Monday, July 6

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाची अभिमानास्पद वाटचाल – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाने आज ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या तीन दशकामध्ये या संकुलाने अनेक विद्यार्थी घडविले. दरवर्षी या संकुलातील १५ ते २० विद्यार्थी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण होतात. यावर्षीही १२ विद्यार्थ्यांनी ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संकुलामधील बरेच विद्यार्थी बाहेर देशात चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. शिवाय या संकुलामध्ये खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी उच्च प्रतीची दुर्बीण, टाईम डोमेन रोफलिटोमीटर, नॅनो मटेरियल प्रयोगशाळा इत्यादीसह अनेक उच्च प्रतीची उपकरणे उपलब्ध आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते. त्यामुळे गेल्या तीन दशकातील या संकुलाची वाटचाल ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते आज दि. ८ ऑगस्ट ...
मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांनी नांदेड येथील दैनिक नेता नगरीचे संपादक विजयकुमार सितळे यांची मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी निवड केली व निविडिचे पत्र श्री श्री श्री महंत राम भारती गुरु महाराज नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की,नुकतीच शिवाजीनगर जालना येथे मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील श्री महंत राम बापू भारती महाराज हे होते. यावेळी मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषद संघटनेच्या वाढीविषयी चर्चा झाली. पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी तसेच पत्रकार संघटनेच्या प्रचार प्रसार करून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची निव...
विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

करियर, नांदेड
लोहा। विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत शाळांची तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांना भाषा गणित याचे आकलन झाले पाहिजे. अध्ययन निष्पत्ती झाली पाहिजे आता कागदावर गुणवता टिकणार नाही. ती वास्तवात उतरली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी केले. शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थी गुणवता विकास महाअभियान अंतर्गत तपासणी बिईओ सतीश व्यवहारे यांनी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे,केंद्र प्रमुख डी आर शिंदे , केंद्र प्रमुख बाबुराव फसमले ,यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली मुख्याध्यापक यांच्या प्रशासनाचा गौरव केला शिक्षकांनी गुणवता वाढवावी तसेच विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान आले पाहिजे ,अध्ययन निष्पत्ती निश्चित करताना पुन्हा पडताळणी होणार आहे. असे सांगून बिईओ यांनी महत्वाच्या सूचना दिल्या. ...
Praveen Patil Baswade Passed NETSET :  प्रवीण पाटील बस्वदे नेटसेट उत्तीर्ण -NNL

Praveen Patil Baswade Passed NETSET : प्रवीण पाटील बस्वदे नेटसेट उत्तीर्ण -NNL

करियर, नांदेड
नांदेड। नुकत्याच जाहीर झालेल्या नेट सेट परीक्षेच्या निकालात कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र प्रवीण तुकाराम पाटील बस्वदे यांनी अर्थशास्त्र विषयामधून नेट सेट परीक्षेत यश संपादन केले आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दासराव पाटील पुयड यांचे ते मावस भाऊ आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.....
Success of Manoj Kolte in set exam : सेट परीक्षेत मनोज कोलते यांचे यश -NNL

Success of Manoj Kolte in set exam : सेट परीक्षेत मनोज कोलते यांचे यश -NNL

करियर, नांदेड
नांदेड| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या राज्य चाचणी परीक्षेत मनोज संजय कोलते यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. 7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी शारीरिक शिक्षण या विषयात हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी,प्रा.डॉ.सुरेश गजभारे, प्रा.डॉ.सय्यद वाजिद,प्रा.डॉ.सुभाष रगडे,प्रा.अक्षय हसेवाड,डॉ.प्रा.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा.अविनाश कोलते, प्रा.सिद्धांत खिल्लारे, प्रा.सय्यद फराज,यांनी अभिनंदन केले आहे....
Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

Best Vishnupuri School of Priyapurak School : पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा; रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन – NNL

करियर, नांदेड
नांदेड| तीन एकरच्या परिसरात निसर्गरम्य हरित लता, वेली, वृक्ष, डौलणारी फुलझाडे, विस्तृत पसरलेले गवताचे मैदान, वाढलेली झाडे आणि चिमुकल्यांचा वावर पाहून पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा असे गौरोद्गार रिप बेनिफिट संस्थेने काढले आहेत. नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी शिक्षकांना भरीव मार्गदर्शन करण्यासाठी रिप बेनिफिट संस्थेच्या चंद्रिका, अक्षय,शिवानी व भरत यांच्यासह समग्र शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विष्णुपूरीस भेट देण्यासाठी आले होते. यावेळी शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रिप संस्थेच्यावतीने शालेय परिसरात एका बहुवार्षिक रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. रिपने पर्यावरण प्रेमी शिक्षक उदय हंबर्डे यांना पुढील कार्यासाठी निवडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका उ...
3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

करियर, नांदेड
मुंबई| समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज विशेष शिक्षक पदनिर्मिती, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री सर्वश्री संजय राठोड, संजय बनसोडे, आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, किशोर दराडे, ज्ञानेश्वर ...
Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड| आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश संपादन करावयाचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपलं वैचारिक व्यासंग वाढवणे नितांत आवश्यक आहे. अशा गुणवंतांना हमखासपणे यशाचा महामार्ग सापडतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले. महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्रा.करण भगवानराव हंबर्डे यांनी अर्थशास्त्र तर प्रा.जुनेद मिर्झा यांनी वाणिज्य विषयात 'सेट' परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच वनस्पती शास्त्राच्या प्रा. किरण नरवाडे यांची रत्नागिरी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून प्राचार्य डॉ. घुंगरवार बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. शेखर...
D.M. Khandare : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्र-संचालकपदी डॉ. डी.एम. खंदारे यांची निवड -NNL

D.M. Khandare : ‘स्वारातीम’ विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्र-संचालकपदी डॉ. डी.एम. खंदारे यांची निवड -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी यापूर्वी डॉ. दिगंबर नेटके हे होते. ते नियत वयोमानानुसार दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे वरिष्ठ प्राध्यपक डॉ. डी.एम. खंदारे यांची प्र-संचालकपदी निवड केली आहे. डॉ. डी. एम. खंदारे यांनी यापूर्वी विद्यापीठाचे प्र-वित्त व लेखाधिकारी, क्रीडा विभागाचे संचालक म्हणूनही यशस्वीरित्या काम पहिले. डॉ. खंदारे यांना शैक्षणिक आणि प्रशासनातील प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील उत्तम मार्गदर्शक म्हणुन नावलौकिक मिळविले आहे. या दरम्यान त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अनेक समित्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. या त्यांच्या निवडीबद्दल विद्या...
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाल्याबद्दल पाच जणांचा पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी सत्कार केला यावेळी ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती. ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे व ज्ञानोबा गिते यांच्या खाते अंतर्गत सेवा जेष्ठतेनुसार उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीवर बदली झाल्याबद्दल तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी भगवान व्यंकटराव महाजन यांची व डिबी पथकातील पोलीस नाईक सतार मगदुम शेख नुर पटेल यांच्यी पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी तर दिलीप भगवानराव गुट्टे,प्रकाश माणिकराव मुंडे व महिला कर्मचारी संजोता परमेश्वर ढगे यांच्यी हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाली. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४ जुलै रोजी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे,...
error: Content is protected !!