नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात -NNL
नांदेड। नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी नोंदणी प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्पास येत्या दि.३० ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील पथक निहाय महिला व पुरुष होमगार्ड यांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दि.१६ ऑगस्ट २०२४ पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी तसेच शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यात येणार होती.परंतु प्रशासकीय कारणास्तव ही नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ती प्रक्रिया आता दि.३० ऑगस्ट २०२४ ते दि.५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे.
शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी तसेच शारीरिक क्षमता चाचणी यासाठी अर्ज क्रमांकानुसार नविन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमा...








