HomeनांदेडPrincipal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास...

Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

नवीन नांदेड| आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश संपादन करावयाचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपलं वैचारिक व्यासंग वाढवणे नितांत आवश्यक आहे. अशा गुणवंतांना हमखासपणे यशाचा महामार्ग सापडतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले.

महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्रा.करण भगवानराव हंबर्डे यांनी अर्थशास्त्र तर प्रा.जुनेद मिर्झा यांनी वाणिज्य विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच वनस्पती शास्त्राच्या प्रा. किरण नरवाडे यांची रत्नागिरी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून प्राचार्य डॉ. घुंगरवार बोलत होते.

IMG 20240806 WA0052 Principal Dr. Shekhar Ghungarwar : वैचारिक व्यासंग वाढवला तरच यशाचा मार्ग हमखास सापडतो- प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार -NNL

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी अभ्यासात नियमितता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यासात सातत्य व नियमितता ठेवली तर यश हमखास मिळते म्हणून नव तरुण संशोधकांनी व अभ्यासकांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा संदर्भ आढावा घेऊन अभ्यास करावा जेणे करून आपल्याला सर्व विषयाची इत्यंभूत माहिती मिळेल व आपली प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल.

यावेळी उपप्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड, प्रा.किरण नरवाडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लोकप्रशासन विभागाचे प्रा. शशिकांत हटकर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.यू.एस.कानवटे, डॉ. अनिल गच्चे,डॉ.नागेश कांबळे, डॉ.विजय मोरे, डॉ संतोष शिंदे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड, डॉ. गणेश इजळकर, डॉ.एल.व्ही. खरात,प्रा.कपिल हिंगोले, प्रा.नितिन मुंडलोड,डॉ.राहुल सरोदे,डॉ.शोभा वाळूककर,डॉ.बुशरा शेख,डॉ.आम्रपाली डोंगरे, डॉ.अश्विनी जगताप,यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments