Thursday, May 14

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी अभ्यासकेंद्रास शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नांदेड विभागीय केंद्रातून प्रवेश संख्येमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले आणि केंद्रसंयोजक तथा उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड यांचा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माहूर परिसरातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच मुंबई , पुणे येथील कंपनीमध्ये नोकरी करून संसार चालविणाऱ्या युवांचे शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांनाही दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे या उदात्त हेतूने बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी २००४ मध्ये या अभ्यासकेंद्रास मान्...
Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि 26 जुलै 2024 रोजी राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव मेधा निरफराके यांनी केले आहे. इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा शुक्रवार 26 जु...
Kavi Kalidas Day | वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कालिदास दिनानिमित्त अतिथी व्याख्यान – NNL

Kavi Kalidas Day | वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कालिदास दिनानिमित्त अतिथी व्याख्यान – NNL

करियर, नांदेड
देगलूर| वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कुलगुरू कालिदास व गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील संस्कृत आणि हिंदी विभाग व ग्लोबल संस्कृत फोरम, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन अतिथी व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत विभाग तर्फे डॉ. अंशुल दुबे, (असिस्टंट प्रोफेसर, तिलक महाविद्यालय औरैया, उत्तर प्रदेश) तर हिंदी विभागातर्फे डॉ. विशाल विक्रम सिंह, (राजस्थान विश्वविद्यालय जयपुर) यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. व्याख्यान सत्रामध्ये डॉ. अंशुल दुबे यांनी कालिदास आणि मेघदूत या विषयावर अत्यंत सुंदर आणि समर्पक प्रस्तुतीकरण करून आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. विशाल विक्रम सिंह यांनी मोहन राकेश लिखीत आषाढ का एक दिन या नाट्य कथेचे उत्कृष्टपणे विस्तृत विवेचन केले. या अतिथी व्याख्यान सत्रामध्ये महाविद्यालयाचे...
Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

Dr. Sangita Chandrakant Deshmukh | जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू – NNL

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत. आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले....
Shlok Bandewar | चेन्नई येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत श्‍लोक बंडेवार चमकला.. NNL

Shlok Bandewar | चेन्नई येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत श्‍लोक बंडेवार चमकला.. NNL

नांदेड, करियर
नांदेड| येथील प्रतिथयश चार्टेड अंकाऊंटट असलेल्या सिए सुमित बंडेवार यांचा मुलगा श्‍लोक बंडेवार याने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यश मिळवित नांदेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अबॅकस शतकानुशतके जुने गणिताचे साधन आहे, जे मोजणीसाठी वापरले जाते. त्यातही प्रामुख्याने, बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकारासाठी वापरले जाते. अबॅकस कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलांच्या मेंदूची कौशल्ये सुधारून मेंदूची शक्ती वाढवणे हा आहे. उच्च शैक्षणिक कामगिरी केवळ अंकगणितातच नाही तर सर्व विषयांमध्येही अबॅकसच्या वापरामुळे प्राप्त झालेले अनेक फायदे आहेत. अबॅकस हे अंकगणित आकडेमोड सुलभ करून गणिताची भीती दूर करते तसेच ते केवळ गणित सुधारते आणि गणितात रस निर्माण करत नाही तर एकूण शैक्षणिक कौशल्य सुधारण्यास मदत करते आणि दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करते आणि समस्या सोडवण्याची क्षमता आत्मविश...
Meeting of All India Class IV Employees Federation concluded at Chennai | अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाची चेन्नई येथे बैठक संपन्न -NNL

Meeting of All India Class IV Employees Federation concluded at Chennai | अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाची चेन्नई येथे बैठक संपन्न -NNL

हिंगोली, करियर, नांदेड
हिंगोली| अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाची राष्ट्रीय स्तरावरील बैठक दिनांक 21 जुलै 2024 रोजी चेन्नई येथे यशस्वीपणे संपन्न झाली असून, ह्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे प्रतिनिधी रामभाऊ पांचाळ, उपाध्यक्ष अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ रामदास शिराळे हाई लेवल कमेटी अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व महिला प्रतिनिधी श्रीमती शिला पेंडेकर व इतर कर्मचारी पदाधिकारी वर्गानी प्रतिनिधीत्व केले. शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या जागेवर पुर्वी प्रमाणे वारसा हक्क देण्यात यावा. कर्मचारीच्या एका पाल्यास पुर्वी प्रमाणे शासन सेवेत सामावून घेण्यात यावे. जुनी अनुकंपा योजना लागू करण्यात यावी. चतुर्थ श्रेणी रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने वा बाह्य स्त्रोताद्वारे न भरता सरळसेवेने शासनामार्फत भरण्यात यावी. अनुकंपा तत्त्वावरील जागा भरण्यात याव्यात. अनुकंपा भरत...
home guard registration | होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

home guard registration | होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 335 चा होमगार्ड सदस्य अनुशेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे. यासाठी 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अनुशेषामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे....
rural fellowship – प्रथम येणा-या विद्यार्थ्‍यास ग्रामीण फेलोशिप देवून गौरव करण्यात येणार – NNL

rural fellowship – प्रथम येणा-या विद्यार्थ्‍यास ग्रामीण फेलोशिप देवून गौरव करण्यात येणार – NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्‍हा परिषद आणि शासन स्‍तरावील राबविण्‍यात येणा-या विविध योजनाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्‍यासाठी तसेच अभ्‍यासपूर्ण उपाययोजना सुचविण्‍यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक (Rural Fellows) हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून आज त्‍यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. जिल्‍हा परिषदेच्‍य यशवंतराव चव्‍हाण सभागृहात घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात उच्‍च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. किरणकुमार बोंदार, माध्‍यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, सहाय्यक शिक्षण उप निरिक्षक हनुमंत पोकळे, सांखिकी विस्‍तार अधिकारी सुधीर शिंदे आदींची उपस्थिती होती. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यावेळी म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागात केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध यो...
बळीराम पाटील महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांची शपथविधी सोहळा संपन्न -NNL

बळीराम पाटील महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांची शपथविधी सोहळा संपन्न -NNL

करियर, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। बळीराम पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय किनवट येथे करिअर कट्टा विभागाच्या वतीने करिअर संसद पदाधिकारी शपथविधी सोहळा दिनांक 15 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यवाहक प्रा. अनिल पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्तावना करिअर कट्टा महाविद्यालय समन्वयक डॉ.आनंद भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रा संतोष गोपीचंद पवार यांनी केले. याप्रसंगी करिअर संसदेतील मुख्यमंत्री म्हणून अनुसया लक्ष्मण पवार, नियोजन मंत्री म्हणून वेदिका अजय जयस्वाल, कायदे व शिस्तपालन मंत्री कृतिका गजानन बारापात्रे, सामान्य प्रशासनम...
Chief Executive Officer Meenal Karanwal | बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal | बुके, हार-शाल नकोत, शालेय साहित्य द्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रथागत पद्धतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बुके, हार, आणि शाल देण्याऐवजी शालेय साहित्य दिले जावे, ज्याचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होईल. जिल्ह्यात दौरे करत असतांना ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची निकड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी बुके, हार-शालच्या सत्कारात बदल केला आहे. कार्यालय अथवा दौऱ्यात असतांना अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सत्कार करताना शालेय साहित्य द्यावे. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, तसेच इतर शैक्षणिक साधने असू शकतात, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सहाय्य करतील. एक वही अथवा एक पेन देखील दिला तरी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स...
error: Content is protected !!