नांदेड| महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असताना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांनी त्यांच्या प्रचार सभेत वादसग्रस्त , प्रक्षोभक विधान करून राजकीय , सामाजिक आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांना धमकीवजा आव्हानात्मक भाषेचा वापर करून देशाच्या सुरक्षितेला आव्हान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराची तात्काळ उमेदवारी रद्द करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे . यावेळी खा. अजित गोपछडे यांच्यासह डॉ. सचिन उमरेकर विनायक सगर , दीपक सिंह रावत, बाळू खोमणे , दिलीप ठाकूर ,दीपक कोठारी, शिवाजी पाटील चिंचाळकर,राज यादव , अभिषेक सौदे , बिरबल यादव आदींची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीसह नांदेड मध्ये नांदेडच्या लोकसभेसाठी पोट निवडणूक घेतली जात आहे . यासाठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघ्या काही तासाचा अवधी शिल्लक असताना वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण विधानसभेचे उमेदवार यांनी टिपू सुलतान यांच्या पुतळ्या उभारणी बाबत विधान केले . समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी, गृहमंत्री अमित शहा व राज्याच्या गृहमंत्र्यासह अनेकांचे नाव घेऊन धमकी वजा भाषेचा प्रयोग केला . हिम्मत असेल तर कारवाई करा. मी टिपू सुलतान यांचा पुतळा बसवणारच . असे देशाच्या सरकारला आणि गृहमंत्र्याला आव्हान दिले. पुतळा बसल्या माझ्यावर काय कारवाईची करायची ते करा. मेरा कुछ उखाड नही सकते अशा धमकीमय भाषेत आव्हान दिले आहे.
भारतीय घटनेनुसार दोन धर्मात तेढ निर्माण करणे , धार्मिक आधारावर मतांची धुर्विकरण करणे , प्रक्षोभक विधान करून समाजातील तणाव निर्माण करणे या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगचे जे कायदे लागू आहेत त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करता करावा . फारुख अहमद यांची उमेदवारी तत्काळ रद्द करावी. अशी मागणी खा. डॉ. गोपछडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती गृहमंत्री अमित शहा , राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्य निवडणूक आयोग , केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आले आहेत.