Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज

Swami Sarang Chaitanyaji Maharaj : हिरण्यकशिपूचा वध आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतानी घेतला नृसिंह अवतार – हभप.भागवताचार्य परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीमद भागवत महापुराण कथेत तिसऱ्या दिवशी विशेषतः सप्तम स्कंधामध्ये हिरण्यकशिपूचा वध आणि नृसिंह अवताराचे अत्यंत प्रभावी आणि भक्तिरसपूर्ण वर्णन हभप. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चौतन्यजी महाराजांनी सांगितले आहे. हे संपूर्ण प्रसंग भक्त प्रल्हादाच्या भक्ती, हिरण्यकशिपूच्या अहंकार आणि भगवंताच्या अद्वितीय लीलेचे प्रतीक मानले जाते असल्याचे ते म्हणाले. उपस्थित भाविक भक्तांना भागवत कथा सांगताना स्वामीजी म्हणले कि, हिरण्यकशिपू हा एक बलाढ्य असुरराजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवले होते. “माझा मृत्यू न होवो, ना मनुष्याने, ना प्राण्याने, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना शस्त्राने, ना अस्त्राने, ना आकाशात, ना पृथ्वीवर, ना पाताळात.” हा वर मिळाल्यानंतर त्याचा अहंकार अनियंत्रित झाला. त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. सर्वत...
annual anniversary : लंगर साहिब च्या सालाना बरसी उत्सवाची तयारी सुरू

annual anniversary : लंगर साहिब च्या सालाना बरसी उत्सवाची तयारी सुरू

धार्मिक, नांदेड
नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होत आहे. यानिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होणार आहे. सालाना बरसी साठी भव्य दिव्य असा शामियाना उभारला जात आहे.. पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल होत आहेत. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या वतीने हा सालाना बरसीचा उत्सव आयजित केला जातो. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सच...
Sarang Chaitanyaji Maharaj : सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला – भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराज

Sarang Chaitanyaji Maharaj : सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला – भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगरचं श्री परमेश्वर महादेव मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर एक पवित्र धाम आणि तीर्थक्षेत्र देखील आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. वर्षातून तीन दिवस सतत कथा होणं, हे महाराष्ट्रात पहिला गाव म्हणजे परमेश्वराची वाढोणा नगरी आहे. नित्य पूजा-अर्चा, आणि स्थानिक भाविकांचा नित्यसंग हे सर्व या स्थळाला सामान्य मंदिरांपेक्षा वेगळं आणि तीर्थाचे स्वरूप प्राप्त करून देत. त्यामुळे सर्वांनी इतर कोणत्या मंदिरात दर्शनाला नाही गेलं तरी चालेल मात्र सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला असे असे उदगार भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराजांनी काढले. पुढे मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणले कि, भागवत केवळ ग्रंथ नव्हे "भागवत ही ज्ञानाची गंगा आहे. तिला बोलवावं लागत नाही, ती आपोआप येते." जिथे श्रद्धा असते, जिथे मन...
Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन

Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास पहिला सोमवार निमित्त दी 28 जुले पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय , जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या. रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार 28 जुले रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस...
Monday of Shravan : पहील्या श्रावण सोमवारी २० हजाराहून अधिक भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्‍वराचे दर्शन

Monday of Shravan : पहील्या श्रावण सोमवारी २० हजाराहून अधिक भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्‍वराचे दर्शन

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हर हर महादेव ...परमेश्वर भगवान कि जयच्या गजरात सकाळी ५ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान असेलल्या शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीचा पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांड नायक, देवाचे देव मानल्या जाणाऱ्या श्री भोळ्या शंकरच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवाराचं (First Monday of Shravan) व्रत करनाऱ्यासह हजारो महिला- पुरुष भक्तांनी दिनांक 28 रोजी श्री परमेश्वर दर्शनासाठी रांग लावली होती. सायंकाळपर्यन्त जवळपास २० हजाराहून अधिक भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली. वृत्त वैकल्याचा महीना श्रावण मासाची सुरवात दि.२३ बुधवार पासुन झाली आहे. विदर्भ -मराटवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरवासीयांचे श्...
CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत

CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी साईबाबा मंदिर येथून निघालेल्या 27 जुलै रोजी शिर्डी कडे निघालेल्या या पदयात्रेचे सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर रांगोळी, फटक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात व विविध ठिकाणी महाआरती, अन्नदानाचे वाटप करून स्वागत करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या सह माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक संघटना व महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दर वर्षीप्रमाणे सलग 14 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता साईबाबा नगर बिडी कामगार कॉलनी सिडको येथून महाआरतीने प्रारंभ झाला,यावेळी वैजनाथ देशमुख,विनोद कांचनगिरे,डॉ.नरेश रायेवार,जयश्री जयस्वाल,सुषमा गहिरवार, यांच्या सह अध्यक्ष गणेश जैस्वाल, नागोराव वाघमोडे, गणेश भद्रे, मारोती वाघमारे,दता लोंढे,श...
Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

नांदेड, धार्मिक, लेख
मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात. 1 अ. देवीचे पूजन अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे. अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवणे) या क्रमाने ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत पूजा करावी. पूजा झाल्याव...
Shravan month : श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ; श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

Shravan month : श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ; श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

नांदेड, धार्मिक, लेख
प्रस्तावना -  हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी  'श्रावणी सोमवार' हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 28 जुलै आणि 4, 11,18 ऑगस्ट  या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे,पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून 'श्रावणी सोमवार' हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरु असतात. अश...
Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज

Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| मृत्यूपूर्वी जर चित्त भगवंतात स्थिर असेल, तर आत्म्याला पुढील जन्माची आवश्यकता राहत नाही. गंगेचा जल, रामाचे नाम, संतसंग, आणि भगवंताचे चरणस्मरण हे जीवनाच्या शेवटी मुक्तीचे द्वार उघडतात. श्रीमद भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) हा ग्रंथ केवळ एक धार्मिक पुस्तक नाही, तो मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास सांगतो. श्रीमद भागवत म्हणते "मानवाचा खरा धर्म तोच की, जो भगवंतावर निःस्वार्थ भक्ती निर्माण करतो आणि ज्यामुळं आत्मा आनंदित होतो." "प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येक गोष्ट आधीच लिहून ठेवलेली आहे" ही कल्पना भारतीय संस्कृतीत 'प्रारब्ध', 'कर्म' आणि 'दैव' या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. असे विचार हभप.सारंग चैतन्यजी महाराज (Habap.Sarang Chaitanyaji Maharaj) यांनी मांडले. वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रीमद भागवत महापुराण कथेला दिनां...
Bajrang Dal : पवित्र श्रावण सोमवार निमित्त शाळांना दुपारी अर्धी सुट्टी द्या- बजरंग दल

Bajrang Dal : पवित्र श्रावण सोमवार निमित्त शाळांना दुपारी अर्धी सुट्टी द्या- बजरंग दल

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| शुक्रवार पासून हिंदू सणांपैकी सर्वात मोठा पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. शहरातील परमेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र असल्याने सोमवारी दर्शनासाठी सर्व जण येतात हि बाब लक्षात घेत सर्व शाळांनी श्रावण सोमवारी दुपारची सुट्टी (Give half-day holiday) देण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर शाखा बजरंग दलाच्या वतीने एका निवेदनाद्वारे शाळा प्रशासनाला करण्यात आली आहे. पवित्र श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांच्या सण उत्सवाची रेलचेल चालू असते. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना पवित्र मानला जातो. आपल्या वाढोणा शहरात श्री परमेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र आहे. मंदिरात ओम नमः शिवाय नामजाप आणि इतर धार्मिक सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साही वातावरण तयार होते आहे आणि सर्वच जण श्री परमेश्वर, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु वेळ मिळत नसल्...
error: Content is protected !!