Saturday, May 16

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Yellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट -NNL

Yellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 या दिवशी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 - 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 - 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. आणि दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्...
Demand for status of pilgrimage : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी -NNL

Demand for status of pilgrimage : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पय्याबोधी थेरो यांनी केली. त्यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत करूणानंद, भदंत महविरो भदंत पंय्यानंद, भदंत धम्मशिल, भदंत धम्मधर, भदंत हर्षबोधी, भदंत शांतिरत्न, भदंत मोग्गलायन, भदंत मुदितानंद, भदंत पंय्यारत्न आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुरगाव श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासमोरील गायरान जमीन ही श्रामनेर शिबिरासाठी विपश्यना ...
The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नवी दिल्ली| आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौ-यावर राहणारआहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे....
Approval for Mumbai-Indore New Railway  ; मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी 309 किमी लांबीचा मार्ग 2028-29 पर्यंत होणार पूर्ण – NNL

Approval for Mumbai-Indore New Railway ; मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी 309 किमी लांबीचा मार्ग 2028-29 पर्यंत होणार पूर्ण – NNL

देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली| मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार  जिल्ह्यांना रेलसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या  प्रकल्पाचा एकूण खर्च ₹18,036 कोटी असून, तो वर्ष 2028-29 पर्यंत पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला आज मंजुरी दिली. ह्या प्रकल्पाव्दारे मनमाड-इंदुर  च्या प्रस्तावित  नवीन व लहान रेलमार्गाने  दोन्ही राज्यांमध्ये व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील तसचे याव्दारे पंतप्रधान नरेंद मोदी यांची “नव भारत” ची संकल्पना  पूर्ण होण्यास मदत होईल  आणि रोजगार/स्वयं...
Nana Patole ; मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा: नाना पटोले. – NNL

Nana Patole ; मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा: नाना पटोले. – NNL

राजकीय, मुंबई
मुंबई|  मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला.  शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मागील दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली, घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्याला पुराने वेढले आहे. पुरग्रस्त लोकांना मदतीची ...
JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

आरोग्य, मुंबई
मुंबई| जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले "QUACTIV™️ क्वाएक्...
NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय राज्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत, तसेच सह्यांची मोहिम राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकार महिला व मुलींना संरक्षण देऊ शकत नाही. मा. उच्च न्यायालयानेही या सरकारला फटकारले आहे तरीही त्यांना जाग येत नाही. महिलांचे संरक्षण तर ते करु शकत नाहीतच उलट मुलींनी ७ वाजल्यानंतर बाहेर पडू नये असे सल्ले देत आहेत. संवेदना न...
‘Surajya Abhiyaan’ ; ‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम ! – NNL

‘Surajya Abhiyaan’ ; ‘सुराज्य अभियाना’च्या तक्रारीचा परिणाम ! – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| वाहनांच्या हेटलाईटची प्रकाशकिरणे कशी असावीत ? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात. त्यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काहीजणांना स्वत:चा प्राणही गमवावा लागला. सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे. वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशकिरणांमुळे दीप...
मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत. भाजपा महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करु आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करु, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आझाद मैदानातील अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजपा युती सरकारची भू...
Gatishakti Yojana ; पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन – NNL

Gatishakti Yojana ; पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन – NNL

मुंबई
नवी दिल्ली| पीएम गतिशक्ति योजनेच्या अंतर्गत नेटवर्क योजना गटाच्या (NPG) 77 व्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकयेथील प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आणि अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील परिवहन क्षमतेत अधिक सुधारणा होईल,आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळू शकेल. पीएम गतिशक्ति योजनेअंतर्गत उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभाग (DPIIT)चे अपर सचिव राजीव सिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखालील नेटवर्क योजना गटाच्या 77 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिकमध्ये प्रस्तावित मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कासह सहा महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्य...
error: Content is protected !!