Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

CIDCO ; सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड भव्य कावड यात्रेचे आयोजन

CIDCO ; सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड भव्य कावड यात्रेचे आयोजन

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको व श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने हिंदूं एकत्रिकरण साठी भव्य कावड यात्रा आयोजन 6 जुलै रोजी श्री सिध्देश्वर महादेव मंदिर सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही तिसऱ्या वर्षी हिंदू एकत्रीकरण साठी भव्य कावड यात्रेचा मार्ग श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर ND41 साईनगर बिडी कामगार कॉलनी सिडको ते हडको सिडको मार्ग महाराणा प्रतापसिहं चौक सिडको ते लातूर फाटा जुना मोंढा ते हनुमान पेठ,मुथा चौक ते देगांवचाळ मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड या मार्गावर सकाळी 08.00 वाजता सुरू होणार आहे,या यात्रेत भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री राम जन्मोत्सव समिती नांदेड, श्री हनुमान जन्मोत्सव सिडको हडको,भस्म रमैय्या मित्र मंडळ नांदेड यांनी केले आहे....
Jagadguru Ramanandacharya Narendracharyaji ; शेगाव येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

Jagadguru Ramanandacharya Narendracharyaji ; शेगाव येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

धार्मिक
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन दिनांक 08 व 09 ऑगस्ट 2025 रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, श्री पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगाव, जि. बुलढाणा येथे सकाळी 9 : 00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना,...
Annual Anniversary : लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये आज सालाना बरसी उत्सव : नागिणा घाट परिसराला आले जत्रेचे स्वरुप

Annual Anniversary : लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये आज सालाना बरसी उत्सव : नागिणा घाट परिसराला आले जत्रेचे स्वरुप

नांदेड, धार्मिक
नांदेड| ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. यानिमित्त पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी या उत्सवात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सालाना बरसी साठी भव्य दिव्य असा शामियाना उभारला आहे.. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली हा सालाना बरसीचा उत्सव आयजित केला आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे...
Naam Japa Yagya : ॐ नमः शिवाय नामजप यज्ञ भक्तिभाव, शांतता आणि शिवस्मरणात महिला पुरुष भाविक रंगले

Naam Japa Yagya : ॐ नमः शिवाय नामजप यज्ञ भक्तिभाव, शांतता आणि शिवस्मरणात महिला पुरुष भाविक रंगले

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर | भगवंतावर श्रद्धा असेल तर मोठं काही देण्याची गरज नाही साधेपणातच शिवशक्तीचं सामर्थ्य आहे, तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतो असा संदेश बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला. नामजप यज्ञाचा सातवा दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागलेली होती. मंत्रोच्चार, धूप, दीप आणि घंटानादाच्या गजरात “ॐ नमः शिवाय” चा अखंड जप अखिल वातावरणात गुंजत होता. रात्री 8 वाजता बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी ओम नमः शिवाय नामजप यज्ञात भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भागवताचार्य सारंग चैतन्य जी महाराज उपस्थित होते. सातव्या आणि आठव्या दिवशी उमरखेड तालुक्यातील बोरी येथील भजनी मंडळांनी रात्रीच्या अखंड नाम जाप मध्ये सहभाग घेतला. भजनी मंडळाच्या गोड आवाजात टाळमृदंगाची साथ त्यामुळे मंदिर परिसर ओम नमः शिवाय नामाच्या जयजयक...
Parmeshwar temple : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं – गोविंद मुंडकर

Parmeshwar temple : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं – गोविंद मुंडकर

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, परमेश्वर काळे| (वाढोणा ) जिल्हा नांदेड हे गावं तेलंगणा सीमेलगत आहे. येथे असलेले भगवान श्री परमेश्वर मंदिर हे अद्वितीय ऐतिहासिक व धार्मिक स्थान असून, याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष द्यावे अशी स्पष्ट मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांनी केली आहे.  "जसे नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील प्राचीन मंदिराचे जतन व विकासाचे कार्य सुरू आहे, त्याच धर्तीवर श्री परमेश्वर मंदिराचा देखील ऐतिहासिक वारसा जतन होणे अत्यंत आवश्यक आहे." बुधवारी श्री परमेश्वर मंदिरास श्रावण मासानिमित्त गोविंद मुंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन श्रीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केली. त्यांनी निरीक्षणात नमूद केले की, या मंदिराची पायाभरणी दगडी शिळांनी केलेली आहे, जे त्याच्या ऐतिहासिकतेचा पुरावा देतात. यावेळी त्यांनी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी सं...
Mahaprasad : अमरनाथ व चारोधाम यात्रा यशस्वी: महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad : अमरनाथ व चारोधाम यात्रा यशस्वी: महाप्रसादाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
नांदेड| २५वी व २६वी अमरनाथ यात्रा तसेच १७वी व १८वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ रविवार दि.३ २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी, नांदेड येथे महाप्रसाद ठेवण्यात आले आहे. यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती उपक्रमातील अन्नदात्यांचा, कृपाछत्र व मायेची उब च्या देणगीदारांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.* गेल्या २५ वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्यानंतर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. यावर्षी महाप्रसादाचे आयोजन सौ.जयश्री व धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर,सौ.बिना व राजेशसिंह ठाकुर, सौ.सुनिता व संजय कलकोटे, सौ.वंदना व वैजनाथ फड,सौ.सुषमा व नरसिंह ठ...
Gurudwara ; चिखलीकर यांच्या वाढदिवसनिमित्त गुरुद्वारात श्री अखंडपाठ प्रारंभ

