameshwar Mandir : श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी केली भव्य शिवमहापुराण कथा स्थळाची पाहणी 

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्रातील नांदेडच्या हदगाव तालुक्यात मौजे पिंपळगाव येथील भव्य श्री दत्त मंदिर आहे. पिंपळगाव दत्त संस्थानचे परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच दिनांक 6 ते 13 या काळात भव्य शिवमहापुराण कथा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या वर्षभरापासून तयारी सुरु आहे. दरम्यान शनिवारी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या संचालक मंडळींनी येथे भेट देऊन कथा स्थळाची पाहणी केली असून, या धर्म कार्यात हिमायतनगर वासियांचा सहभाग असावा म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी रोज सायंकाळी ठीक 7 वाजता मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक दिनांक 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान होणाऱ्या पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यात अनंत श्रीविभुषित श्रीमज्जगद्गुरू द्वाराचार्य श्री अग्रपिठाधिश्वर तथा मलूक...
Citizens of Sapti  : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

Citizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
नांदेड,अनिल मादसवार| पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यात आपला सहभाग असावा या उद्देशाने हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दत्त संस्थानाला भेट देऊन तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचे शॉल व पुष्पहाराने स्वागत करत आशीर्वाद घेत आपला खारीचा वाटा दिला आहे. जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे असलेल्या श्री दत्त संस्थान परिसरात आगामी मार्च महिन्यातील दिनांक 6 ते 13 या सात दिवसाच्या काळात भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळगाव संस्थानचे परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाची माहिती मिळताच नं भू...
Narmadeshwar Mahadev Temple : तरोडा येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व महारुद्र हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा

Narmadeshwar Mahadev Temple : तरोडा येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व महारुद्र हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा

धार्मिक, नांदेड
नांदेड| नांदेड शहरात उद्या दिनांक १७ फेब्रुवारी रोजी प्रगतीनगर तरोडा येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व महारुद्र हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा होणार आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक कार्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीप्रमाणे आहे. आज दिनांक १६-०२-२०२५ रविवार रोजी वेळ स. ८ वाजता कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. उद्या दिनांक १७-०२-२०२५ सोमवार रोजी स. ६ ते १२ या वेळी सर्व मंडल पूजन व होमहवन नर्मदेश्वर व गणपती आणि स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन होणार आहे. श्री श्री १०८ श्री महंत समगीर महाराज गुरु जयगिरी महाराज श्री दत्त मठ संस्थान, नांदगाव,गुरुवर्य श्री ष. ब्र. १०८ गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मुर्तीस्थापना (मठ संस्थान गिरगाव ता. वसमत, जि. हिंगोली) यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. किर्तनका...
error: Content is protected !!