नांदेडधार्मिक

beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील गणेश मूर्तीकार गोविंद लक्ष्मण चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक अशा गणेश मूर्तीला ग्रामीण भागासह सार्वजनिक व घरगुती गणेश मंडळांनी मागणी केली असून या वर्षी तिस टक्यांनी भाव वाढले असून महागाईतही गणेश मूर्ती मागणी वाढल्याचे सांगितले, सार्वजनिक मंडळांनी गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक मुर्तीकारांना प्राधान्य मिळत असल्याने मुर्ती कलाकार मध्ये ऊत्साह असल्याचे सांगितले.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश मूर्ती ला लागणारे साहित्य कलर, वारनेस,माती पिओपी ,नारळ काता हे साहित्य तिस टक्यांनी वाढले आहे तर मजुरी दरात वाढ झाल्याचे सांगुन दरवर्षी फेब्रुवारी मध्ये साधारण एक दोन फुटी गणेश मुर्ती तयार करावयाची व नंतर उर्वरित तीन महिने कलर देणे हि कामे नित्यांचे झाल्याचे सांगुण मोठया मुर्ती चार फुट तयार करण्यासाठी लागणार वेळ जागा यानुसार व मागणी प्रमाणे करण्यात येत असतो, दरवर्षी गणपती महादेव, लालबाग राजा, कृष्ण, जास्वाद फुलावरील, सावकार रूपातील, बाल गोपाळ यासह विविध आकारातील एक फुटापासून चार ते पाच फुटापर्यंत अनेक गणेश मुर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

मुर्ती बनविण्यासाठी घरातील सर्व परिवार कामाला असून गणेश मुर्ती सोबत बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैल जोडी ही विक्रीसाठी आणली असल्याचे सांगून गणेश मुर्ती मधुन ऊध्दरनिर्वाह भागत असल्याचे सांगितले. गणेश मुर्ती विक्रीसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी चौक लगत मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध केले असल्याचे सांगितले. गेल्या चार ते पाच वर्षापासून स्थानिक मुर्ती कलाकार यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी मुर्ती बनविण्यासाठी केलेली मागणी पाहता चांगले दिवस आल्याचे सांगितले, नांदेड शहरासह सिडको हडको भागात व ग्रामीण भागात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मागणी वाढल्याचे चिलोरे यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!