Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ramesh Chennithala : जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपची दिवाळी – रमेश चेन्नीथला -NNL

Ramesh Chennithala : जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपची दिवाळी – रमेश चेन्नीथला -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| भाजप शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत घरवापसी केली. तसेच अंधेरी मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेले काँग्रेस नेते मोहसीन हैदर यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला यांना भेटून आपण अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांनी निवडून आणू असे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलत...
Excise Department action ; उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त -NNL

Excise Department action ; उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड, मुंबई
मुंबई| राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोंबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थ, पर...
Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई | देशाच्या जडण-घडणीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठे योगदान राहिलेले आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील त्यांच्या वित्त, सामाजिक आणि धार्मिक विभागांची जबाबदारी वीरशैव लिंगायत समाजातील घटकांवरच असल्याचे पुरावे मिळतात. अलीकडे स्वतंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या राजकीय जडण-घडणी मध्ये वीरशैव लिंगायत आणि जंगम समाजाचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. अगदी सुरुवातीला आणि त्यानंतर काही कालावधी वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत. मात्र नंतरच्या कालावधीत बदलत्या राजकीय पस्थितीचा फार मोठा फटका वीरशैव लिंगायत समाजालाच बसलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रारंभ...
Rajendra Kshirsagar : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक -NNL

Rajendra Kshirsagar : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम  प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ते...
upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल. विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय शॅडो मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे : अ.क्र जिल्ह्याचे नाव शॅडो मतदान केंद्राची संख्या १ अहमदनगर २२ २ अमरावती ७३ ३ और...
SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

SAVWIPL planted : एसएव्हीडब्ल्यूआयपीएलने महाराष्ट्रात ७० हजार पेक्षा जास्त झाडे लावली -NNL

मुंबई, लाइफस्टाइल
मुंबई| स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ७० हजारपेक्षा जास्त झाडे लावून एक मोठा मैलाचा दगड पार केला आहे तसेच पर्यावरण पुनर्संचयन करण्याची या समूहाची बांधिलकी अधोरेखित केली आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर कार उत्पादन प्लांटजवळ ग्रीन फ्युचर पार्क येथे 1 लाखावे झाड लावण्याची सिद्धी देखील त्यांनी अलीकडेच प्राप्त केली आहे. ही झाडे शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन समृद्ध वातावरण प्रदान करतील. एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे वृक्षारोपण हा त्यांच्या अनेक हरित प्रकल्पांना सामावून घेणाऱ्या एका व्यापक शाश्वतता अजेंडाचा एक भाग आहे. या समूहाने आपले कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर प्लांटचे संपूर्ण डीकार्बनाईझेशन साध्य केले आहे म्हणजेच प्लांटचे संचालन १००% हरित ऊर्जेवर केले जाते. शिवाय, एसए...
Employment Opportunities in BFSI : सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ -NNL

Employment Opportunities in BFSI : सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ -NNL

मुंबई
मुंबई| सणासुदीच्या मोसमाचा आरंभ झाल्या-झाल्या भारतातील बँकिंग, फायनॅन्स सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र ग्राहकांचे वाढते व्यवहार आणि देवाण-घेवाण यांच्या व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे. या धामधुमीच्या कालावधीत योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक संस्था डिजिटल बँकिंग संचालन वाढवण्यावर आणि उत्तम ग्राहक सेवा प्रदान करू शकेल असे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. टीमलीझ सर्व्हिसेस या अग्रगण्य स्टाफिंग समूहानुसार बीएफएसआय क्षेत्रात रोजगार संधींमध्ये लक्षणीय वृद्धी दिसत आहे, विशेषतः रिटेल लेंडिंग, मायक्रोफायनॅन्स संस्था (एमएफआय) आणि पेमेंट सेवांमध्ये. गेल्या चार महिन्यांत वैयक्तिक तसेच दुचाकी आणि चार-चाकी वाहन कर्जांची मागणी १२%नी वाढली आहे. ही मागणी सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या खरेदीच्या मोसमाने प्रेरित आहे. त्याचा थेट परिणाम रि...
Congress assembly candidate ; काँग्रेस पक्षाची पहिल्या यादीत हदगावमध्ये आ. जवळगावकर, नायगाव डॉ. मिनल खतगावकर तर भोकर येथून कोंडेकर यांना उमेदवारी -NNL

Congress assembly candidate ; काँग्रेस पक्षाची पहिल्या यादीत हदगावमध्ये आ. जवळगावकर, नायगाव डॉ. मिनल खतगावकर तर भोकर येथून कोंडेकर यांना उमेदवारी -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई/नांदेड। काँग्रेस पक्षाने आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नायगाव येथून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मिनल निरंजन खतगावकर तर भोकर विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हदगाव येथील उमेदवारी कोणाला भेटणार यावर तर्क वितर्क लावले जात होते त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांची निवडणुकीतील उमेदवारांची ४८ पहिली यादी जाहीर करण्यात आला आहे. सदर यादीत मराठवाड्यातील अनेक उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे चार आमदार होते. त्यात भोकर, देगलूर, हदगाव व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. मात्र काँग्...
The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

The independence of the judiciary ; न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे! – NNL

लेख, नांदेड, मुंबई
अलीकडेच भारतीय सरन्यायाधीश यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती ची घोषणा केली त्यामुळे काही बाबींवर प्रकाश टाकणे अगत्याचे वाटते. त्यांनी सेवानिवृत्ती घ्यावी की त्यागपत्र द्यावे? यावर काही व्हिडिओ ऐकण्यात आले ज्यामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशीही अपेक्षा काहींनी व्यक्त केली. हो, हे अगदी खरे आहे, न्यायमुर्तीनी राजीनामाच द्यायला हवा. भारतीय संविधानातील कलम 32 हे अतिशय महत्वाचे आहे. या कलमास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे ‘हृदय’ आणि ‘आत्मा’ असे म्हटले होते. हे कलम म्हणजे न्यायव्यवस्था (र्क्षीवळलळरीू) होय. भारतीय लोकशाहीचा हा तिसरा आधारस्तंभ होय. संसदेने पारित केलेला एखादा कायदा हा संविधानातील तरतुदींची विसंगत नाही ना? याचा अर्थ लावण्याची जबाबदारी ही न्याय व्यवस्थेची आहे. असे काही घडले तर न्यायव्यवस्था र्‘ीीे र्ोीींीं’ (स्वतः होवून) होऊन याबाबत निर्णय देईल अशी तरतूद घटनेत आहे. अलीकडे भा...
Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

Tisari aaghadi ; देगलूर विधानसभामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघात माधवराव देवसरकर यांना उमेदवारी -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड/मुंबई। छत्रपती खा. संभाजीराजे, राजू शेट्टी आणि आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील तिसऱ्या आघाडीने महाराष्ट्र राज्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघामधून सुभाष साबणे तर हदगाव विधानसभा मतदार संघामधून माधवराव देवसरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आ. बच्चू कडू यांनी ही आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा...
error: Content is protected !!