Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Ajinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला -NNL

Ajinkya Jadhav to America for higher education : अजिंक्य जाधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला -NNL

करियर, नांदेड
नांदेड| अजिंक्य विठ्ठलराव जाधव अमेरिकेतील नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी बोस्टन या जगप्रसिद्ध विद्यापीठात इंजिनिअरींग मॅनेजमेंट हा दोन वर्षाचा एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दि.२२ ऑगस्ट रोजी अमेरिकेला जात आहे. अजिंक्य लहानपणापासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून त्याने संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले तसेच बाहेरील देशात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी परीक्षा जीआरई तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आणि नाॅर्थइस्टर्न विद्यापीठाने अजिंक्य चा प्रवेश पक्का केला. अजिंक्य हा एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथिल प्रोफेसर विठ्ठलराव जाधव यांचा मुलगा आहे. या यशाबद्दल अजिंक्य चे जयप्रकाश दांडेगावकर, एमजीएम चे संस्थाध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालिका डाॅ.गीता लाठकर, उपप्राचार्य डाॅ.शिरिष कोटगीरे,डाॅ...
Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

करियर, नांदेड
नांदेड| येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम कुंटूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी कै. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त कर्मशाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत दिव्यांगांना विविध व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येवून दिव्यांगांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणवेश व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रमेश मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी खंडागळे, वाडेकर,बिजमवार, पेंडलवार, गोदगे,कलीम, इरफान अली, सौ. भुरेवार, श्रीमती वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच...
Honored with Banswate  ; सिडको ऊपडाकघर येथील बंसवते ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित – NNL

Honored with Banswate ; सिडको ऊपडाकघर येथील बंसवते ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित – NNL

Blog, करियर, नांदेड
नवीन नांदेड| सिडको ऊपडाकघर येथील ब्रॅच पोस्ट मास्टर तुप्पा येथील सुनिल बंसवते यांच्या छत्रपती संभाजी नगर येथे ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने १५ आगस्ट रोजी जनरल पोस्ट मास्टर अदनान अहमद यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्य पोस्ट कार्यालय नांदेड डाक घर अंतर्गत २१ ऊत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली होती यात सिडको ऊपडाकघर अंतर्गत असलेले तुप्पा येथील ब्रॅच पोस्ट मास्टर सुनिल बसवंते यांच्यी निवड करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे १५ आगस्ट रोजी ऊत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्या बदल सिडको डाकघर शिवाजीराव हंबर्डे,डि.बी. नागरगोजे, कर्मचारी नागेश वाघमारे, विशाल पारडे, ऋषीकेश शिंदे, बापुसाहेब येलमेकर, बालाजी नाईके,व्यंकट भोसले, साईनाथ पांचाळ, सय्यद रऊफ यांनी अभिनंदन केले ...
Bhavsar society – भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न – NNL

Bhavsar society – भावसार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न – NNL

Blog, करियर, नांदेड
नांदेड | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करून यात गुणवंत विद्यार्थ्यांचा व कन्यारत्न प्राप्त मातापित्यांचा सत्कार सोहळा भाऊसाहेब रंगार गल्ली नांदेड येथील विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतिरीक्त उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.लक्ष्मीकांत पेंडकर (बालरोगतज्ञ), नांदेड जिल्हा भावसार समाज कार्यकारणी अध्यक्ष गंगाधरराव बडवणे, कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले, सचिव सुरेश गोजे, भावसार समाज प्रगती महिला मंडळ अध्यक्षा विनाताई माळवतकर, विश्वस्त गोविंदराव मेहेत्रे व्यासपीठावर उपस्थित होते . नांदेड जिल्ह्यातील भावसार समाजातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील दहावी बारावी पदव्युत्तर व पदवी पदविका तसेच सीईटी नीट जेईई व तत्सम शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या व समाजातील कन्यारत्न प्राप्त झाले...
Youth Work Training Scheme ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड – NNL

Youth Work Training Scheme ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड – NNL

करियर, नांदेड
नांदेड | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 5016 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 आस्थापनाने 1024 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहेत.त्यापैकी 134 उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले असून इतर उमेदवार रुजू होणे बाबतची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्र...
Government Technical Institute ; शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय वर्कशाप – NNL

Government Technical Institute ; शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय वर्कशाप – NNL

करियर, देश विदेश
नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन व एसजीजीएस आयटी नांदेड, आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आरडिनो वर्कशॉप नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राम मंठाळकर, डॉ. सौ. राजश्री सर्वज्ञ, आयडिया लॅब प्रभारी एसजीजीएस आयटी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयडिया लॅब हा एआयसीटीई अर्थसहाय्य प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना आभासी रुपाने प्रोजेक्ट विना खर्च तयार करण्यात येतो. आदर्श भोसले, शशांक गीते यांनी ड्रोन डेमो, तापमान मोजणी असे विविध प्रात्यक्षिके सादर केली. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स व विद्युत विभागाचे एकूण 96 विद्यार्थ्यानी या वर्कशॉपचा वापर करुन घेतला. या वर्कशॉप साठी संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी अनुदान उपलब्ध करुन दिले. विद्युत विभागाचे विभागप्रमुख वि.वि. सर्वज्ञ, अधिव्याख्याता प्रा. अब्दुल हैदी, पी.बी.खे...
learning German ; जर्मन शिकण्यास व जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक युवकांनी नावनोंदणी करा – NNL

learning German ; जर्मन शिकण्यास व जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक युवकांनी नावनोंदणी करा – NNL

करियर
नांदेड| जर्मनीला नोकरी व रोजगारासाठी जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गास जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळातील इच्छुक शिक्षकांनी तसेच जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या पात्र व कुशल युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशामध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपियन देशामध्ये नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेवून महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करुन उपलब्ध करुन ...
Examination Center area ; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

Examination Center area ; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024 ही परीक्षा रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सांयकाळी 5 या कालावधीत दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे. या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्...
Election as Non-Governmental Member : कैलास खसावत यांची अशासकीय सदस्यपदी निवड -NNL

Election as Non-Governmental Member : कैलास खसावत यांची अशासकीय सदस्यपदी निवड -NNL

नांदेड, करियर
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील शिवाच्या टोकावर असलेल्या किनवट तालुक्यातील मौजे टेंम्बी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास प्रेमसिंग खसावत यांची संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. ग्राम विकास विभागाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी बाबत बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचात स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत प्रतिनिधी- अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे. परंतु बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने सदर अशासकीय सदस्यांची नेमणूक शासन स्तरावरुन करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन ज...
Narendra Chavan ; युवकांनी सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असले पाहिजे – नरेंद्र चव्हाण – NNL

Narendra Chavan ; युवकांनी सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असले पाहिजे – नरेंद्र चव्हाण – NNL

Blog, करियर, नांदेड
नवीन नांदेड| जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे नवीन प्रवेशित मुलांचा स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदरील सोहळा डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर हे होते प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. नरेंद्र चव्हाण व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते तसेच मंचावर माननीय श्री गव्हाणे प्रा.डॉ. प्रा.डॉ.यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर.मुजावर यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून मा.श्री.नरेंद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करताना मा.श्री. म्हणाले की युवक हा सर्व गुण व कौशल्यांनी परिपूर्ण असला पाहिजे त्याला स्वतः मधल्या सर्व कौशल्यांची जाणी...
error: Content is protected !!