HomeनांदेडYellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड...

Yellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट -NNL

नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 या दिवशी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे.

23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 – 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 – 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.

आणि दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments