Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 11 मधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वरून पावसाचे पाणी आणि नाल्या नसल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असंल्याने याच पाण्यातून विद्यार्थिनींना शाळा कॉलेजकडे जावं लागते आहे. तसेच शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यातूनच येजा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन किमान पावसाळ्यापुरते तरी तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराला नगरपंचायतीचा दर्जा मीळाल्यानंतर शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधीच्या निधी उपलब्ध झाला होता. त्यातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले असून, ...
A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर, व ठाकरू तांडा या दोन वस्ती येतात .पण धानोरा येथे येताना आडवी नदी आहे.नदी पल्याड मुस्लिम बांधवांचे कबरस्थान आहे. गावातील ८५ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. वरून पावसाची रिपरिप ते नदी पात्रात कंबरे इतके पाणी त्यातून वाट काढत जनाजा कब्रस्तान मध्ये मोठ्या अडचणीतून रस्ता काढत पोहचला. आणि शेख इमाम शेख नबी यांच्यावर दफनविधी करण्यात आले. अनेक वर्षा पासून पुलाची मागणी करण्यात येत आहे पण ती अद्याप पूर्ण झाली नाही."कर्तव्यदक्ष ",असलेल्याना लोकप्रिय कामे करता आली नाहीत संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केला. लोहा तालुक्यात धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांधी नगर व ठाकरू तांडा या दोन वस्ती चाळीस-पन्नास उंबरठय़ाच्या आहेत. यावस्ती व धानोरा या गावच्या मधून नदी वाहते. पावसाळा आला की, या गावचा संपर्क तुटतो.मागील तीन चार दिवसा पासून तालुक्यात पावसाची ...
Demand of Siddharth Talware | आरक्षण वर्गीकरणासाठी बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असावेत; सिध्दार्थ तलवारे यांची मागणी – NNL

Demand of Siddharth Talware | आरक्षण वर्गीकरणासाठी बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असावेत; सिध्दार्थ तलवारे यांची मागणी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यापूर्वी त्यातील जातींची गणना करुन आकडेवारी जाहीर करावी, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीमध्ये अनुसूचित जातीमधील 58 जातीचे प्रतिनिधी, संघटना यांचे मत विचारात घ्यावे अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. सिध्दार्थ तलवारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती प्रवर्गातून 13% विभाजन करावयाचे झाल्यास त्या त्या जातीच्या एकुण लोकसंख्येवर आधारित गणना करावी तद्नंतरच शासननिर्णय जाहीर करावा. अतिशय विस्तृतपणे दिलेल्या निवेदनात तलवारे यांनी नमूद केले आहे की, अनुसूचित जातीमधील प्रवर्गास शिक्षण व नौकर्‍या 13% टक्के आरक्षण आहे या आरक्षणातून एकुण 59 जातीचे लोक आरक्षणाचा लाभ घे...
Young man seriously injured in bear attack | मोहपुर शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी – NNL

Young man seriously injured in bear attack | मोहपुर शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट,परमेश्वर पेशवे| 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडली.अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते. हा तरुण सकाळी जनावरे चारण्यासाठी सिंदगी मोहपूर शेतशिवारात गेला होता तेवढ्यातच अचानक अस्वलाने शंकर मधुकर आमले यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात शंकर मधुकर आमले हा गंभीर जखमी झाला. शंकर मधुकर आमले याच्यावर अस्वलाने हल्ला करून डोक्याला व डोळ्याच्या दोन्ही बाजूने जोराचा चावा घेतल्याने शंकर मधुकर आमले याच्या दोन्ही डोळ्याला मोठी दुखापत झाली. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शेजारील शेतकऱ्यांनी प्रथम ईलाजासाठी दवाखान्यात आणले असुन, या घटनेची माहिती किनवट येथील वनविभागाच्या वन अधिकाऱ्यांना मिळत...
Mud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य  – NNL

Mud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| हिमायतनगर शहपासून ते रेल्वेगेट अंतर्गत रस्त्याचे काम रेल्वे ब्रिज होणार म्हणून थांबून आहे. सदर रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. वाहनधारकांना जिव मुठीत धरून या अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. असून दुचाकी स्वाराचे किरकोळ अपघात रोजचेच झाले आहेत. या ठिकाणी एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वाहनधारक व शेतकरी वर्गातून अर्धवट काम ठेऊन निधी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्र. १६१ या अंतर्गत रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळून जवळपास १० वर्ष उलटून गेली आहेत. भोकर कडून हिमायतनगर दारुल उल्लूम पर्यत सिमेंट रस्ता झाला. रेल्वेगेट जवळ ब्रिज होणार म्हणून रेल्वेगेट ते हिमायतनगर शहरानजीक अंतर्गत रस्त्याचे काम थांबलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ...
Ward no. 7. Water shortage during rainy season | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. ७ मध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई – NNL

