Thursday, May 14

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Voice of Media : व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी गोणारकर तर सचिवपदी शिवराज पाटील गाडीवान – NNL

Voice of Media : व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी गोणारकर तर सचिवपदी शिवराज पाटील गाडीवान – NNL

करियर, नांदेड
नांदेड| व्हॉईस ऑफ मीडिया संलग्नित साप्ताहिक विंग पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी यांची तर सचिवपदी शिवराज पाटील गाडीवान यांची संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागीय अध्यक्ष अब्दुल कय्युम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी,जिल्हा सचिव शिवराज पाटील गाडीवान,जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष शंखपाळे,जिल्हा सहसचिव मलिक चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रितम गवाले,जिल्हा उपाध्यक्षपदी मंगेश तेलंगे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा संघटक म्हणून सुरज कौटकर ,गजानन बीडकर, कावेरी तेलंगे (श्रीमंगले),दिनेश बुजवणे,भिमराव बुक्तरे,कैलास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय कार्य...
Shivam Suresh Girhe : माहूरचा शिवम पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी -NNL

Shivam Suresh Girhe : माहूरचा शिवम पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्र लोकसेवा आयोगा 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून माहूर येथील शिवम सुरेश गिऱ्हे याने १६१ व्या रॅंक क्रमांक पटकावित पोलिस उप निरीक्षक पदास गवसणी घातली. शिवम याचे प्राथमिक शिक्षन माहूरला झाले असुन पुढील शिक्षण सैनिक शाळा वाशिम माध्यमिक व उच्च माध्यमिक म. गाधी विघालय अहमदपुर व कृषी अभियांत्रिकी पदवी शिक्षण जळगाव येथील उल्हास पाटील येथे पुर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी पुणे येथे करून स्पर्धा परिक्षा दिली. या परिक्षेत मुलाखती साठी १३०० शे पैकी १६१ वा रॅंक घेऊन यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे....
Celebrating Punishment Week Day | सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षा सप्ताह दिन साजरा – NNL

Celebrating Punishment Week Day | सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षा सप्ताह दिन साजरा – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययनाच्या शाळा - पूर्व स्तरापासून उंच शिक्षण स्तरापर्यंत प्रत्येक स्तरावर विशिष्ट निर्धारित कौशल्य आणि मूल्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अमलात आणले असता भारत सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त "शिक्षा सप्ताह" दिन 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान घेण्यात आला आहे. या सप्ताहात शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली गेली विद्यार्थ्यांच्या गणितीय व भाषा कौशल्यवृद्धीसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले विविध खेळ स्पर्धा आयोजित केल्या गेल्या स्किलिंग डे अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी के पी गायकवाड यांनी आपत्कालीन परिस्थितीत धैर्य ठेवून प्रथम उपचार कसा करावा या...
Administration should become more dynamic due to the youths | मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी – NNL

Administration should become more dynamic due to the youths | मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड, करियर
नांदेड| राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून तरुण रक्ताचे सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय यंत्रणेला मिळणार आहे. युवाशक्तीचा उपयोग प्रशासन आणखीन गतिमान करण्यासाठी करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची नियुक्ती, त्यांना द्यावयाची कामे, आणि नव्याने सरकारी आस्थापनावर नियुक्ती होताना घ्यावयाची काळजी, यासंदर्भातील जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यासहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सादरीकरण केले. तसेच कशाप्रकारे नियुक्ती करण्यात यावी ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने येणारे उमेदवार ही पदभरती नसून युवका...
Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL

Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL

नांदेड, करियर
नांदेड| वाचक म्हणून आपण आपल्या मनाचा सैलपणा वाढवायला हवा. जातीच्या, प्रदेशाच्या संकुचित गोष्टीतून आपण बाहेर पडलो तर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे व्यापकत्व लक्षात येईल. त्यांच्या अनुभूतीचा परीघ अत्यंत विस्तृत होता. विशिष्ट विचारसरणीत अण्णा भाऊ साठे कधीही अडकून पडले नाहीत. त्यांच्या साहित्यातला माणूस विशिष्ट जातीचा नाही, धर्माचा नाही. कारण अण्णा भाऊ साठे हे वैश्विक भान असलेले प्रतिभावंत लेखक होते. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गिरीश मोरे यांनी केले. प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान...
Student quality development campaign | आजपासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानास प्रारंभ -NNL