Gurudwara ; चिखलीकर यांच्या वाढदिवसनिमित्त गुरुद्वारात श्री अखंडपाठ प्रारंभ

नांदेड, धार्मिक
नांदेड l नांदेडचे माजी खासदार आणी लोहा - कंधार विधानसभेचे आमदार श्री प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त येथील धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब येथे श्री आखण्ड पाठचे प्रारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आले. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सदस्य स. जगबीरसिंघ शाहू यांच्या तर्फे या पाठाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दि. 31 जुलाई 2025 ठेवण्यात आलेल्या पाठाचे समापन शनिवार, दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात येईल. आज श्री अखंडपाठ आरंभ होतांना स. जगबीरसिंघ शाहू, स. हरभजनसिंघ दरोगा आणी शाहू कुटुंबीय उपस्थित होते. प्रतापराव पाटिल चिखलीकर यांना उत्तम स्वास्थय लाभो व त्यांची दिनोंदिन प्रगति व्हावी अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. दि. 1 ऑगस्ट रोजी आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर स्वतः गुरुद्वारा दर्शन करुन प्रार्थना करणार आहेत अशी माहिती स. जगबीरसिंघ शाहू यांनी दिली...
Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

Nagpanchami : कारला येथे नागपंचमीच्या शिराळाच भक्तीमय वातावरणात विसर्जन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर| ग्रामीण भागात यावर्षी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला असुन, कारला येथे शिराळ देव मांडून दिवसभर गावातील महिलांनी पारंपारिक गाणे गायन करून सण साजरा केला. संस्कृती प्रमाणे देवाच पूजन करून सायंकाळी विसर्जन करण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यात गावोगावी नागपंचमीच्या सणाला शिराळ सण उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. या शिराळ देवाची कारला येथे गेल्या अनेक वर्षापासून परंपरा कायम असुन, नागपंचमीच्या सणाला दुसऱ्या दिवशी या शिराळ मांडण्यात येतो. शिराळ च्या भोवताली महिलां पारंपरिक भक्तीमय गीत सादर करण्यात येत असते श्रावणातला पहिला सण नागपंचमी नागपंचमीला नागाची पूजा करतात या सणाला सांस्कृतिक परंपरा आहे . कारला येथे बुधवारी नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून शिराळ पुजन करून टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस जमादार नवाब पठाण, पोलि...
Nagoba Temple ; नागबर्डी येथे नागोबा मंदीरात दर्शनासाठी श्रध्दाळू भाविकांची रांगच रांग

Nagoba Temple ; नागबर्डी येथे नागोबा मंदीरात दर्शनासाठी श्रध्दाळू भाविकांची रांगच रांग

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे नागबर्डी ता . कंधार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नागोबा मंदिरात याठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नागराजाची मोठी यात्रा भरत - आसते. येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. नागोबा मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे - श्रद्धास्थान असून याठिकाणी - जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील - हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. त्याठिकाणी पूर्वीपासून एक प्रथा रूढ आहे त्या परिसरात कोठेही साप आढळल्यास त्याला मारले जात नाही व तेथील परिसरातील - शेतीतील कडूलिंबाच्या झाडास चुकूनही शेतकरी त्याची (कत्तल) मोडुन टाकत नाहीत . व सरपण म्हणून त्याचा उपयोग करत नाहीत. जीर्ण झालेले एखादे लिंबाचे झाड जर उन्मळून पडलेच तर ते जागेवरच कुजले जाते, ही प्रथा त्याठिकाणी आजही सुरू आहे. यंदा ही यात्रा दि.२० जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी याठिकाणी ...
Shravan ; श्रावण सोमवार निमित्त आमदार बालाजी कल्याणकर व तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते महादेवाची महापूजा

Shravan ; श्रावण सोमवार निमित्त आमदार बालाजी कल्याणकर व तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते महादेवाची महापूजा

नांदेड, धार्मिक
नांदेड l श्रावण सोमवारच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र विमलेश्वर देवस्थान, मरळक येथे आमदार मा. बालाजीराव कल्याणकर व तहसीलदार मा. संजय वारकड यांच्या शुभहस्ते भगवान शंकराची महापूजा संपन्न झाली. यावेळी भाविकांनी हर हर महादेव, ॐ नमः शिवाय च्या जयघोषात महादेवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसर भक्तिभावाने गाजून गेला. श्रावण महिन्याच्या शुभारंभाचा पहिला सोमवार मरळक येथील श्री क्षेत्र विमलेश्वर देवस्थान येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व त्यांच्या पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर, तसेच नांदेडचे तहसीलदार व महादेव देवस्थानचे विश्वस्त संजय वारकड आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती वाडकर यांच्या सपत्नीक हस्ते भगवान महादेवाचा रुद्राभिषेक व महापूजा संपन्न झाली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंत्रोच्चार, वादन आणि हरहर महाद...
error: Content is protected !!