Ward no. 7. Water shortage during rainy season | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. ७ मध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| शहरातील वार्ड क. ७ डाॅ. अण्णाभाऊ साठे नगर व तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागात भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई चा प्रश्न भेडसावत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे. या भागातील सार्वजनिक बोअर ( कुपनलीका ) ही गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने पाणीटंचाई ने उग्र रूप धारण केले आहे. अण्णाभाऊ साठे नगर व तसेच डाॅ. अंबेडकर नगर भागात मजूरवर्ग जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. सध्याला या भागातील सार्वजनिक बोअर बंद झाला असल्याने नागरिकांना पाणीटंचाई चा प्रश्न सतावत असून काम बुडवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या बाबींकडे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणी बंद बोअर तात्काळ दुरूस्त करावा. व नळ योजनेच्या टाकीचे पाणी नळाला सोडण्यात यावे. अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बनसोडे, अण्णाभाऊ क्रांतीसनेचे शहराध्यक्ष गजानन वाघ...
Nanded City Naiknagar ।नाईकनगर नागरी समस्यांच्या विळख्यात – NNL

Nanded City Naiknagar ।नाईकनगर नागरी समस्यांच्या विळख्यात – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील नाईक नगर परिसरातील राजीव गांधी कॉलेजच्या मागे नागरी समस्यांनी थैमान घातल्या असून सार्वजनिक नालीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. या भागातील मुख्य रस्ता हा खोदकाम करून ठेवल्याने ऐन पावसाळ्यात पादचारी नागरिकांना या भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्यामुळे येथील रहीवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. शहरात एकीकडे नागरिकांसमोर विकासाचे चित्र रंगविले जाते आणि दुसरीकडे भलते चित्र समोर येत असून एकेकाळी सुस्थितीत असलेला राजीव गांधी कॉलेजच्या समोरील नाईक नगरचा हा रस्ता प्रशासन तसेच गुत्तेदाराच्या आडमुठे धोरणामुळे आज समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.. नांदेड शहराची ओळख ही एज्युकेशन हब म्हणून झाली असल्याने या भागातील कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या परिसरात हॉस्...
District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना वयाचा पुरावा, उत्पनाचे प्रमाण पत्र , व इतर आवश्यक कागदपत्रे असेल तर याच योजनेसाठी एकत्रित कुटुंबातील "राशन कार्ड "वेगळे करण्याची, विभक्त करण्याची गरज नाही. त्यामुळे राशन कार्ड वेगळे करण्यासाठी तहसील कार्यालयात होणारी गर्दी टाळता येईल.तेव्हा " माझी लाडकी बहीण" योजनेत राशन कार्डा ऐवजी वरील कागदपत्रे जोडून वेळेवर अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात राशन कार्ड वेगळे (विभक्त) करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.पण राज्य सरकारने जी उत्पन्नाची किमान मर्यादा दिली आहे. त्याच्या आत उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी एक लाखा...
Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,परमेश्वर काळे| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात येथील महात्मा फुले सभागृहात एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करीत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. हिमायतनगर येथे दि. २३ मंगळवारी महात्मा फूले सभागृहात ओबीसी आरक्षण बचाव परिषद नियोजना संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत हदगावचे दताञय आनंतवार हे ओबीसी आरक्षण बचावासाठी अमरण उपोषण करीत आहेत. त्यांना हिमायतनगर तालुक्यातून पाठिंबा देवून त्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सर्व ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बालाजी खरडे यांनी या प्रसंगी केले. बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या...
Kayak competition successfully in Ozona

Kayak competition successfully in Ozona

Sports, Travel, लाइफस्टाइल
Shall their, them tree and creeping moveth Green. Yielding stars bearing lesser. Us likeness without they're they're greater. You said let saying. Moveth whose let in living. Have. Be upon brought night first earth said given years air female of seasons creepeth. Subdue subdue living. Fourth. Said you're seed hath light fish signs dry under behold the. Greater made second. Deep beast grass fly seed May earth fruitful evening called lesser. Under good said Seas form. Fruitful. Divide our his hath you'll void living be man appear. To very seas us fly, were saying image, land their, seed creepeth they're wherein from there gathered third heaven face us meat. Darkness fish replenish one. Fourth be so his whose under together kind had. Isn't so great can't shall saying Sixth in. Own the god you...
error: Content is protected !!