Student quality development campaign | आजपासून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानास प्रारंभ -NNL

करियर, नांदेड
नांदेड| विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत असून आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते दिनांक 31 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी हे महत्त्वाकांशी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. सर्व अधिकारी आणि सर्व शाळांनी यात आपला सहभाग देण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहेत. या अभियानादरम्यान पहिल्या 20 दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर 6 दिवस आवश्यकतेनुसार सुधारणा व उपाययोजना करणे, त्यानंतर 4 दिवसांमध्ये अनुपालनाची खात्री करणे असा हा कार्यक्रम आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे 2 दिवस कार्यालयीन कामकाज आणि उर्वरित तीन-चार दिवस शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी,...
The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

The number of ‘one lakh Maratha’ entrepreneurs is complete | ‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण – NNL

करियर, नांदेड
नांदेड| अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमा...
Appointment of new Police Inspector Rajesh Puri | हदगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची नियुक्ती  – NNL

Appointment of new Police Inspector Rajesh Puri | हदगाव पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात विविध घडामोडी झाल्यानंतर पंधरा दिवसात दोन पोलीस निरीक्षक बदलून गेलेले आहे. आता हदगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नव्यानेच नियुक्ती झाली आहे. गत काही दिवसांमध्ये हदगाव शहरात मागील पंधरवाड्यात मध्ये विविध घडामोडी घडून नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरक्षक सदाशिव भडीकर यांच्यावर काही गंभीर आरोप लागले. त्यांच्या जागी प्रभारी पोलीस निरक्षक म्हणून कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांची देखील बदली करण्यात येऊन आता हदगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे प्रभारी आहेत की, कायमस्वरूपी आहेत ही माहिती मिळू शकली नाही. हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे 50 पेक्षा जास्त गाव आणि हदगाव शहर मोठे आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या विविध अवैध धंदे वाढलेले आहेत. तसेच व...
Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

Dr. Kailash Yadav | नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील – डॉ.कैलाश यादव – NNL

नांदेड, करियर
नांदेड| आपल्या परिसरातील घरांघरात खूप पोटेन्शिअल आहे फक्त त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते नांदेडचे नाव देशपातळीवर पोहोचवतील असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी केले. ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली या मंचावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव, प्रमुख पाहुणे श्री. उमेश थळंगे उपकार्यकारी अभियंता महापारेषन, जगमवाडी नांदेड तर प्रमुख उपस्थिती प्रा. प्रितम लोणेकर, मा. श्री गुणवंत मिसलवाड ( गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षक मा. श्री.संतोषसिह चौधरी, मा. श्री. गंगाधर चिते, मेघा गायकवाड (जोंधळे) यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. या कार्यक्रमात ...
Availed the free laptop scheme | शिवांश कम्युनिकेशन येथे शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ – NNL

Availed the free laptop scheme | शिवांश कम्युनिकेशन येथे शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला मोफत लॅपटॉप योजनेचा लाभ – NNL

करियर, नांदेड
नांदेड| तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांची नाव नोंदणी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला असून २०२४ च्या सुरूवातीला जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फ्रॉम भरून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती शिवांश कम्युनिकेशनचे संचालक विरेंद्रसिंह हजारी यांनी यावेळी दिली तसेच ते म्हणाले की प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप हा या योजनेचा उद्देश असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवांश कम्युनिकेशन येथे सुक्षिशित बेरोजगार भत्ता ,मोफत स्कुटी योजना , मोफत टॅब योजना, प्रधानमंत्री मोफत सोलार योजना यासह विविध शासकीय योजनांची नोंदणी सुरू असून ज्यांना या योजने अंतर्गत अर्ज क...
error: Content is protected !!