Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। देश विकासाकडे वाटचाल करतांना अनेक प्रगती केलेली आहे.परंतु हा विकास होत असतांना मात्र समाजातील काही संस्कार,मूल्य लोक पावत चाललेली आहेत त्याकरिता विद्यार्थी केंद्रबिंदू मानून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी कार्य केल्यास संस्कार संस्कारक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र नवीन नांदेड अंतर्गत आयोजित समाजकार्य पंधरवाडा,इतरांचा आदर व महिलांचा सन्मान,शिव्या मुक्त समाज अभियान व्याख्यान मालेत 'शालेय समाजकार्याची गरज दिवस शालेय समाज कार्यकर्त्याची भूमिका' याविषयावर बोलताना व्यक्त केले. सदरील कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र सोशल वर्क असोसिएशन 'मास्वे'चे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले याव...
‘Swaratim’ University  ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) स्पर्धा परीक्षेमध्ये संकुलातील अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सध्याच्या घडीला बरेच तरुण-तरुणी शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. प्रसंगी काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्रे संकुलातील विद्यार्थी अतिश तानगावडे, अजय कदम व अफझल शेख यांनी घवघवीत यश संपादन करून एमपीएससी मार्फत सांख्यिकी अधिकारी (वर्ग-२) पदी निवड झालेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अ...
Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

Nana Patole ; महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका: नाना पटोले – NNL

नांदेड, करियर, मुंबई, राजकीय
नंदूरबार/ मुंबई| महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. लातूर येथील जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. केशव विठ्ठल आलगुले यांना ‘प्रशंसणीय कार्यक्रम अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह असे आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक विज्ञान संस्थेचे स्वयंसेवक संदीप हरिभाऊ कळासरे यांना ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत मुंबई येथील कक्ष मंत्रालयामधून राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने विद्यापीठास मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रशंसणीय कार्यक्रम अध...
“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ या योजनेअंतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ललित व प्रयोगजिवी कला संकुल आणि उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड मां के नाम’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासकीय स्तरावरून ‘एक पेड मां के नाम’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या परिसरामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते फळझाडे लावण्यात लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ. प...
सोमेश्वर व जैतापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध -NNL

सोमेश्वर व जैतापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध -NNL

करियर, नांदेड
नांदेड। तालुक्यातील पिंपळगाव केंद्रा अंतर्गत आज दिनांक 22 8 2024 रोजी सोमेश्वर व जैतापूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीला गावातील पालकांनी व तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथराव बोकारे, पोलीस पाटील सोमाजी बोकारे ,प्रकाशराव बोकारे ,विठ्ठलराव बोकारे ,एकनाथराव बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे यांनी शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामदास बोकारे उपाध्यक्षपदी माधव बोकारे तर इतर सदस्य म्हणून चांदु बोकारे,आशा बोकारे,मंगला बोकारे,रामदास सरोदे,सुरेखा पांचाळ,कुंता बोकारे,सावित्रा सरोदे यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पालक सभा पार पडली व शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन समितीच्या सर्व नवनिर्वाच...
एक शून्य प्रतिक्रिया काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड -NNL

एक शून्य प्रतिक्रिया काव्यसंग्रहाची विद्यापीठ अभ्यासक्रमात निवड -NNL

करियर, नांदेड
नांदेड। येथील शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवी व्यंकटेश चौधरी यांच्या 'एक शून्य प्रतिक्रिया' या दुसऱ्या काव्यसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 'एक शून्य प्रतिक्रिया' हा काव्यसंग्रह शब्दालय प्रकाशन या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या संग्रहाचे मुखपृष्ठ चितारले आहे. श्री व्यंकटेश चौधरी यांचा यापूर्वी बहुचर्चित 'गंधबन' हा काव्यसंग्रह निर्मल प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला होता. यापूर्वीही त्यांच्या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवडलेल्या होत्या. चौधरी यांचे 'मन्याडीच्या कुशीत' हे ललित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अभ्यासासाठी होते. चौधरी यांनी ...
जिल्हास्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराने डॉ. दांडगे सन्मानित – NNL

जिल्हास्तरीय कृष्णाई पत्रकारिता पुरस्काराने डॉ. दांडगे सन्मानित – NNL

करियर, नांदेड
नांदेड। डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा कृष्णाई 2024 पुरस्कार दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक प्रा.अभयकुमार दांडगे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार, मानपत्र, 10 हजार रूपयांचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. भीमराव केराम यांच्या हस्ते दांडगे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पय्या बोधी थेरो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व आमदार भीमराव केराम, पीआरपीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, संस्थापक अध्यक्ष तथा पीआरपीचे प्रदेश महासचिव बापूराव (बापूसाहेब) गजभारे, स्वागत अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, संयोजक आकाश गजभारे, विनोद भरणे, संघरत्न खंदारे, सतीश बनसोडे, साहेबराव सोनकांबळे, सतीश पांडवे, बी एल वाघम...
सक्सेस अकॅडमी सिडकोचा सहा जणांची एसआरपीसाठी निवड -NNL

सक्सेस अकॅडमी सिडकोचा सहा जणांची एसआरपीसाठी निवड -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। सक्सेस अकॅडमी व अभ्यासिका सिडको नांदेड येथील विद्यार्थी विकास सोनकांबळे व मनोज मिसाळे या दोघांची एसआरपी एफ (SRPF) हिंगोली येथे व नितीन काळे यांची नागपूर पोलीस पदी निवड आणि प्रदीप गोरे, श्याम धंदे यांची नांदेड पोलीस पदी तर संतोष खटके आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन करताना सक्सेस अकॅडमी चे संचालक प्रा. गजानन मोरे ,प्रा.पाटील, प्रा.भद्रे सर ,प्रा. चव्हाण, व मस्के मॅडम व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात या सक्सेस अकॅडमीतील विधार्थी यांनी यश मिळवले, मैदानी चाचणी सह, विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व इतर विषाया सह सामान्य ज्ञान यावर ,चालू घडामोडीसह विविध विषयांवरील मार्गदर्शन विधार्थी यांना अभ्यासिका मधुन देत असत. दैनंदिन सराव व सततच्या नाविन्यपूर्ण अभ्यासिका मुळे विधार्थी मध्ये अभ्यास मध्ये भर पडली आहे. प्रा.गजानन मो...
अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न -NNL

अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न -NNL

नांदेड, करियर
नविन नांदेड। निवासी अंध विद्यालय वसरणी, नांदेड येथे स्काऊट गाईड कार्यालय नांदेड,नरसिंह प्राथमिक विद्यामंदिर सिडको तथा शिवाजी विद्यालय सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१-०८-२०२४ रोजीनरक्षाबंधनाचा सण अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाराव इबीतवार,स्काऊट गाईड कार्यालयाच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती भागीरथी बच्चेवार, सहा.जिल्हा आयुक्त रमेश फुलारी, जिल्हा संघटक स्काऊट जनार्दन इरले,श्रीमती शिवकाशी तांडे,रोव्हर राहुल चंदेल,त्याचबरोबर शिवाजी विद्यालयाचे स्काऊटर जाधव, फ्लॉक लीडर श्रीमती संगेवार त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी बुलबुल आणि गाईडच्या वतीने उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. यावेळी सर्व स्काऊटला गाईडला...
error: Content is protected !!