हिमायतनगर| तालुक्यातील मौजे दुधड येथे एका महिलेची निघृण हत्या करून घरातील सामानांची नासधूस केल्याची धक्कादायक घटना दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या मौजे दूधड गावातील अन्नपूर्णाबाई कोंडबा शिंदे (वय ४५) यांची मध्यरात्री अज्ञाताने हत्या केली. सकाळी गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीसांना कळविले. तात्काळ पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासह बीट जमादार व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.


या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके यांनीही घटनास्थळी भेट दिली व तपासाची गती वाढवली. रात्री उशिरापर्यंत मयत महिलेच्या प्रेताचे शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.


घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत यास कारणीभूत असल्याच्या संशयावरून एकाला ताब्यात घेतले सून, पोलिसांकडून तपास असुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

